Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Jui Gadkari ने केली नव्या गोष्टीची सुरुवात; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी ! 

 Jui Gadkari ने केली नव्या गोष्टीची सुरुवात; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी ! 
टीव्ही वाले मिक्स मसाला

Jui Gadkari ने केली नव्या गोष्टीची सुरुवात; पोस्ट शेअर करत चाहत्यांना दिली बातमी ! 

by Team KalakrutiMedia 03/09/2025

स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘ठरलं तर मग’ (Tharal Tar Mag) मधून अभिनेत्री जुई गडकरी घराघरात पोहोचली आहे. मालिकेतील सायली हे तिचं पात्र प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरलं आहे. गेल्या काही वर्षांपासून ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल स्थानी असून, प्रत्येक आठवड्यातील भाग, महाएपिसोड्स, महासंगम स्पेशल एपिसोड्स यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कायम वाढवत ठेवली आहे. मालिकेच्या गडबडीत व्यस्त असतानाच जुईने आता आयुष्यात आणखी एक महत्त्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. जुई गडकरीने नुकतीच सोशल मीडियावरून मोठी अपडेट दिली आहे. तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) मधून मास्टर्स पदवी घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजकता (Entrepreneurship) या विषयात ती पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणार आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर तिने “नवीन सुरुवात” अशी पोस्ट शेअर करत आपल्या शैक्षणिक प्रवासाची माहिती दिली. यावेळी तिने #studentforlife हा हॅशटॅग वापरला आणि शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती गृहपाठ करतानाही दिसली. एकीकडे अभिनय क्षेत्रातील व्यग्र वेळापत्रक, सतत चालणाऱ्या शूटिंग आणि दुसरीकडे कठीण विषयाचा अभ्यास, अशी खरी तारेवरची कसरत जुईला करावी लागणार आहे.(Actress Jui Gadkari)

Actress Jui Gadkari

जुईचा शैक्षणिक प्रवास देखील प्रेरणादायी आहे. ती कर्जतमध्ये लहानाची मोठी झाली. पुढे नेरुळमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर उच्च शिक्षण उल्हासनगरच्या CHM कॉलेजमधून केलं. आता मुक्त विद्यापीठातून ती मास्टर्स करत असल्याने तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. अभिनयासोबतच शिक्षणालाही प्राधान्य देणारी जुई ही अनेकांसाठी आदर्श ठरत आहे.

Actress Jui Gadkari

दरम्यान, ‘ठरलं तर मग’या मालिकेच्या कथानकाकडे पाहिल्यास, सध्या गणेशोत्सव स्पेशल एपिसोड प्रसारित होत आहेत. अलीकडच्या भागात कल्पना आणि सायली यांच्यातील दुरावा मिटलेला दाखवण्यात आला. अर्जुन, अस्मिता, प्रताप आणि प्रतिमा यांनी केलेल्या नाटकामुळे हे शक्य झालं. यामुळे प्रेक्षकांना मोठा टर्निंग पॉइंट मिळाला आहे. पुढच्या भागांत अर्जुन सायलीच्या भूतकाळाचा शोध घेताना दिसणार आहे. मधुभाऊंनी सांगितल्यानुसार त्याला आता हे स्पष्ट झालं आहे की, सायलीचे आई-बाबा जिवंत आहेत. मात्र तिचं बालपण अनाथाश्रमात का गेलं आणि तिचे खरे पालक कोण? हे अजूनही गूढच आहे.(Actress Jui Gadkari)

=============================

हे देखील वाचा: Actress Shivali Parab रिलेशनशीपमध्ये; ‘या’ स्टार सोबतच्या फोटोमुळे चर्चांना उधाण !

=============================

त्यामुळे मालिकेत लवकरच सायली हीच खरी तन्वी असल्याचा मोठा ट्विस्ट उलगडण्याची शक्यता आहे. मालिकेतील या नव्या वळणामुळे आणि जुईच्या वैयक्तिक आयुष्यातील शैक्षणिक नव्या सुरुवातीमुळे ती सध्या चर्चेत आहे. अभिनय आणि शिक्षण यांचा समतोल साधणाऱ्या जुईकडून चाहत्यांना नेहमीच काहीतरी प्रेरणादायी मिळत आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Celebrity Entertainment jui gadkari Jui Gadkari new post Jui Gadkari Serial tharal tr mag serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.