‘सलमान भाईसाठी मी दोन्ही किडन्या विकल्या’,हे काय बरळली Rakhi Sawant
 
                          
         Thamma : हॉरर कॉमेडीच्या नावाने अपेक्षाभंग करणारा सिनेमा!
सिनेमा लव्हर्स दिवाळीमध्ये ज्या ‘थामा’केदार चित्रपटाची वाट पाहत होते, तो ‘थामा’ (Thamma Movie) अखेर थिएटर्समध्ये आला. पण ‘थामा’ला फटाकेबाजी मात्र करता आली नाही आणि तो फुसका बार निघालाय. Maddock च्या हॉरर कॉमेडी युनिव्हर्सचा हा पाचवा चित्रपट… सर्वांनाच अपेक्षा होती की, या युनिव्हर्सच्या इतर चार मुव्हीजप्रमाणे यातही काहीतरी ट्विस्ट एन्ड टर्न्स असतील, पण निव्वळ अपेक्षाभंग झाला आहे. कारण यामध्ये ना कॉमेडी आहे ना हॉरर… या दोघांच्या कमतरतेसह आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंधानाची केमिस्ट्रीसुद्धा गंडलेली आहे. थामा चित्रपटसुद्धा folklore वर आधारित आहे. आपल्या सर्वांनाच वेताळ माहितीच आहेत. ग्रामीण भागांमध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला वेताळांची मूर्ती पाहायला मिळते. या वेताळांवरच हा मुव्ही आधारित आहे. पण वेताळांचं नाव वापरून मुव्ही पूर्णपणे रटाळ केलेला आहे… बरं थामाबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात…

अनेकांना वाटलं होतं की ‘मुंज्या’नंतर मराठमोळे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार यांचा बॉल आउट ऑफ द पार्क असेल, पण इथे मात्र ते क्लीन बोल्ड झालेले आहेत. तर आधी छोटासा प्लॉट समजून घेऊया, २३०० वर्षांपूर्वी सिकंदरची ग्रीक सेना रात्री भारताच्या जंगलांमधून जात असते, यानंतर त्यांच्यावर हे वेताळ Attack करतात. आणि यांचा लीडर असतो, नवाजुद्दिन सिद्दिकी म्हणजेच यक्षासन… हे वेताळ फक्त रक्तावर जगत असतात, म्हणजे माणसाचं किंवा प्राण्यांचं.. आणि ज्याला हे चावतात, तेसुद्धा त्यांच्यासारखे होतात. एकंदरीत हा चित्रपट vampires वरच आधारित आहे. म्हणजे आतापर्यंत या युनिव्हर्समध्ये आपण भूतं पाहिली होती, पण vampires पहिल्यांदाच इथे वापरण्यात आले आहेत. चित्रपटात आलोक म्हणजेच आयुषमान खुरानाला जंगलात अस्वलाच्या हल्ल्यातून ताडका म्हणजे रहस्यमयी रश्मिका मंदान्ना वाचवते. पुढे त्यांच्यात प्रेम होतं. पण काही restrictions सुद्धा येतात.
खरं तर दोघांमधली केमिस्ट्री पूर्णपणे भरकटलेली आहे. Romantic सीन्ससुद्धा त्यांच्या संवादांसारखेच बोरिंग वाटतात. दोघांमध्ये ना bonding आहे ना दोघेही हॉरर कॉमेडीचा प्रभाव पाडू शकले आहेत. संवादाबाबत बोलायचं झालं, तर फक्त परेश रावल आणि नवाजुद्दिन सिद्दिकी यांचे काही ठराविक डायलॉग सोडले, तर चित्रपट तुम्हाला कुठेही हसवत नाही. नवाज आणि परेश रावल यांच्यासारखे तगडे actors दिग्दर्शकाला UTILISE करता आले नाहीत आणि त्यात त्यांचं स्क्रीन टाईमसुद्धा फार कमी आहे. नवाजचं पात्र ना घाबरवू शकलं, ना कसलाही प्रभाव पाडू शकलं. त्यात पूर्ण चित्रपटात सतत त्या वेताळांचे दात बाहेर काढतानाचे सिन्स अजून IRRITATE करतात. महत्त्वाचं म्हणजे आयुष्मान खुरानासारखा लीडिंग अभिनेता आणि रश्मीका मंधानासारखी लीडिंग अभिनेत्रीच या चित्रपटाचे सर्वात WEAK POINT आहेत.
====================================
हे देखील वाचा : Stree to Thama : बॉलिवूडचं हॉरर-कॉमेडी युनिवर्स!
====================================
VFX च्या बाबतीत चित्रपट घाई-गडबडीतच केला आहे, असंच वाटतं. सुरुवातीचा अस्वलाचा सीन बघूनच तुमचे डोळे विस्फारतील, पण वेगळ्या कारणाने… TECHNICALLY तर ‘थामा’ पूर्णपणे फसलेला चित्रपट आहे. कारण चित्रपटाची एकही गोष्ट TRACK वर नाही. Acting, डायलॉग्स, स्टोरी यांचा कुठेही IMPACT दिसत नाही. जंगलातले सीन्स तर खूपच स्लो आहेत. एकंदरीत फर्स्ट हाफ बोरिंग आणि दुसरा हाफ कन्फ्युजिंग वाटतो. म्युझिकच्या बाबतीत बोलायचं झालं तर हॉरर कॉमेडीसारख्या जॉनरमध्ये तीन तीन आयटम SONGS ची काहीच गरज नव्हती. त्यात Background Score पण engaging नाही. तर जास्तच भडक आहे. त्यात रश्मीकाचा बोल्ड अवतारसुद्धा इतका प्रभावशाली वाटत नाही.

Maddock हॉरर कॉमेडी युनिव्हर्समध्ये एक नवा सुपरहिरो उभा करण्याच्या नादात ‘थामा’मुळे चित्रपटाची लाईन-अप भटकली आहे. तुम्हाला भीती वाटत नाही, तुम्हाला हसू येत नाही, तुम्हाला एकही सीन थरारक वाटत नाही. मुळात हा चित्रपट या युनिव्हर्सचा पार्टच वाटत नाही. आधीच्या मुव्हींमधल्या characters चे महत्त्वाचे cameo असूनही मुव्ही अपूर्णच वाटतो. आता येऊया डिरेक्शनवर… आदित्य सरपोतदार यांनी बरेच मराठी क्लासिक दिले आहेत. त्यात त्यांच्या ‘मुंज्या’नेही धुमाकूळ घातला, मात्र ‘थामा’मध्ये लेखन आणि दिग्दर्शन या दोन्ही गोष्टींमध्ये त्रुटी जाणवल्या. स्क्रीनप्लेसुद्धा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल, असा लिहिला गेलेला नाही. कॉमेडी, horror, Supernatural आणि Romance अशा तिन्ही जॉनरला साजेशा असा ‘थामा’ नाही आहे. हा चित्रपट पाहताना एकच प्लस point आहे, की या युनिव्हर्समधल्या पुढच्या चित्रपटाची announcement करण्यात आली आहे तो म्हणजे ‘शक्ती शालिनी’. याशिवाय यांचे ‘चामुंडा’, ‘भेडीया-२’, ‘स्त्री-३’, ‘महामुंज्या ‘आणि त्यानंतर ‘पहला महायुद्ध’ आणि ‘दुसरा महायुद्ध’ असे चित्रपट येणार आहेत. त्यामुळे लाईन-अप सेट आहे, पण एक track वरून घसरलेला चित्रपट युनिव्हर्सला ब्रेक आणू शकतो, थामा त्याची सुरुवात आहे, त्यामुळे या युनिव्हर्सचे मेकर्स पुढच्या चित्रपटांसाठी काय युनिक गोष्टी करतात, ते आता बघुयाच…
कलाकृती मीडिया ‘थामा’ला देत आहे पाच पैकी दोन स्टार्स !
-सागर जाधव
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi
