Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

April May 99 Movie: ‘थ्री इडियट्स’च्या टीमने दिल्या ‘एप्रिल मे ९९’ ला शुभेच्छा; Riteish Deshmukhसह ‘या’ कलाकारांनी शेअर केला ट्रेलर !
April May 99 Movie: उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली असून ही सुट्टी अधिक कुल करण्यासाठी धमाल-मस्तीने भरलेला ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट येत्या २३ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मापुस्कर ब्रदर्सच्या या आगामी चित्रपटाचा धमाल ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून ‘थ्री इडियट्स’च्या टीमने म्हणजेच प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी, आर. माधवन, शर्मन जोशी यांच्यासह महाराष्ट्राचा लाडका भाऊ रितेश देशमुख यांनी आपल्या सोशल मीडियावरून हा ट्रेलर शेअर करत या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत. ट्रेलरमध्ये मैत्री, भावनांची गुंफण आणि नात्यांची गोडी अनुभवायला मिळत आहे. (April May 99 Marathi Movie)

एप्रिल -मे महिना म्हटला की अनेक जण कोकणांत गावाला जातात. आपल्या माणसांमध्ये, मित्रांमध्ये, शेजारच्या घरी, कुठेही, कसेही मनसोक्त वावरता आणि बागडता येते. ना वेळेचे बंधन ना कुठे जायचे बंधन. मस्त हुंदडत अख्खे गाव पालथे घालायचे. याच जुन्या आठवणीं ताज्या करण्यासाठी ‘एप्रिल मे ९९’ हा चित्रपट भेटीला येणार आहे. ‘एप्रिल मे ९९’ च्या ट्रेलरमध्ये कृष्णा, सिद्धेश आणि प्रसाद ही धमाल तिकडी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये धमाल करण्यासाठी सज्ज झाली असतानाच त्यांच्या सुट्टीच्या प्लॅनवर पालक विरजण घालताना दिसत आहेत. या सुट्ट्यांमध्ये त्यांची भेट जाईशी होते. जाईला कोकण फिरवत, तिच्यासोबत दंगामस्ती, धमाल करत असतानाच या दरम्यान त्यांच्यात निर्माण होणारी मैत्री, मस्तीचे क्षण आणि काही भावनिक वळणे या ट्रेलरमधून उलगडताना दिसत असून कोकणातील पार्श्वभूमीवर घडणारी ही गोष्ट प्रेक्षकांना त्यांच्या बालपणात घेऊन जाणारी आहे. निसर्गरम्य कोकणचे दर्शनही या निमित्ताने घडत आहे.

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक रोहन मापुस्कर म्हणतात, ”आपल्यापैकी अनेकांनी मे महिन्याची सुट्टी अशा पद्धतीने घालवली आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांची जागा ‘व्हेकेशन्स’ने घेतली आहे. अर्थात बाहेर फिरायला जाण्यात काहीच गैर नाही. प्रत्येकाची सुट्टीची व्याख्या वेगळी असते. असे असले तरी प्रत्येकाने आयुष्यात अशी सुट्टी नक्कीच एन्जॉय करावी. दिवसभर गावात हुंदडत, विहिरीत डुबक्या मारत, सायकलवर अख्खे गाव पालथे घालत, खोडकरपणा करण्यातली मज्जाच काही और आहे. हेच दाखवण्याचा प्रयत्न ‘एप्रिल मे ९९‘मध्ये करण्यात आला आहे. मोठ्यांना त्यांच्या सुट्टीची आठवण करून देणारा, लहानग्यांना उन्हाळ्याच्या सुट्टीची खरी व्याख्या सांगणारा आणि संपूर्ण कुटुंब एकत्र एन्जॉय करेल असा हा चित्रपट आहे. (April May 99 Marathi Movie)
======================================
हे देखील वाचा: April May 99 Movie: ‘एप्रिल मे ९९’ आता २३ मे रोजी होणार प्रदर्शित !
======================================
‘एप्रिल मे ९९’मध्ये आर्यन मेंगजी, श्रेयस थोरात, मंथन काणेकर, साजिरी जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. मापुस्कर ब्रदर्स इन असोसिएशन विथ फिंगर प्रिंट फिल्म्स, नेक्सस अलायन्स, थिंक टँक आणि मॅगीज पिक्चर्स प्रस्तुत ‘एप्रिल मे ९९’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन रोहन मापुस्कर यांनी केले असून राजेश मापुस्कर, मधुकर कोटीयन, जोगेश भूटानी , मॉरिस नून हे निर्माते आहेत तर लॉरेन्स डिसोझा सह निर्माते आहेत. येत्या २३ मे रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.