छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या Akshay Kumar याच्या ‘त्या’ चित्रपटाचं

Kajol पुन्हा कोर्टात उभी राहणार; ‘द ट्रायल’ सीझन २ ची घोषणा!
हिंदी चित्रपटसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री काजोल हिला नुकताच राज्य सरकारच्यावतीने स्व. राज कपूर विशेष योगदान पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला… ९०च्या दशकापासून विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन काजोलने केलं आहे… अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी काजोलची ओळख आहे… नुकताच तिचा शैतान फ्रेंचायझीमधील माँ हा चित्रपट रिलीज झाला… त्यासोबतच सरजमीन हा चित्रपटही ओटीटीवर रिलीज झाला.. आणि आता बहुप्रतिक्षित ‘द ट्रायल’ या तिच्या ओटीटी पदार्पणातील सीरीजचा दुसरा भाग लवकरच येणार आहे… कधी जाणून घेऊयात…

काजोलची ‘द ट्रायल-प्यार, कानून, धोका या सीरिजच्या पाहिल्या भागाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पहिल्या भागाला मिळालेल्या यशानंतर आता या सीरिजचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जिओ हॉटस्टारने काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून यात ती ‘द ट्रायल’ सीझन २ ची घोषणा करताना दिसत आहे. या सीझनमध्ये काजोल पुन्हा एकदा वकील नोयोनिका सेनगुप्ताच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. आता या नव्या सीझनमध्येही कोर्टरुम ड्रामा आणि भावनिक गुंतागुंत यांचं मिश्रण पाहायला मिळणार आहे…

‘द ट्रायल’ चा दुसरा सीझन १९ सप्टेंबर २०२५ रोजी जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. सीरिजच्या पहिल्या सीझनची कथा काजोलने साकारलेल्या वकील नयोनिका हिच्याभोवती फिरणारी होती… वकील असूनही घर-संसार सांभाळण्यासाठी ती काम सोडते. नयोनिकाच्या आयुष्यात मोठी संकट येतं, जेव्हा तिच्या पतीवर लोकांचा गैरफायदा घेतल्याचा आरोप करण्यात येतो. पती तुरुंगात गेल्यावर तिला कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना वकिलीचा व्यवसाय पुन्हा सुरू करावा लागतो. त्यानंतर नयोनिका एका लॉ फर्ममध्ये काम करायला सुरुवात करते. ‘द ट्रायल’ या वेब सीरिजची संपूर्ण कथा रॉबर्ट किंग आणि मिशेल किंग यांच्या ‘द गुड वाईफ’ या प्रसिद्ध अमेरिकन शोवरून प्रेरित आहे.
================================
हे देखील वाचा : “आता मी हिंदीत बोलू?”; मराठीत बोलत असतानाच Kajol का भडकली?
=================================
काजोलने आजवर ‘बेखुदी’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘गुप्त’, ‘इश्क’, ‘फना’, ‘कुछ कुछ होता है’, ‘तानाजी’, ‘कभी खुशी कभी गम’, ‘दिलवाले’ अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये तिने विविधांगी भूमिका साकारल्या आहेत…तसेच, लवकरच तिने मराठी चित्रपटात दमदार भूमिका साकारावी अशी प्रेक्षकांनी केलेली अपेक्षा कधी पुर्ण होणार याकजे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे… (Kajol Movies)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi