Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Raj Kapoor : आर के फिल्म्सचे एक्स्ट्रा फुटेज डिलिटेड शॉट्स

राहिल्या त्या आठवणी! Ajit Pawar आणि नाना पाटेकर यांचे आजवर

जेव्हा Gulzar यांची एक गझल चार संगीतकारांनी स्वरबद्ध केली!

Dhurandharने रचला नवा रेकॉर्ड; जगभरात ५६ दिवस प्रेक्षकांचं केलं मनोरंजन

Mayasabha : ‘तुंबाड’ विसरा… हा सिनेमा मेंदू सुन्न करेल!

थांबणं Arijit Singh याचं….

‘रणपति शिवराय स्वारी आग्रा’ चित्रपटाने जाहिर केली नवी रिलीज डेट!

रस्त्यात अडवून संगीतकार Sachin Dev Burman यांना कुणी आणि का

Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा जुंपणार; डॉन आणि सागरमध्ये होणार

Anil Kapoor :  १५ दिवसांमध्ये स्क्रिप्ट लिहिली आणि ३७ वर्षांपूर्वी

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

 तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला
kalakruti-the-trailer-of-marathi-movie-atmapamphlet-which-tells-a-slanted-comedy-love-story-is-out-marathi-info/
मिक्स मसाला

तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट’चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

by Team KalakrutiMedia 17/09/2023

अत्यंत अतरंगी, तिरकस विनोदी प्रेमकथा सांगणाऱ्या ‘आत्मपॅम्फ्लेट‘ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ट्रेलरची सुरुवातच अतिशय धमाकेदार असून प्रेक्षकांमध्ये चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवणारा हा ट्रेलर आहे. एका किशोरवयीन अतिसामान्य मुलाचे आत्मचरित्र यात पाहायला मिळणार आहे. हे आत्मपॅम्फ्लेट येत्या ६ ऑक्टोबरला चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे. आशिष अविनाश बेंडे दिग्दर्शित या चित्रपटाचे लेखन हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी आणि वाळवी यासारख्या भन्नाट चित्रपट देणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त परेश मोकाशी यांनी केले आहे. त्यामुळे ‘आत्मपॅम्फ्लेट’ मध्येही प्रेक्षकांना असेच काहीतरी भन्नाट पाहायला मिळणार हे नक्की. (Aatmapamphlet Marathi Movie)

Aatmapamphlet Marathi Movie
Aatmapamphlet Marathi Movie

अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या बर्लिन आंतराराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील स्पर्धात्मक विभागात आत्मपॅम्फ्लेटचा वर्ल्ड प्रीमियर झाला. तसेच नुकत्याच झालेल्या आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड्स ऑस्ट्रेलियामधे सत्तर देशांमधल्या चित्रपटांमधून सर्वोत्कृष्ट युथ फिल्मचा पुरस्कारही या चित्रपटाला मिळाला. ‘आत्मपॅम्फ्लेट’बद्दल दिग्दर्शक आशिष अविनाश बेंडे म्हणतात, “आत्मचरित्र थोरामोठ्यांचीच असतात असा सर्वसाधारण नियम आहे, पण अत्यंत सामान्य माणसाचं सुद्धा आत्मचरित्र असूच शकतं, आणि तेही तितकंच भन्नाट असू शकतं हेच ‘आत्मपॅम्फ्लेट’ मधून मांडण्यात आले आहे. कोवळ्या वयातील ही वरकरणी एक प्रेमकथा वाटेल पण नक्कीच हा सिनेमा त्याहूनही बरच काही सांगण्याचा प्रयत्न करतो. यातील प्रत्येक पात्र आपल्या आजूबाजूला दिसणारे आहे. प्रत्येकाला ही स्वतःचीच गोष्ट वाटेल.

Aatmapamphlet Marathi Movie
Aatmapamphlet Marathi Movie

आपल्या आवडत्या काळाचा नॉस्टॅलजिया देणारा आणि प्रत्येक वयोगटासाठीचा हा चित्रपट असेल.” या चित्रपटात ओम बेंडखळे, प्रांजली श्रीकांत, भीमराव मुडे आणि केतकी सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गुलशन कुमार, टी सिरीज फिल्म्स, कलर यल्लो प्रोडक्शन्स आणि झी स्टुडिओज प्रस्तुत, मयसभा करमणूक मंडळी निर्मित या चित्रपटाचे भूषण कुमार, क्रिशन कुमार, आनंद एल. राय, कनुप्रिया ए. अय्यर, मधुगंधा कुलकर्णी आणि झी स्टुडिओज ‘आत्मपॅम्फ्लेट’चे निर्माते आहेत. (Aatmapamphlet Marathi Movie)

=============================

हे देखील वाचा: Dil Dosti Deewangi: ‘बिग बॉस नंतरची वीणा आणि स्मिता यांची ‘दिल दोस्ती दिवानगी’…

=============================

नावावरूनच काहीतरी हटके असणारा हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. आतापर्यंत ‘आत्मपॅम्फ्लेट’चा बर्लिन आणि आशिया पॅसिफिक स्क्रीन अवॉर्ड बरोबरच टिफ ज्युनिअर, ६३वा झ्लीन फिल्म फेस्टिवल ऑफ चेक रिपब्लिक, इंडियन फिल्म फेस्टिवल ऑफ मेलबर्न, आयएफएफएसए टोरोंटो असा आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रवास झाला आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: #marathimovie Aatmapamphlet Marathi Movie Aatmapamphlet Movie Trailer Entertainment
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.