‘द काश्मीर फाइल्स’चा वाद पुन्हा रंगणार
गोव्यात आयोजित 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांच्या एका वक्तव्यानं वादळ उठलं आहे. या महोत्सवात या वर्षात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट द काश्मिर फाइल्स (The Kashmir Files) प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट महोत्सवातील ज्यूरींचे प्रमुख असलेले चित्रपट निर्माते नदव लॅपिड यांनी या चित्रपटाला ‘व्हल्गर’ संबोधल्यानंतर सोशल मीडियावर वाद सुरू झाला आहे. आता हा वाद भारत आणि इस्रायल या दोन देशांच्या मैत्रीपर्यंतही पोहचला आहे. नदाव लॅपिड यांच्यावर याबाबत गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या वक्तव्याचा अभिनेते अनुपम खेर, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी विरोध केलाय. मात्र वादग्रस्त अभिनेत्री स्वरा भास्करने इस्रायली चित्रपट निर्मात्याला पाठिंबा दिल्यानं या वादाचं मोठं वादळ होईल अशी चिन्हे आहेत.
द काश्मीर फाइल्स (The Kashmir Files) हा चित्रपट 22 नोव्हेंबर रोजी गोव्यात आयोजित 53 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित करण्यात आला. चित्रपट निर्माते नदाव लॅपिड हे चित्रपट महोत्सवातील ज्यूरींचे प्रमुख आहेत. या महोत्सवातील आपल्या भाषणादरम्यान त्यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटामुळे आम्ही सर्वजण त्रस्त आणि आश्चर्यचकित झालो, कलात्मक स्पर्धा विभागासाठी आवश्यक नसलेला प्रचार आणि अश्लील चित्रपट म्हणून मला हा धक्का बसल्याचे त्यांनी सांगितले. इस्रायली चित्रपट निर्माते नदाव लॅपिड यांनी द काश्मीर फाइल्स चित्रपटाला थेट आश्लिल आणि वग्लर असं म्हटल्यामुळे वादाला तोंड फुटले आहे. सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. 11 मार्च रोजी प्रदर्शित झालेला काश्मिर फाइल्स(The Kashmir Files) प्रदर्शनापासून वादात राहिलाय. पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि अत्याचारावर हा चित्रपट आहे. यावरच नदाव यांनी बोट ठेवल्यामुळे त्याचे पडसाद मोठे उठणार आहेत.
नदाव लॅपिड यांनी चित्रपटाला अश्लील, अश्लील आणि अयोग्य म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर भारत आणि इस्रायलमध्ये टीका होत आहे. द काश्मीर फाइल्सचे(The Kashmir Files) दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी यावर अप्रत्यक्ष टिका केली आहे. त्यांच्याशिवाय अनुपम खेर, चित्रपट निर्माते अशोक पंडित आणि चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारे सुदीप्तो सेन यांनीही नदीवे यांच्या आक्षेपार्ह विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. विवेक रंजन अग्निहोत्री यांनी आपल्या ट्विटमध्ये सत्य ही सर्वात धोकादायक गोष्ट आहे. हे लोकांना खोटे बनवते, असे म्हटले आहे. तर अनुपम खेर यांनी द कश्मीर फाइल्स मधील काही छायाचित्रे शेअर केली आणि खोट्याची उंची कितीही जास्त असली तरी सत्याच्या तुलनेत ते नेहमीच लहान असते, असे ट्विट केले आहे. चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी नदाव लॅपिडचे बेजबाबदार विधान हे भारतीय चित्रपट निर्मात्यांचा अपमान असून काश्मिरी पंडितांच्या नरसंहाराची आणि सांस्कृतिक विध्वंसाची थट्टा करणाऱ्या परदेशी व्यक्तींवर बहिष्कार टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे. चित्रपट निर्माते आणि IFFI ज्युरी सदस्य सुदीप्तो सेन यांनी नदव लॅपिड यांचे वैयक्तिक मत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या विधानावर ज्युरी बोर्डाचे सदस्य सहमत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
========
हे देखील वाचा : “बेटे आज तुने मुझे हरा दिया!” असं किशोर कुमार अमित कुमारला का म्हणाले?
========
नदव लॅपिड यांच्या या विधानामुळे फक्त चित्रपट सृष्टीतच खळबळ उडाली नसून इस्रायलमध्येही टिका करण्यात आली आहे. इस्रायलचे राजदूत नाओर गिलन यांनीही तर याबाबत भारताची माफी मागितली आहे. लॅपिड यांच्या वक्तव्यावर माफी मागताना ते म्हणाले की, नदाव लॅपिड यांच्या वक्तव्याची मला लाज वाटत आहे. इस्त्रायली राजदूताने काश्मीर फाइल्सवर(The Kashmir Files) केलेल्या टीकेनंतर लॅपिड यांना एक खुले पत्र लिहिले आहे. भारत आणि इस्रायलमधील मैत्री घट्ट आहे आणि अशा कुठल्याही चुकीच्या वक्तव्यामुळे या मैत्रीची हानी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. नदाव यांना त्यांनी या पत्रात तुम्हाला लाज वाटायला हवी, असेही सुनावले आहे. तसेच भारतीय आमंत्रणाचा नदाव यांनी गैरवापर केल्याचेही इस्रायली राजदूतांनी म्हटले आहे.
इस्रायली राजदूतांनी नदाव यांना खुल्या पत्रातून सुनावल्यावरही हा वाद इथेच थांबेल अशी आशा नाही. कारण द काश्मीर फाइल्सवर सातत्यानं टिका करणारी वादग्रस्त अभिनेत्री स्वरा भास्कर हिला आयतं निमित्त मिळालं आहे. तिनं या वादात उडी घेतली आहे. संपूर्ण जग सत्य पहात असल्याचं ट्विट तिनं केल्यानं द काश्मीर फाइल्सचा(The Kashmir Files) वाद पुन्हा रंगणार अशी चिन्हे आहेत.
द काश्मीर फाईल्सवस(The Kashmir Files) अश्लिल हा शेरा मारणारे इस्रायली निर्माते नदाव लॅपिड यांचा जन्म तेल अवीव, इस्रायल येथे झाला आहे. नदाव लॅपिड यांनी फिल्मी दुनियेत पाऊल ठेवण्यापूर्वी इस्रायलच्या सैन्यात काम केले आहे. जेरुसलेममधील सॅम स्पीगल फिल्म अँड टेलिव्हिजन स्कूलमधून पदवी प्राप्त केली आहे. नदाव यांनी चित्रपटसृष्टीत अनेक उत्तमोत्तम चित्रपट दिले आहेत. नदाव लॅपिड हे लोकार्नो फिल्म फेस्टिव्हलमध्ये गोल्डन लेपर्ड ज्युरीचे सदस्य आहेत. 71व्या बर्लिन आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ते ज्युरी आहेत. मात्र आता हेच नदाव वादात सापडले आहेत. आता त्यांच्यावर एका वकीलानंही गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आठ महिन्यानंतर पुन्हा एकदा काश्मीर फाइल्स चर्चेत आला आहे.
सई बने