Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Amol Palekar यांनी राजेश खन्ना यांना नरभक्षक अभिनेता का म्हटलं?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

उद्या पाहायला मिळणार निळ्या जगाची जादू….

 उद्या पाहायला मिळणार निळ्या जगाची जादू….
कलाकृती विशेष

उद्या पाहायला मिळणार निळ्या जगाची जादू….

by सई बने 15/12/2022

जगातील सर्वात महागडा चित्रपट उद्या मोठ्या पडद्यावर येत आहे. अवतार- द वे ऑफ वॉटर(the way of water), हा दिग्दर्शक, लेखक जेम्स कॅमेरॉन यांच्या अवतार या दहा वर्षापूर्वी आलेल्या चित्रपटाचा दुसरा भाग.  या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर सर्व रेकॉर्ड तोडले.  फक्त कमाईतच नाही तर अॅनिमेशन, व्हीएफएक्स आणि अॅक्शनमध्येही अवतार सरस ठरला.  या चित्रपटाचा पुढचा भाग उद्यापासून जगभर प्रदर्शित होत आहे. जेम्स कॅमेरुन यांच्या आईंनं एकदा स्वप्नात असे निळे जग पाहिले होते. तिने हे स्वप्न जेम्स यांना सांगितले. कल्पात्मक दिग्दर्शक असलेल्या या मुलानं हे स्वप्न पडद्यावर साकारलं आणि या निळ्या जगाच्या जादूत आता अवघं जग हरवून गेलं आहे.  

जगातील सर्वात महागडा चित्रपट म्हणून प्रदर्शनापूर्वी गौरविलेला अवतार- द वे ऑफ वॉटर (the way of water) उद्या प्रदर्शित होत आहे.  या चित्रपटासाठी 250 दशलक्ष डॉलर्स खर्च झाले आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमेरॉनची आई शर्ली कॅमेरॉन यांच्या स्वप्नात एक निळ्या रंगाची मुलगी दिसली होती. या मुलीची लांबी सुमारे 12 फूट होती. त्यांनी हे स्वप्न जेम्सला सांगितली. त्यावरुन जेम्स यांनी या ग्रहाच्या कथेची कल्पना आली.  या ग्रहावर निळ्या रंगाचे लोक राहतात, त्यांची उंची 10 ते 12 फूट असेल, अशी त्यांनी कल्पना केली. अर्थात हा विचार जेम्स कॅमेरुन यांनी केला, तेव्हा त्यांचा आणखी एक विक्रमी चित्रपट, टायटॅनिक त्यांच्या कल्पनेतही नव्हता. जेम्स कॅमेरॉनने 2009 मध्ये अवतार हा चित्रपट प्रदर्शित केला.  तेव्हा या निळ्या जगानं, पॅडोंरानं प्रेक्षकांची मने जिंकली. त्यातून अवतचारच्या पुढचा भाग करण्याची तयारी जेम्स कॅमेरुन यांनी सुरु केली. तेरा वर्षाच्या मोठ्या काळानंतर हा दुसरा भाग प्रेक्षकांसमोर येत आहे.  अवतारच्या पहिल्या भागापेक्षाही त्याचा दुसरा भाग चर्चेत राहिला आहे. आता प्रदर्शनापूर्वीच चित्रपटांनं कमाईचे नवे विक्रम केले आहेत. शुक्रवारी, 16 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने आगाऊ बुकिंगमध्येच रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. या चित्रपटानं प्रदर्शनापूर्वीच असेच अनेक रेकॉर्ड केले आहेत.  2006 मध्ये जेम्स कॅमेरूनने या चित्रपटाची स्क्रिप्ट पुन्हा तयार केली आणि चित्रपटात दाखवलेल्या एलियनसाठी वेगळी भाषाही तयार केली. भाषातज्ञ डॉ. पॉल फ्रॉमर यांनी ही खास भाषा तयार केली. 1000 शब्दांपासून ही भाषा तयार करण्यात आली. त्यात जेम्स कॅमेरून यांनी 30 शब्द जोडले.  हा चित्रपट बनवण्यासाठी जेम्स कॅमेरून यांनी स्वतंत्रपणे सेटअपही उभारला. अवतारनं टायटॅनिक चित्रपटाचा विक्रम मोडला आणि जगातील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला.   अवतारचे पाच भाग येतील अशी माहिती आहे. अवतारचे(the way of water) हे 5 भाग बनवण्यासाठी एकूण 11 हजार 200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासह, ही जगातील सर्वात मोठी बजेट फिल्म फ्रेंचाइजी बनेल.

जेम्स कॅमेरून कदाचित अवतारचे सात भागही करण्याच्या विचारात आहे.  प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि बॉक्सऑफीस यांचा ताळमेळ ठेऊन ते अवतारे भाग वाढवण्याचा विचार करणार आहेत. अवतारच्या अडव्हान्स बुकींगमध्ये सुमारे साडेपाच लाख तिकिटांची विक्री झाली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी हा चित्रपट जगभरात 180 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 1400 कोटी कमाई करेल असा अंदाज आहे. हा चित्रपट जगभरात 52 हजार स्क्रीन्सवर तर भारतात 3 हजार स्क्रीन्सवर रिलीज होईल.

अवतारसाठी जेम्स कॅमेरुन यांनी खास तंत्रज्ञान वापरले आहे. सोनी कंपनीच्या सहकार्याने चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी नवीन कॅमेरा बनवला आहे.  अवतारच्या दुस-या भागात काही नवे चेहरे आहेत. दुसऱ्या भागात ‘फास्ट अँड फ्युरियस’ फेम विन डिझेलही डेब्यू करत आहे. याशिवाय ‘टायटॅनिक’ चित्रपटानंतर कॅट विन्सलेट पुन्हा एकदा या चित्रपटाद्वारे कॅमेरूनसोबत काम करत आहे. अवतारचा हा दुसरा भाग पाण्याखाली शूट करण्यात आला आहे. कॅमेरूनला चित्रपटातील प्रत्येक सीन खरा वाटावा, यासाठी त्यांनी बहुतांश दृश्ये पाण्याखाली शूट केली आणि त्यासाठी एक विशेष प्रशिक्षण सत्रही घेण्यात आले होते.  यात  चित्रपटातील प्रत्येक अभिनेत्याला विशेष प्रशिक्षण देण्यात आले.  पाण्याखाली शूट करण्यासाठी स्कूबा डायव्हिंग देखील शिकवले गेले.

=======

हे देखील वाचा : डेकोरेशन देते मुव्हीजचा फिल…

=======

चित्रपटातील डायनासोरच्या आवाजासाठी प्रोडक्शनने ‘जुरासिक पार्क’ चित्रपटातून डायनासोर व्हॉइस टेप्स उधार घेतल्या आहेत. दक्षिण कॅलिफोर्निया विद्यापीठातील एका शिक्षकाने पॅंडोराची भाषा तयार केली असून  चित्रपटातील कलाकारांनाही त्यांनी ही भाषा शिकवली आहे. इंग्रजीशिवाय अवतार द वे ऑफ वॉटर (the way of water) हा चित्रपट भारतात हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड आणि मल्याळम भाषेतही प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट 3D, 3DIMAX, 3D आणि 4DX मध्ये रिलीज होत आहे. आगाऊ बुकिंगमध्ये विकल्या गेलेल्या तिकिटांमधून चित्रपटाच्या केवळ इंग्रजी आवृत्तीने आतापर्यंत भारतात सुमारे 8 कोटी रुपये कमावले आहेत. चित्रपटाची एकूण आगाऊ बुकिंग सुमारे 13.50 कोटी रुपये झाली आहे. हिंदी भाषिक प्रेक्षकांमध्येही या चित्रपटाबद्दल खूप उत्साह आहे आणि केवळ आगाऊ बुकिंगमधून हिंदी आवृत्तीने आतापर्यंत सुमारे 2 कोटी रुपये कमावले आहेत. म्हणजेच पुढचा किमान महिनाभर तरी बॉक्सऑफीस अवतारमय राहणार आहे.

सई बने

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: avtar Entertainment Hollywood the way of water
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.