Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Mukesh Khanna उधारीवर पैसे घेऊन सुरु केले होते’ शक्तिमान’; एक

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची  कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ लवकरच 

 शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची  कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ लवकरच 
Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial
टीव्ही वाले मिक्स मसाला

शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची  कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ लवकरच 

by रसिका शिंदे-पॉल 04/06/2024

आजच्या काळात प्रत्येक क्षेत्रात स्त्रियांचा सक्रिय सहभाग आहे.  वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कामगिरीने  दखल घ्यायला लावणाऱ्या अनेक कन्या आज आपल्या अभिमानाचा विषय  ठरत असताना सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या’ ही सध्या चर्चेचा विषय ठरते आहे. मनोरंजनातून प्रबोधन करत सध्या अनेक सामाजिक व अवतीभवती घडणारे विषय मालिकांमध्ये प्रभावीपणे मांडले जाऊ लागले आहेत. असाच वेगळा विषय असलेली ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ ही नवी मालिका ‘सोनी मराठी’ वाहिनीवर येत्या १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता पाहता येईल. श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांच्या ब्लॅक कॉफी प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेमार्फत या मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे.(Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial)

Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial
Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial

पीक पाण्यावर जगणारा शेतकरी अवघ्या जगाचा अन्नदाता आहे. शेतकरी हा ग्राम व्यवस्था आणि कृषी समाजरचनेचा कणा आहे. मात्र, आपला अन्नदाता म्हणजेच शेतकरी, तंत्रज्ञानाने कितीही विकसित झाला, कितीही प्रगत शेती केली, तरीही त्याला असंख्य गोष्टींचा सामना करावा लागतो. शेतकऱ्यांच्या आयुष्यातील वेगळी बाजू दाखवण्याचा प्रयत्न करताना शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका लढाऊवृत्तीच्या कन्येची  कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेतून पाहायला मिळणार आहे.

Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial
Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial

‘साद’ म्हणजे साथ होय. जगभरातील सर्वांकरिता झटणारा, मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आपल्याला आहे तो म्हणजे बळीराजा होय. ‘भूमिकन्या’ ही मालिका अशाच एका शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. बळीराम असे या शेतकऱ्याचे नाव असून तो आपल्या गावात शेती करणारा एक सामान्य शेतकरी आहे. आयुष्याकडे पाहण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही संघर्षमयी जीवनासमोर हार पत्करतात तर काहीजण कष्टप्रद जीवनावर मात करून स्वतःचं जगणं जिद्दीने सकारात्मक घडवतात. अशाच एका संघर्षमय जिद्दीची कथा आपल्यासमोर या  मालिकेतून उलगडणार आहे. मालिकेची नायिका लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत कणखर ‘भूमिकन्या’ म्हणून आपल्या वडिलांच्या पाठीशी कशी उभी ठाकते? याची रंजक कथा ‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’या मालिकेत पाहता येणार आहे.

=============================

हे देखील वाचा: संत मुक्ताबाईंचे आणि त्यांच्या कुटुंबाचे प्रेरणादायी चरित्र उलगडून दाखवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ २ ऑगस्टला भेटीला

=============================

‘भूमिकन्या – साद घालते निसर्गराजा’ मालिकेत अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडे व अभिनेता आनंद अलकुंटे, गौरव घाटणेकर प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. मालिकेचं दिग्दर्शन अवधूत पुरोहित यांचे आहे. ‘जमीन कसून तिचा मान राखणारी… एका राजाची जशी राजकन्या, तशी माझी भूमिकन्या’! असं  म्हणत, आपल्या मातीतली नवी कोरी गोष्ट १० जूनपासून सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता सोनी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे. 

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Actor anand alankunte Actor Gaurav Ghatnekar Actress Anushka Borhade Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Bhumikanya Saad Ghalate Nisargraja Serial Entertainment Marathi Serial Shruti Marathe Sony marathi sony marathi serial
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.