हिंदी सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणारी पहिली ट्रान्सजेंडर
२०१० साली बॉलिवूडमध्ये एक सिनेमा (Hindi cinema) आला ज्याने चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या सेक्स किंवा प्रणय दृश्यांची परिभाषाच बदलली. दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित ‘लव्ह सेक्स और धोका’ या चित्रपटाने सिनेविश्वात एक वेगळीच क्रांति आणली. असे बोल्ड विषय हे फक्त दीबाकर बॅनर्जीच हाताळू शकतात असं मत बऱ्याच प्रेक्षकांनी व्यक्त केलं. नुकताच या चित्रपटाच्या सीक्वलचा ट्रेलर प्रदर्शित झाला ज्याची सगळीकडेच चर्चा होताना दिसत आहे. पहिल्या भागाप्रमाणेच याचा दूसरा भागही अत्यंत बोल्ड असणार असल्याचं याच्या ट्रेलरवरुन स्पष्ट झालं आहे.
पहिल्या भागाप्रमाणेच याच्या सीक्वलमध्येही तीन वेगवेगळ्या कथा पाहायला मिळणार आहेत. पहिल्या भागात अंशूमन झा, राजकुमार राव, नुशरत भरूचासारखे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकले होते. तर या दुसऱ्या भागातही काही नवीन चेहेरे आपल्या पाहायला मिळणार आहेत. यापैकी चित्रपटात एका ट्रान्सजेंडरची भूमिका करणाऱ्या कलाकाराने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
या भूमिकेत काम करणारी व्यक्ति नेमकी आहे तरी कोण याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली होती. नुकतंच चित्रपटाची निर्माती एकता कपूरच्या बालाजी मोशन पिक्चर्सनी याबद्दल खुलासा केला आहे. ही ट्रान्सजेंडरची प्रमुख भूमिका निभावणाऱ्या व्यक्तीची ओळख आणि आजवरचा प्रवास पाहून तुम्हीदेखील भावूक व्हाल. ‘लव्ह सेक्स और धोका २’मध्ये कुलू ही भूमिका बोनीता राजपुरोहित या खऱ्या ट्रान्सजेंडरनी निभावली आहे. बॉलिवूडच्या एका मुख्य प्रवाहातील चित्रपटात ट्रान्सजेंडर महिलेला प्रथमच प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहे.(Hindi cinema)
राजस्थानच्या डुंगरी या छोट्या गावात बोनीता लहानाची मोठी झाली. ट्रान्सजेंडर लोकांच्या भूमिका मोठ्या पडद्यावर येत असल्याचं जेव्हा तिने पाहिलं तेव्हाच तिच्या मनात या क्षेत्राबद्दल कुतूहल निर्माण झालं अन् यामध्ये करियर करायचं म्हणून तिने एका प्रोडक्शन कंपनीमध्ये काम करायला सुरुवात केली. तेव्हा तिचा पगार हा जेमतेम १० ते १५ हजार इतकाच होता. चित्रपटात काम मिळेल असा विचार बोनीताने कधीच केला नव्हता. आता या चित्रपटात कोणाची भूमिका निभावण्याऐवजी बोनीताला स्वतःची भूमिका साकारायला मिळत आहे यासाठी ती खूप आनंदी आहे.(Hindi cinema)
===========
हे देखील वाचा : Deepika Padukoneच्या गाण्याने रचला इतिहास, अकादमी पुरस्कारांनी केला ‘या’ गाण्याचा सन्मान…
===========
या समाजात ट्रान्सजेंडर म्हणून वावरताना येणाऱ्या समस्या आणि दुःख याबद्दल बोनीताला या पात्रातून उघडपणे मांडता आलं. मुंबईत आल्यानंतर बोनीताला प्रचंड मेहनत घ्यावी लागली. पुरेसा पगार हाताशी नसल्याने तिने बऱ्याच रात्री स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर घालवल्या आहेत. यानंतर तिला हा ‘लव्ह सेक्स और धोका २’ हा चित्रपट मिळाला आहे ज्यामुळे तिचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीच्या (Hindi cinema) इतिहासात प्रथमच एक ट्रान्सजेंडर महिला चित्रपटात लीड अॅक्टर म्हणून दिसणार आहे. या भूमिकेसाठी बोनीताने चांगलीच मेहनत घेतली आहे. ‘लव्ह सेक्स और धोका २’मध्ये मौनी रॉय, तुषार कपूर, उर्फी जावेदसह इतरही बरेच कलाकार दिसणार आहेत. दीबाकर बॅनर्जी दिग्दर्शित या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. १९ एप्रिलला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.