‘त्या’ घटनेनंतर अल्लू अर्जुन मौन सोडत त्याच्यावर होणाऱ्या आरोपांचे केले
‘चौदहवीं का चांद हो…’ हे गाणे सेन्सॉर बोर्डाने रिजेक्ट केले होते!
आपल्याकडे सिनेमाचे सेन्सॉर बोर्ड आधी खूपच जागरूक आणि तत्पर होते. अर्थात त्या काळातील सामाजिक परिस्थितीनुसार बऱ्यापैकी योग्य आणि कालसुसंगत होते असेच म्हणायला पाहिजे. कारण त्या काळात नायक नायिकांचे पडद्यावरील मिलन देखील सिम्बॉलिक पद्धतीने दाखवलेलेच सेन्सॉर बोर्डला चालत असे. बागेत नायक नायिका फिरताना दोन फुले एकमेकाला चिकटतात असे दृश्य तुम्ही बऱ्याचदा जुन्या चित्रपटात पाहिलं असेल!!
आजच्या तरुण पिढीला हा सर्व प्रकार हास्यास्पद वाटू शकतो. पण त्या काळातील सामाजिक परिस्थिती, बंधन आणि संस्कार पाहता सेन्सॉर बोर्ड काम करत होतं असं म्हणावं लागेल. पण कधी कधी मात्र अतिरेक व्हायचा आणि त्यांच्या अडेलतट्टू- पणामुळे काही निर्मात्यांना नाहक खूप त्रास व्हायचा. असाच त्रास निर्माता Gurudatt (Gurudatt) यांना त्यांच्या ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटासाठी झाला होता. हा त्रास इतका भयंकर होता की मोठा खर्च करून त्यांनी या चित्रपटातील एक गाणे कलरमध्ये शूट केले होते पण ते त्यांना या सिनेमात घेता आलेच नाही. कोणते होते ते गाणे आणि काय होता नेमका किस्सा? (Untold Stories)
‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट १९६० साली प्रदर्शित झाला होता. Gurudatt, Vahida Rehman, Johnny Walker आणि Rehman यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका होत्या. ‘कागज के फूल’ या गुरुदत्त (Gurudatt) यांच्या महत्त्वकांक्षी चित्रपटाच्या अपयशानंतर त्यांनी दिग्दर्शन करणे सोडून दिले होते. ‘चौदहवी का चांद’ या चित्रपटातील दिग्दर्शन जुन्या काळातील जाणकार दिग्दर्शक एम सादिक यांनी केले होते. चित्रपटाची गाणी शकील बदायुनी यांनी लिहिली होती तर संगीत रवी यांचे होते. या चित्रपटातील शीर्षक गीत ‘चौदहवी का चांद हो या आफताब हो….’ फारच सुंदर बनले होते.
आपल्या प्रेयसीची इतक्या सुंदर शब्दांमध्ये तारीफ क्वचितच दुसऱ्या एखाद्या गाण्यात आपल्याला दिसले असेल. होठो पे खेलती है तबस्सुम कि बिजलीया सजदे तुम्हारी राह में करती कहकशा दुनिया-ए- हुस्न-इश्क का तू म ही शबाब हो… शकीलच्या या शब्दांची तारीफ करावी की वहिदाच्या आरस्पानी सौंदर्यात अडकून पडावे की रफीच्या धुंद स्वराला दाद द्यावी की रवीच्या स्वर्गीय सुरांवर जान कुर्बान करावी हा प्रश्न प्रत्येक रसिकाला पडत होता! चित्रपटात हे गाणे Gurudatt (Gurudatt) यांनी कृष्णधवल रंगातच चित्रित केले कारण चित्रपटच ब्लॅक अँड व्हाईट मध्ये होता.
पण या काळामध्ये भारतामध्ये रंगीत चित्रपटांचा दौर सुरू झाला होता. पण त्या काळात त्यासाठी लागणारी टेक्नॉलॉजी ही बाहेरून आयात करावी लागायची. मोठ्या खर्चाचा मामला होता. त्यामुळे गुरुदत्त ने ‘चौदहवी का चांद’ हा चित्रपट पूर्णपणे ब्लॅक अँड व्हाईट मध्ये चित्रित केला. सेन्सॉर बोर्डाकडे पाठवला. तिथे तो पास झाला. खरं तर गुरूला हा सिनेमा कलरमध्ये चित्रित करायचा होता. याच काळात त्याने लंडनहून कलर सामग्री देखील मागवली होती. पण ती सामग्री यायला उशीर लागत होता. डिस्ट्रीब्यूटर चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दबाव वाढत होता. त्यामुळे गुरुदत्तने (Gurudatt) हा चित्रपट ब्लॅक अँड व्हाईट मध्येच रिलीज करायचे ठरवले. (Untold Stories)
पण त्याच वेळी गुरुदत्तची लंडनहून कलर प्रोसेसिंगसाठी लागणारी सामग्री आली आणि गुरुदत्तने चित्रपटाचे प्रदर्शन काही काळासाठी लांबवले. त्यानंतर Gurudatt ने या चित्रपटातील केवळ एकच गाणे ‘चौदहवी का चांद हो या आफताब हो…’ हे गाणे कलर मध्ये चित्रित करावयाचे ठरवले. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये हे गाणं अतिशय सुंदर चित्रित झालं होतं. त्यामुळे गुरुदत्तने (Gurudatt) फ्रेम टू फ्रेम तसेच शूट केले. फक्त कलर मध्ये. कलर चित्रीकरणासाठी त्या काळात मोठे मोठे आर्क लाईट्स वापरावे लागायचे या प्रखर प्रकाशाच्या आर्क लाइट्समुळे Vahida Rehman यांच्या डोळ्याला खूप त्रास झाला. डोळ्यावर आईस पॅक ठेवून तिने हे गाणे चित्रीत केले. पण या लाईटच्या प्रखरतेमुळे तिचे डोळे लालभडक झाले होते. तशा अवस्थेतच हे गाणे चित्रित झालं.
सर्वांना हे गाणं खूप आवडलं. Gurudatt (Gurudatt) ने हे गाणे पुन्हा सेन्सर बोर्डाकडे पाठवले. कारण ब्लॅक अँड व्हाईट चित्रपट जरी सेंसोर झाला असला तरी आता गाणं नव्याने चित्रित केलं होतं त्यामुळे ते पुन्हा त्याने सेन्सर बोर्डाकडे पाठवले. पण आता सेन्सर बोर्डाने हे गाणे नामंजूर केले!! हा सर्वांना मोठा धक्का होता. Gurudatt ने विचारले, ”का बरं तुम्ही रिजेक्ट केलं? सगळं तर सारखेच आहे फक्त कलर मध्ये केलय!” त्यावेळेला सेन्सर बोर्डाने त्याला उत्तर दिलं ते ऐकून सर्व जण चक्रावून गेले. बोर्डाचे अधिकारी म्हाणाले,” बरोबर आहे तुमचे. पण वहिदा रहमानचे डोळे या गाण्यांमध्ये खूप लालसर झालेले दिसतात. त्यामुळे ती खूप मादक वाटते आणि यातून तिची मादकता आणि सजेस्टिव नजर आम्हाला अश्लील वाटते. म्हणून हे गाणे आम्ही रिजेक्ट करत आहोत!”
============
हे देखील वाचा : पार्श्वगायक मुकेश यांचा शिर्डीतील डायहार्ड फॅन !
============
Gurudatt ने कपाळाला हात लावला. त्याने परोपरीने समजावून सांगितले ,” तिचे डोळे लाल झाले आहेत ते लाईटच्या प्रखर प्रकाशाने पण सेन्सर बोर्ड ऐकायला तयार नव्हते. त्यांनी ते गाणे रिजेक्ट केले. शेवटी गुरुदत्तने नाईलाजाने हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट मध्येच रिलीज केला! Gurudatt (Gurudatt) च्या मृत्यूनंतर जवळपास ४० वर्षानंतर हे गाणं प्रेक्षकांना बघायला मिळाले. (कलर मधील) आता युट्युब वर हे गाणे उपलब्ध आहे. तुम्ही देखील या गाण्याचा आनंद घेऊ शकतात. आजच्या पिढीला या गाण्यात काहीही वावगं वाटणार नाही. पण त्या काळातील सेन्सॉर बोर्डाला हे गाणे अश्लील वाटले होते हे नक्की!