किशोरच्या गाण्याचा भावस्पर्शी किस्सा: बडी सुनी सुनी है जिंदगी…
‘क्रांतीवीर’ चा ‘तो’ आयकॉनिक डायलॉग नानांनी स्वत:च लिहिला होता!
मेहुल कुमार दिग्दर्शित ‘क्रांतीवीर’ हा सिनेमा नव्वदच्या दशकातील सर्वाधिक रिपीट ऑडियन्स असलेल्या सिनेमापैकी एक. नाना पाटेकरचा (Nana Patekar) आयकॉनिक रोल या चित्रपटात होता. या चित्रपटाने नानाला जबरदस्त लोकप्रियता फॅन फॉलोइंग मिळाले. नाना पहिल्यापासूनच आपल्या स्वतंत्र अभिनयाच्या शैलीने रसिकांमध्ये लोकप्रिय होताच. नायक म्हणून बॉलीवूडचे तोवर असलेले सर्व निकष त्याने रद्दबातल ठरवले होते.
‘गमन’ (१९७८) या मुजफ्फर अलीच्या चित्रपटातून त्याने सिनेमात प्रवेश केला होता. नाना (Nana Patekar) मराठी रंगभूमीवर अभिनयाचा जबरदस्त रंग उमटवणारा तगडा कलाकार होता. तो विजया बाईंच्या तालमीत तयार झालेला होता. हिंदी मध्ये त्याने बड्या बड्या एक्टर्सला टक्कर दिली. ‘अंकुश’ (१९८६) या चित्रपटापासून हिंदी प्रेक्षकांचे लक्ष त्यांनी वेधून घेतले. ‘परिंदा’ या विधू विनोद चोप्रा यांच्या सिनेमात त्याने साकारलेला टेरर अण्णा त्याला फिल्मफेअर आणि नॅशनल अवॉर्ड देऊन गेला.
१९८९ साली त्यांनी ‘प्रहार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. पुढे नानाचा भाव वाढतच गेला. मेहून कुमार यांच्या या ‘तिरंगा’ (१९९३) या चित्रपटात नाना पहिल्यांदा चमकला. या चित्रपटापासून दोघांची चांगली जोडी जमली. हा चित्रपट करत असताना मेहुल कुमार यांच्या लक्षात आलं की नानाला (Nana Patekar) केंद्रस्थानी ठेवून आपण एक चित्रपट बनवूया. लगेच त्यांनी चित्रपटाची आखणी सुरू केली आणि अवघ्या सहा महिन्यात ‘क्रांतिवीर’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले!
मेहुल कुमार यांनी सांगितले की, ”नाना, (Nana Patekar) या चित्रपटात तू एक सेंट्रल कॅरेक्टर आहेस. पण तू इथला एक कॉमन मॅन आहेस. त्यामुळे सिनेमातील तुझी देहबोली इथल्या सामान्य माणसाची आहे. तू रोज जे कपडे घालतोस तेच घालून सेटवर येत जा. तुझा नैसर्गिक अभिनय मला इथे पाहिजे आहे.” मेहुल यांना चागले माहीत होतं की नानाच्या डोक्यात एकदा कॅरेक्टर घुसलं की तो ती भूमिका अक्षरशः जगत असतो. ‘क्रांतिवीर’ या चित्रपटातील त्याने साकारलेला प्रताप नारायण टिळक जबरदस्त होता.
या चित्रपटात डिंपल कपाडिया हिचा देखील पत्रकाराचा रोल होता. खरंतर ती हा चित्रपट करायला उत्सुक नव्हती. ती मेहुलला म्हणाली की, ”या चित्रपटात सर्व फोकस नानावरच आहे. माझे काय काम?” त्यावर मेहुल कुमार म्हणाले,” तुझ्या भूमिकेची लांबी जरी कमी असली डेप्थ जास्त आहे. त्यामुळे हा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक की भूमिका छोटी आहे.” आणि खरोखरच डिंपलची ही भूमिका खूप चांगल्या पद्धतीने तिने साकारली. ‘क्रांतीवीर’ या चित्रपटात नानांचे अनेक आयकॉनिक डायलॉग्स आहेत. त्यापैकी एक डायलॉग म्हणजे नानाचं (Nana Patekar) ते टिपिकल हसणं आणि त्यानंतर ‘आ गये मेरे मौत का तमाशा देखने…..’ हे वाक्य ! आणि यानंतर पुढची सहा साडेसहा मिनिटं नाना एकटा बोलत असतो. हे या चित्रपटाचं हायलाईट होतं !
नेमकं या शॉर्टच्या चित्रीकरणाच्या आधी नाना (Nana Patekar) आजारी होता. पण एक दिवस मेहुल कुमार त्याच्याकडे गेले आणि नानाला म्हणाले, ”नाना प्लीज उद्या सेटवर ये. उद्या तू येणे गरजेचे आहे. कारण उद्या मी तीन साडेतीन हजार लोकांचा क्राउड बोलवला आहे. या लोकांचे पेमेंट आणि एवढा क्राऊड पुन्हा गोळा करणे अवघड आहे. त्यामुळे आपण उद्याच शूट उरकून टाकू.” नाना म्हणाला, ”पण साडेसहा मिनिटाचे डायलॉग मी पाठ कधी करणार?” त्यावर मेहुल कुमार म्हणाले, ”नाना तुला सिनेमातील भूमिका चांगली समजली आहे. तू तुझ्या पद्धतीने डायलॉग म्हण. मी डायलॉग देत नाही.” नाना (Nana Patekar) ने हे आव्हान स्वीकारले .तो म्हणाला,” हे योग्य आहे. मी माझ्या पद्धतीने डायलॉग म्हणतो. तुम्ही फक्त पाच कॅमेरे ऑन ठेवा. आणि सगळ्या बाजूने शूट करा. एरियल व्ह्यू देखील घ्या.” अशा पद्धतीने नाना दुसऱ्या दिवशी सेटवर हजर झाला.
==============
हे देखील वाचा : मिथुन चक्रवर्तीच्या ‘डिस्को डान्सर’ सिनेमाची यशोगाथा !
==============
जवळपास साडेतीन-चार हजाराची गर्दी सेटवर होती. नानाला फाशी देण्याचा शॉट होता आणि नानाने तोपर्यंत ठरवलं देखील नव्हतं की आपल्याला काय बोलायचं आहे. पण नाना (Nana Patekar) हा मूळचा अभिजात कलाकार . त्यामुळे तो एकदा त्या भूमिकेच्या गेटअप मध्ये शिरला आणि त्याने अखंड साडेसहा मिनिटांचा शॉट दिला आणि ‘आ गये मेरे तम मौत का तमाशा देखने…..’ हा त्याचा डायलॉग त्याची आयडेंटिटी बनली. यानंतर नानाने (Nana Patekar) खूप वेगळ्या भूमिका केल्या. अग्निसाक्षी, वजूद, यशवंत, खामोशी, हमदोनो, कोहराम, गुलां ए मुस्तफा…. मराठीत देखील त्याने खूप चांगला भूमिका साकारल्या नटसम्राट, डॉ प्रकाश बाबा आमटे ई. तुम्हाला नाना पाटेकरची कुठली भूमिका आवडते?