महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
‘मुसाफिर हूं यारो…’ गाण्याच्या निर्मितीचा भावस्पर्शी किस्सा!
आर डी बर्मन (R. D. Burman) – गुलजार – किशोर कुमार या त्रयीने सत्तर आणि ऐंशीच्या दशकातील हिंदी चित्रपट संगीत मेलडी सोबतच अर्थपूर्ण बनवलं. या तिघांचे पहिले गाणे कोणते? हे गाणे आज पन्नास वर्षांनतर देखील यातील माधुर्य, तत्वज्ञान आणि परफेक्ट स्वरामुळे रसिकांचे लाडके आहे. किशोर कुमारच्या टॉप टेन गाण्यांच्या यादीत याचा समावेश होतो. हे गाणं कसं बनलं याची खूप भावस्पर्शी स्टोरी आहे.
खरं तर या गाण्याच्या निर्मितीच्या वेळी संगीतकार राहुल देव बर्मन यांचा पहिल्या पत्नी पासून घटस्फोट झाला होता. पंचम तथा आर डी बर्मन (R. D. Burman) तेंव्हा अतिशय विमनस्क स्थितीत होते. उदास होते. दुःखी होते. पण या कठीण काळामध्ये त्यांनी या अप्रतिम गाण्याला स्वरबद्ध केलं होतं. कोणतं होतं ते गाणं आणि कोणता चित्रपट? अभिनेता जितेंद्र आणि जया भादुरी यांचा गुलजार दिग्दर्शित ‘परिचय’ हा चित्रपट एक कल्ट क्लासिक मुव्ही म्हणून आजही ओळखला जातो. साठच्या दशकातील ‘साउंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटाची छाया या सिनेमावर पडलेली असली तरी त्याचं भारतीयकरण गुलजार यांनी इतकं सुंदर केलं आहे की एक स्वतंत्र कलाकृती म्हणून त्याचा विचार करावाच लागतो.
या सिनेमातील सर्व गाणी गुलजार यांनीच लिहिली होती. ‘बीती ना बिताये रैना’ हे भूपिंदर सिंग यांनी लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं असो की ‘सारे के सारे गामा को लेकर गाते चले…’ हे अफलातून गाणं असो किंवा ‘मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना…’ असो. प्रत्येक गाणं परफेक्ट बनलं होतं. ‘मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना…’ या गाण्याची मेकिंगची स्टोरी अतिशय भावस्पर्शी आहे. (R. D. Burman)
१९६६ साली पंचम यांनी गीता पटेल या मुलीसोबत लग्न केले होते. खरंतर त्यांचा हा प्रेम विवाह होता. दार्जिलिंग मध्ये त्यांची भेट झाली होती. पण हे लग्न फार काळ टिकलं नाही. तीन-चार वर्षातच दोघां मध्ये विसंवाद सुरू झाला आणि १९७१ मध्ये त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. असं म्हणतात मुंबईच्या बाहेर एका हॉटेलमध्ये त्यांनी हा विभक्त होण्याचा निर्णय घेतला. योगायोगाने त्या हॉटेलमध्ये गुलजार आणि किशोर कुमार देखील उतरले होते. जेव्हा पंचमला (R. D. Burman) कळाले की आपले मित्र देखील आज हॉटेलमध्ये आहे त्याने त्यांना भेटून आपली सारी स्टोरी सांगितली.
पंचम (R. D. Burman) त्यावेळी खूप सॅड मूड मध्ये होते. किशोर कुमार आणि गुलजार या दोघांनी त्यांचे सांत्वन केले. पंचम म्हणाले, ”चला आज रात्रीच आपण मुंबईला जावू.” पंचम स्वत: गाडी ड्राईव्ह करत होते. गुलजार त्याच्या शेजारी बसले होते. तर किशोर कुमार मागच्या सीटवर बसले होते. पंचमचा मूड यावा म्हणून गुलजार यांनी आपल्या आगामी ‘परिचय’ या सिनेमातील गाण्याची सिच्युएशन त्याला सांगायला सुरुवात केली आणि एक ओळ ऐकवली.
’मुसाफिर हूं यारो…’ ही ओळ ऐकल्यावर पंचमने स्टीअरिंग वर ठेका धरला आणि ती ओळ गाऊन दाखवली. लगेच गुलजार यांनी पुढची ओळ ऐकवली ‘ना घर है ना ठिकाना….’ पंचमने (R. D. Burman) त्यालादेखील चाल लावली. आता गुलजार यांनी पुढचे ओळ ऐकवली ‘ मुझे चलते जाना है बस चलते जाना….’ हि ओळ ऐकल्यावर मात्र पंचमच्या डोळ्यात पाणी आले.
==============
हे देखील वाचा : ‘साजन’ चे संगीत एल पी कडून नदीम श्रवण यांच्याकडे कसे गेले?
==============
ते म्हणाले, ”ये लाईन तो मेरे आज कि सिच्युएशन मे फिट बैठती है…मुसाफिर हू यारो ना घर है ना ठिकाना….” गुलजार यांनी त्यांच्या खांद्यावर थोपटले. ते म्हणाले, ”संगीत हेच आपल्या दुःखावर सोल्युशन आहे.” असं त्यांनी सांगितले. मुंबईला पहाटे पर्यंत पोहोचे पर्यंत गाणं तयार झाले. आता अंतरे लिहिताना किशोरकुमार सुध्दा त्यांच्यात सामील झाला . पंचमची (R. D. Burman) क्रिएटिव्हिटी पहा अतिशय दुःखी वातावरणात एका नितांत सुंदर गाण्याची निर्मिती केली.