Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Khushboo Movie : बेचारा दिल क्या करे…!

Kajol हिने ‘३ इडियट्स’ का नाकारला होता? १६ वर्षांनी केला

Karishma Kapoor ने अभिषेक बच्चनसोबत ब्रेकअप केल्यानंतर काही महिन्यांनीच….

Dilip Kumar यांनी ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ हॉलिवूड चित्रपट नाकारलेला!

एकेकाळी ऑस्करमध्ये… आता बॉलीवूडमधून गायब ! कुठे आहेत Ashutosh Gowarikar

Airplane Crash : नाशिक-मुंबई प्लॅन क्रॅश; अभिनेत्याचा हात तुटला पण

Sushant Singh Rajput : अंतराळवीर होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या ताऱ्याची कथा!

Aamir Khan ३० वर्षांनंतर रजनीकांत यांच्या ‘या’ आगामी चित्रपटात दिसणार

Deepika Padukone : संदीप वांगा याच्या ‘स्पिरिट’मधून आता ‘या’ सुपरस्टारचा

Karishma Kapoor : बॉलिवूडमधला महागडा घटस्फोट ते अभिनेत्रीचा सौदा; मॅरेज

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

 Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित
Gulkand Movie Chanchal Song
मिक्स मसाला

Gulkand Movie Chanchal Song: प्रेमाचा गोडवा आता आणखी वाढणार; गुलकंद’मधील ‘चंचल’ प्रेमगीत प्रदर्शित

by Team KalakrutiMedia 12/03/2025

Everest Entertainment प्रस्तुत आणि वेलक्लाऊड प्रॉडक्शन्स निर्मित ‘गुलकंद’ या बहुप्रतीक्षित चित्रपटातील पहिलं वहिलं गाणं ‘चंचल‘ हे नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या चित्रपटातील या सुरेल गाण्यानं रसिकांच्या मनाला हळूवार स्पर्श केला आहे. गाण्यात दाखवण्यात आलेली प्रेमाची सुंदर आणि गोड दृश्यं प्रेक्षकांच्या मनात घर करणारी असून या भावपूर्ण गाण्यांना मंदार चोळकर यांनी शब्द बद्ध केले आहे तर अविनाश – विश्वजीत यांनी याला संगीत दिले आहे. ओठांवर सहज रुळणारं हे गाणं आनंदी जोशी आणि रोहित राऊत यांनी गायलं आहे. दोन्ही जोडप्यांच्या नात्यांमधील केमिस्ट्री आणि हलक्याफुलक्या क्षणांची गुंफण मनाला भिडणारी असून प्रेमाचे हे सुरेख क्षण या गाण्यातून सुंदरपणे टिपण्यात आले आहेत. (Gulkand Movie Chanchal Song)

Gulkand Movie Chanchal Song
Gulkand Movie Chanchal Song

सचिन मोटे लिखित आणि सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे यांसारखे तगडे कलाकार असणार आहेत. सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे..

Gulkand Movie Chanchal Song
Gulkand Movie Chanchal Song

दिग्दर्शक आणि निर्माते सचिन गोस्वामी म्हणतात, ” ‘गुलकंद‘ हा चित्रपट म्हणजे प्रेमाच्या गोड आठवणींचा साखरपाकच. प्रेम हा फक्त मोठ्या भावनांचा विषय नसून, ते लहानसहान क्षणांमध्ये, हलक्याफुलक्या हळवेपणात लपलेलं असतं. हेच या गाण्यातून आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. ‘गुलकंद’ हा चित्रपट प्रेमाच्या विविध छटांचा वेध घेणारा असून प्रेमात पडलेल्या प्रत्येकाला हे गाणं आवडेल.”

=====================================

हे देखील वाचा: Sant Dnyaneshwaranchi Muktai Movie: ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ चित्रपटातील कलाकारांचे आपल्या संत भूमिकेच्या रूपात दर्शन दिलं.

======================================

निर्माते संजय छाब्रिया म्हणतात, ” ‘गुलकंद‘ हा प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट आहे. प्रेमातील निरागसता आणि त्यातील हलकंफुलकं हास्य हे आम्ही या गाण्यातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी तुमच्या आमच्या घरातील गोष्ट असल्याचा भास या गाण्यातून होत आहे.”

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: gilkand marathi movie Gulkand Marathi Movie Song Gulkand Movie Chanchal Song jui bhagwant Marathi Movie Prasad Oak sai tamhankar sameer chughule
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.