Aatali Batami Phutli Trailer: धमाल कॉमेडी आणि थराराने नटलेल्या सिनेमाचा ट्रेलर

Thappa : मल्टीस्टारर ‘थप्पा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या वेगवेगळे प्रयोग सुरु आहेत… हॉरर-कॉमेडी, बायोपिक्स, ऐतिहासिक चित्रपटांच्या यादीत आता आणखी एक धम्माल मस्ती असणारा मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे... ‘थप्पा’ हा एक भव्य आणि हटके मल्टीस्टारर चित्रपट आता दाखल होणार असून हिंदी मल्टीस्टारर चित्रपटांनाही टक्कर देईल, असा बिग बजेट, दमदार कथानक आणि ताकदीची कास्टिंग घेऊन हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येणार आहे. सिड विंचूरकर दिग्दर्शित या चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे. (Thappa marathi movie)

‘थप्पा’ चित्रपटात वैदेही परशुरामी, रिंकू राजगुरू, सिद्धार्थ बोडके, गौरव मोरे, डॅनी पंडित, सखी गोखले आणि साईंकित कामत अशी कलाकारांची फौज असणार आहे.. हे सर्व कलाकार एकमेकांसोबत पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार असून नवे चेहरे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत…
====================================
हे देखील वाचा : Abhishek Bachchan : ह्रतिक रोशनमुळे आदित्य चोप्राशी ‘धुम २’ वेळी का भांडलेला अभिषेक?
====================================
थप्पा या चित्रपटाचं कथानक मैत्रीवर आधारित आहे की मैत्री आणि प्रेमकथेचं मिश्रण असणार आहे हे लवकरच आपल्यासमोर येईल… स्टुडिओ लक्स आणि फिफ्टी टू फ्रायडे निर्मित या चित्रपटाचे मेहुल शाह आणि अमित भानुशाली निर्माते असून यापूर्वी फिफ्टी टू फ्रायडेच्या सहयोगाने ‘मुंबई पुणे मुंबई’, ‘मुंबई पुणे मुंबई २’, ‘मुंबई पुणे मुंबई ३’, ‘गर्ल्स’, ‘प्रेमाची गोष्ट’, ‘स्माईल प्लीज’ असे अनेक सुपरहिट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi