सर्वाधिक कमाई करणारा ‘हा’ चित्रपट
अवतार…आठवतंय तेरा वर्षापूर्वी पांडोरा या निळ्या लोकांच्या साहसी आयुष्यावर आलेला चित्रपट. जेम्स कॅमेरून यांचा हा चित्रपट तेव्हा सर्व चित्रपटांपेक्षा सरस ठरला होता. स्पेशल इफेक्ट, ॲनिमेशन, कथा या सर्वांचाच चांगला मेळ असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान चालला. चित्रपटाचे हे यश बघता दिग्दर्शक जेम्स कॅमेरुन यांनी अवतारच्या पुढच्या भागाची घोषणा केली. चित्रपटाचा पुढचा भाग बहुंताशीवेळा एक किंवा दोन वर्षात मोठ्या पडद्यावर येतो. पण या अवतारची बातची वेगळी आहे, अवतारच्या पुढच्या भागासाठी प्रेक्षकांना तब्बल तेरा वर्षाची प्रतीक्षा करावी लागली. अखरे 16 डिसेंबर रोजी अवतार-द वे ऑफ वॉटर (Avatar-The Way of Water) हा मोठ्या पडद्यावर येतोय. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच सोशल मिडीयावर रिलीज झालाय. आणि ट्रेलर आल्या आल्या चित्रपटासाठी आगामी बुकींगही सुरु झालंय. हॉलिवूडच्या या पांडोरा जमातीच्या साहसकथेनं सर्व जगालाच भुरळ घातलीय. त्यामुळे अवतार-द वे ऑफ वॉटर (Avatar-The Way of Water) हा किती करोडो, अब्जोंची कमाई करणार याचीच चर्चा सरु झालीय.
सुमारे 13 वर्षापूर्वी हॉलिवूडमध्ये अवतार नावाचा चित्रपट आला होता. या सुपर डूपर चित्रपटाचा दुसरा भाग अवतार-द वे ऑफ वॉटर अखेर 16 डिसेंबर रोजी मोठ्या पडद्यावर येत आहे. त्याचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे आणि ट्रेलरला मिळालेल्या तुफान प्रतिसादाकडे पहाता हा अवतारचा हा दुसरा भागही जगभरातील बॉक्स ऑफीसवर तुफान घेऊन येणार आहे.
अवतार-द वे ऑफ वॉटर(Avatar-The Way of Water) चा ट्रेलर रिलीज झाल्यावर त्यातील व्हीएफएक्स पाहून प्रेक्षक हा चित्रपट बघण्यासाठी अधिक उत्सुक झाले आहेत. पांडोरा या निळ्या लोकांच्या दुनियेतील सुली कुटुंब (जेक, नेतिरी आणि त्यांची मुले) हे त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या संकटांपासून स्वतःला आणि कुटुंबाला कसे सुरक्षित ठेवतात हे या अवतारच्या भागात दाखवले जाणार आहे. अवतार-द वे ऑफ वॉटर(Avatar-The Way of Water) 16 डिसेंबर रोजी भारतात इंग्रजी आणि हिंदीसह तमिळ, तेलगू आणि मल्याळम या प्रादेशिक भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाचा पहिला भाग अवतार हा अकादमी पुरस्कार विजेता असून आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. अवतारच्या दुस-या भागाच्या पोस्टर लॉंचनिमित्त एक मोठा लाईट शो नायगारा धबधब्यावरही आयोजिक करण्यात आला होता.
जेम्स कॅमेरॉन दिग्दर्शित आणि जॉन लँडाऊ निर्मित, चित्रपटामध्ये सॅम वर्थिंग्टन, झो सालडाना, सिगॉर्नी वीव्हर, स्टीफन लँग आणि केट विन्सलेट यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाला जेम्स कॅमेरॉन, रिक जाफा आणि अमांडा सिल्व्हर यांची पटकथा आहे. 250 दशलक्ष डॉलर एवढे बजेट असलेल्या या चित्रपटामध्ये अनिमेशन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा अविष्कार पहाता येणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा बहुतांशी भाग हा पाण्याखाली चित्रित केला आहे. त्यासाठी या चित्रपटाच्या टीमने पाण्याखाली काही महिनाभर खास पद्धतीचा व्यायाम केला आहे.
========
हे देखील वाचा : एका सिनेमाच्या प्रीमियरमुळे वाचले चक्क संपूर्ण युनिटचे प्राण!
========
कॅमेरॉन यांनी अवतार यशस्वी झाल्यास त्याचा सिक्वेल बनवू असे 2006 मध्ये सांगितले होते. अवतारला व्यापक यश मिळाले. त्यानंतर 2010 मध्ये अवतारच्या दुस-या आणि तिस-या भागाची घोषणा केली. त्यावेळी अवतार-द वे ऑफ वॉटर(Avatar-The Way of Water) हा भाग 2014 मध्ये प्रदर्शित होईल असे लक्ष होते. मात्र त्यानंतर चित्रपटातील व्हीएसएक्सच्या वापरानं चित्रपटाचे प्रदर्शन लांबले गेले. अवतारच्या या दुस-या भागात अनेक दृश्ये पाण्याखाली चित्रित करण्यात आली. त्यासाठी नवीन तंत्रज्ञान विकसित करण्यात आले. 15 ऑगस्ट 2017 रोजी कॅलिफोर्नियाच्या मॅनहॅटन बीच येथे चित्रपटाचे प्राथमिक शूटिंग सुरू झाले. त्यानंतर 25 सप्टेंबर 2017 रोजी न्यूझीलंडमध्ये अवतारच्या तिस-या भागाचेही शुटींग सुरु झाले. तीन वर्षांहून अधिक काळ शूटिंग केल्यानंतर सप्टेंबर 2020 च्या अखेरीस अवतारचे शुटींग पूर्ण झाले. या चित्रपटाच्या एडीटींगचा भाग महत्त्वाचा होता. त्यासाठी दोन वर्ष अवतारच्या टिमनं दिली आणि त्याचाच परिणीती आता 16 डिसेंबर रोजी आपल्या सर्वांना मोठ्या पडद्यावर बघता येणार आहे. अवतारचा दुसरा भाग 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होईल, तर 20 डिसेंबर 2024 रोजी अवतारचा तिसरा भाग प्रदर्शित होईल. तर अवतारचा चौथा भाग 18 डिसेंबर 2026 रोजी आणि अखेरचा भाग 22 डिसेंबर 2028 रोजी प्रदर्शित होणार आहे. अवतार-द वे ऑफ वॉटर मध्ये नवीन मोशन कॅप्चर चित्रीकरण तंत्रांचा वापर केला आहे. हा चित्रपट 3D असून निवडक चित्रपटगृहांमध्ये 4D मध्येही बघता येणार आहे.
सई बने