Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Tharal Tar Mag Serial: पूर्णा आजी परत येणार; ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार भूमिका…
स्टार प्रवाहवरील ‘ठरलं तर मग’ ही मालिका गेली तीन वर्षे प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करून आहे. सायली, अंशुमान आणि त्यांच्या कुटुंबाची कहाणी प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारली आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांचं भावविश्व घराघरात पोहोचलं आहे. काही दिवसांपूर्वी मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारणाऱ्या ज्योती चांदेकर यांच्या निधनाने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. त्यांच्या जाण्याने मालिकेच्या टीमवर आणि प्रेक्षकांवरही एक भावनिक पोकळी निर्माण झाली होती. मात्र, आता या मालिकेच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ‘पूर्णा आजी’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत! आणि या भूमिकेत झळकणार आहेत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी. त्यांच्या मालिकेत आगमनामुळे संपूर्ण टीममध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे.(Tharal Tar Mag Serial)

रोहिणी हट्टंगडी यांनी स्वतः सांगितलं की, ‘ठरलं तर मग’ ही माझी आवडती मालिका आहे आणि मी ती नियमितपणे पाहते. ज्योती चांदेकर माझी जुनी सखी होती. तिच्या भूमिकेचं पुढं नेणं ही माझ्यासाठी जबाबदारी आहे. तिच्या सादरीकरणाला न्याय देण्यासाठी मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करणार आहे. प्रेक्षकांनी मला तिच्या जागी तितक्याच आपुलकीने स्वीकारावं, हीच इच्छा आहे.”

त्यांच्या एन्ट्री मुळे मालिकेच्या कलाकारांमध्येही एक वेगळं चैतन्य आलं आहे. अभिनेत्री जुई गडकरी म्हणजेच मालिकेतील सायली म्हणाली की, “रोहिणी ताईंना सेटवर पाहून मन भरून आलं. त्यांच्या अनुभवातून आम्हाला खूप शिकायला मिळणार आहे. त्यांच्या उपस्थितीमुळे आमचा सेट म्हणजे एक शिक्षणसंस्था झाल्यासारखा वाटतो.”(Tharal Tar Mag Serial)
==============================
==============================
आता मालिकेतून पुन्हा एकदा ‘पूर्णा आजी’च्या माध्यमातून नाती, भावना आणि कुटुंबातील जिव्हाळ्याला नवी दिशा मिळणार आहे. प्रेक्षकांसाठी ही एक भावनिक आणि प्रेरणादायी सफर ठरणार आहे. ‘ठरलं तर मग’,ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता, स्टार प्रवाहवर पाहता येईल.