
‘हा’ चित्रपट बघायला तुम्हाला ३ दिवस लागतील, कारण…
मध्यंतरी छोट्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर चांगलीच चलती होती. दीड-दोन तासांचे चित्रपट प्रेक्षकांना जास्त आवडायचे त्यामुळे मोठ्या प्रमाणात हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालायचे. एकूणच लोकांचा अटेन्शन स्पॅम कमी झाल्यामुळे हे चित्र बघायला मिळत होतं; पण आता पुन्हा ‘अॅनिमल’ ‘छावा’ आणि’ धुरंदर’ सारख्या सिनेमांमधून मोठ्या लांबीच्या चित्रपटांचा ट्रेंड डोकं वर काढतोय. पण तुम्हाला जगातला सर्वात मोठा चित्रपट माहिती आहे का? जो पूर्ण बघायला तुम्हाला तब्बल ३ दिवस आणि १५ तास लागतात. आज आपण याच सर्वात मोठ्या चित्रपटाबद्दल जाणून घेणार आहोत. (Hollywood Movies)
हा चित्रपट तब्बल ५२२० मिनिटांचा आहे. हो हो वाचून कदाचित धक्काच बसेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा चित्रपट १९८७ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचं नाव ‘द क्युअर फॉर इनसॉमनिया’ (The Cure for Insomnia). या चित्रपटाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही घेण्यात आली आहे. सिनेमाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा चित्रपट जॉन हेनरी टीमिस चौथा (IV) याने डायरेक्ट केला होता. हा चित्रपट पूर्ण बघायला तब्बल ३ दिवस १५ तास लागतात. पण असं नेमकं या चित्रपटात आहे तरी काय? (Entertainment News)

तर, या चित्रपटाला स्वतंत्र असा प्लॉट किंवा कथानक असं काहीच नाही. यामध्ये फक्त एलडी ग्रोबन नावाचा एक कलाकार पाहायला मिळतो, जो ४०८० पानांची एक कविता सादर करत असतो. या चित्रपटात काही ठिकाणी हेवी मेटल म्युझिक आणि काही पॉर्न क्लिप्सदेखील पाहायला मिळतात. ‘द क्युअर फॉर इनसॉमनिया’ हा चित्रपट सर्वप्रथम शिकागोच्या ‘स्कूल ऑफ द आर्ट इंस्टीट्यूट’मध्ये दाखवण्यात आला होता. तिथे हा चित्रपट ३१ जानेवारी १९८७ या दिवशी दाखवायला सुरुवात केली आणि ३ फेब्रुवारी रोजी हा चित्रपट पूर्ण झाला होता. विशेष म्हणजे कोणत्याही इंटरव्हलशिवाय हा चित्रपट दाखवण्यात आला होता. (Hollywood Movie News)
================================
हे देखील वाचा : जेव्हा बॉलीवूडवर भारी पडली Maherchi Sadi इतका पैसा कमावला की…
================================
असं म्हटलं जातं की, हा चित्रपट ज्यांना झोप न् येण्याचा आजार आहे त्यांच्यासाठी बनवण्यात आला होता. यामुळेच याचं नावही याच आजाराशी संबंधित ठेवण्यात आलं होतं. ‘द क्युअर फॉर इनसॉमनिया’ या चित्रपटाच्या प्रिंट्स आणि अधिकृत फोटोज कुठे आहेत याचा पत्ता कुणालाही नाही. या चित्रपटाच्या जेवढ्या प्रिंट उपलब्ध होत्या त्या सगळ्या गहाळ झाल्याचं सांगितलं जातं. आताच्या काळात प्रेक्षकांना तीन तास चित्रपट पहाणं शक्य होत नाही, पण १९८७ मध्ये तब्बल ३ दिवस १५ तास लांबीचा एक चित्रपट रिलीज झाला होता यावर विश्वास बसत नाही! पण हेच सत्य आहे!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi