‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
पाकिजा सिनेमा आणि प्राण ह्यांचे माहीत नसलेले कनेक्शन…
भारतीय सिनेमाचे ऑस्कर म्हणजे फिल्मफेअर पुरस्कार! आजही या पुरस्काराचा दर्जा व रसिकांवरील प्रभाव अबाधित आहे. हा पुरस्कार मिळणं हा प्रत्येक कलावंताचं स्वप्न असतं. पण असं असतानाही हा पुरस्कार प्राणने चक्क नाकारला होता आणि त्याचं कारण देखील तितकच ’स्ट्रॉंग’ होतं व प्राण चे मोठेपण अधोरेखित करणारं होतं. कारण हा पुरस्कार त्याने वैयक्तिक कारणासाठी नाकारला नव्हताच. ही गोष्ट आहे १९७२ च्या फिल्मफेअर अॅवार्ड सेरेमनीची! या वेळी प्राण यांना सोहनलाल कंवर यांच्या ’बेईमान’ या सिनेमातील रामसिंग हवालदाराच्या भूमिकेकरीता सहायक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता. हा पुरस्कार त्यांनी नाकारला. कां? या सोहळ्यात याच ’बेईमान’ (सं. शंकर जयकिशन) सिनेमाला सर्वोत्कृष्ट संगीताचा फिल्मफेअर मिळाला होता. कुणाशी टक्कर देवून? तर कमाल अमरोहीच्या ’पाकीजा’ (सं. गुलाम महंमद) ला! आज बेईमानचं एकही गाणं आठवायचं म्हटल तरी आठवत नाही आणि पाकीजाचं एकूण एक गाणं लख्खं आठवतं! प्रश्न फक्त एवढाच नव्हता. पाकीजा चे संगीतकार गुलाम महंमद यांच निधन १९६६ ला झालं होतं. (पाकीजा चा निर्मितीचा कालावधी १०-१२ वर्षाचा होता). पाकीजा ची नायिका मीनाकुमारीचं निधन सिनेमा रीलीज नंतर काही दिवसातच झाले होते. एकूणच पाकीजाच्या बाबत गुणवत्तेसोबतच एक सांत्वनाची भावना होती. असे असताना त्या वर्षी एक नाही दोन नाही चक्क पाच पाच पारितोषिके ’बेईमान’ ला मिळतात ही भावना कुणाही रसिकाला चीड आणणारी होती. प्राण ची अवस्था देखील वेगळी नव्हती. त्याने काय करावे? त्याने स्वत:ला मिळालेला पुरस्कार नाकारून निषेध व्यक्त केला. आज पुरस्कारासाठी लॉबिंग करणारे बघितल्यावर प्राणचे हे वेगळेपण आणखी उठून दिसते.
याचा इम्पॅक्ट काय झाला. पुढे प्राण ला अनेक वेळा नामांकन मिळाली पण पुरस्कार मात्र एकदाही मिळाला नाही! १९९७ साली ’जीवन गौरव’ पुरस्कार तेवढा मिळाला. प्राण मधील एक ‘सच्च्या मानवाचे‘ दर्शन इथे घडते. आज प्राण वर चित्रित ‘जंजीर’ मधील गीत ऐकुया.