Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

 १८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य
Like Ani Subscribe Marathi Movie
मिक्स मसाला

१८ ॲाक्टोबरला उलगडणार ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे रहस्य

by Team KalakrutiMedia 26/08/2024

हल्ली बॉलीवुड प्रमाणे मराठी सिनेसृष्टीत ही अनेक वेगवेगळे विषय घेऊन सिनेमे बनवले जाताना पहायला मिळत आहेत.आता आपल्यासमोर असाच एका वेगळ्या विषयावर आधारित सिनेमा येणार आहे. हॅशटॅग, लाईक, शेअर, सबस्क्राईब हे शब्द हल्लीच्या जीवनातील अविभाज्य भाग बनले आहेत. काही दिवसांपासून सोशल मीडियावर ‘आपण शोधायचं का रोहित चौहानला?’ अशी पोस्ट व्हायरल होत होती. अनेकांना हा रोहित चौहान कोण असा प्रश्न पडला होता. तर आता हा रोहित चौहान कोण आहे, याचा १८ ॲाक्टोबरला ‘लाईक आणि सबस्क्राईब’ मधून उलगडा होणार असून या चित्रपटाचे एक नवीन पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.(Like Ani Subscribe Marathi Movie)

Like Ani Subscribe Marathi Movie
Like Ani Subscribe Marathi Movie

पोस्टरमध्ये अमृता खानविलकर, जुई भागवत आणि अमेय वाघ सेल्फी काढताना दिसत आहेत. सेल्फीत दिसणारे चेहरे आणि मागे दिसणाऱ्या चेहऱ्यांवरील हावभाव खूप वेगळे आहेत. या चेहऱ्यांमध्ये काही रहस्ये दडलेली दिसत आहेत. हे चेहरे काही वेगळंच सांगत आहेत. त्यामुळे ‘लाईक आणि सबस्क्राईब’मागे हे काय गुपित आहे. हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे. 

Like Ani Subscribe Marathi Movie
Like Ani Subscribe Marathi Movie

नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, एस. एन. प्रॉडक्शन्स एलएलपी आणि अभिषेक मेरूकर प्रॉडक्शन्स यांच्या सहकार्याने प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचे नितीन प्रकाश वैद्य, अभिषेक मेरूकर निर्माते असून ‘लाईक आणि सबस्क्राईब’चे लेखन आणि दिग्दर्शन अभिषेक मेरूकर यांनी केले आहे. यात अमेय वाघ, अमृता खानविलकर, शुभंकर तावडे, विठ्ठल काळे, जुई भागवत अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.(Like Ani Subscribe Marathi Movie)

=============================

हे देखील वाचा: ‘अहो विक्रमार्का’ चित्रपटात देव गिल झळकणार पोलिस अधिकाऱ्याच्या जबरदस्त भूमिकेत…

==============================

दिग्दर्शक अभिषेक मेरूकर म्हणतात की, ‘लाईक आणि सबस्क्राईब‘ हा दैनंदिन शब्द झाला आहे. रोजच्या जीवनात हा शब्द सर्रास ऐकला जातो आणि याच शब्दांभोवती फिरणारी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. हा एक रहस्यमय चित्रपट असून प्रेक्षकांना निश्चितच खुर्चीला खिळवून ठेवेल. येत्या १८ ॲाक्टोबरला रोहित चौहान कोण आहे, याचा उलगडा होईल.’’

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: amey wagh Amruta Khanvilakr Celebrity News Director Abhishek Merurkar Entertainment Like Ani Subscribe Marathi Movie Marathi Movie
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.