Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Ek Deewane Ki Deewaniyat And Thamma चित्रपटांमध्ये बॉक्स ऑफिसवर काँटे की टक्कर; २५ कोटींचा चित्रपट पोहोचला १०० कोटींवर
सध्या बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट रिलीज होत आहेत… यात मग रोमॅंटिक, हॉरर-कॉमेडी किंवा वास्तववादी चित्रपटांचाही समावेश आहे… अशातच ‘एक दिवाने की दिवानियत’ हा चित्रपट सध्या तरुण प्रेक्षकवर्गात फार गाजतोय… ‘सैय्यारा’ चित्रपटाला मिळालेल्या यशानंतर रोमॅंटिक किंवा प्रेमकथा पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या आवडीचा विषय होत चालली आहे यात शंका नाही… खरं तर, ग्लॅमरस स्टारकास्ट नसूनही या चित्रपटाने ‘थामा’ चित्रपटाला टक्कर दिली आहे… बॉक्स ऑफिसच्या लढाईत Ek Deewane Ki Deewaniyat चित्रपटाने चक्क मॅडॉक फिल्म्सच्या चित्रपटाला पाणी पाजलं आहे.. जाणून घेऊयात या दोन्ही चित्रपटांचं बजेट आणि कलेक्शन… (Bollywood Movie 2025 box office collection)

तर, Ek Deewane Ki Deewaniyat या चित्रपटात हर्षवर्धन राणे आणि सोनम बाजवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत… २१ ऑक्टोबर २०२५ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी ९ कोटी कमावत ओपनिंग केली होती… २५ कोटींचं बजेट असणाऱ्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास १०० कोटी कमावले आहेत… (Ek Deewane Ki Deewaniyat box office collection)

‘एक दीवाने की दिवानियत’ चित्रपटाच्या कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, ‘देसी मूव्हीज फॅक्टरी’ने दिलेल्या माहितीनुसार दुसऱ्या आठवड्याच्या अखेरीस भारतात ८६.१ कोटी आणि परदेशात १५ कोटींची कमाई केली आहे. तर, बिझनेस सोर्सेसनुसार, हा आकडा अजूनही ९२ कोटींच्या आसपास आहे.. तर आयु्ष्यमान खुराना आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘थामा’चं बॉक्स ऑफिस कलेक्शन १२१.८ कोटी इतकं झालं आहे.. दोन्ही चित्रपटांची कलेक्शनची आकडेवारी मागे-पुढे असून थामा फार पुढे निघुन जाईल अशी अपेक्षा होती पण ती अद्याप १५ दिवस उलटूनही पूर्ण झाली नाही…(Thamma movie box office collection)
================================
================================
इंडस्ट्रीत सध्या रोमँटिक ड्रामा चित्रपटांना यश मिळताना दिसत आहे… ‘सैय्यारा’ने (Saiyaara movie box office collection) ५७५ कोटींपेक्षा जास्त कमाई करत नवा इतिहास रचला… तर, ‘एक दिवाने की दिवानियत’ चित्रपटाने सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांच्या ‘परम सुंदरी’ (८६ कोटी) आणि राजकुमार रावच्या ‘भूल चुक माफ’नं (९१ कोटी) लाईफटाईम कलेक्शनला मागे टाकलं आहे… त्यामुळे येत्या काळात हा चित्रपट थामा लाही मागे टाकणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे….
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi