
संजीव कुमारच्या ‘फिल्मी बारशा’ चा वळणदार प्रवास
महान नाटककार विल्यम शेक्सपियर यांनी म्हटले आहे ‘नावात काय आहे?’ पण आपण बघतो आपल्या रोज मर्राच्या जिंदगीत नावातच सर्व आहे. चित्रपटाच्या दुनियेत तर नावाला खूप महत्त्व आहे. त्यामुळे कित्येक कलाकारांनी सिनेमासाठी आपले नाव बदलून घेतले. तर कित्येकांनी नावाचे स्पेलिंग बदलून घेतले.(Sanjeev Kumar)
सत्तरच्या दशकातील महान अभिनेता संजीव कुमार याने देखील आपले नाव सिनेमासाठी बदलले होते एकदा नाही तर अनेकदा. त्याच्या नावाची गंमत आणि तो किस्सा खूप ऐकण्यासारखा आहे. संजीव कुमार हा गुजराती रंगभूमीवरील एक आघाडीचा अभिनेता. त्याचे खरे नाव हरिहर जरीवाला. या नावानेच त्याने नाटकामध्ये काम सुरू केले होते. नंतर नशीब आजमावण्यासाठी तो मुंबईत नाटकात काम करू लागला. गुजरात मध्ये नावाच्या पुढे भाई लावण्याची पद्धत आहे. त्यामुळे हरिहरचा हरीभाई झाला आणि सर्वजण त्याला हरीभाई जरीवाला या नावाने ओळखू लागले. मुंबईच्या इप्टा या नाट्यसंस्थेसोबत त्याने अनेक नाटके केली याच नावाने. पण त्याची खरी आवड इच्छा मात्र सिनेमात काम करण्याची होती. सिनेमात काम करताना हरीभाई जरीवाला हे नाव काय चालणार नाही हे त्याला ठावूक होते. हे नाव एखाद्या पोक्त व्यक्तीचे वाटते त्यामुळे सिनेमासाठी एक चांगले फिल्मी नाव घ्यावे असे त्याला वाटत होते.(Sanjeev Kumar)

सिनेमासाठी त्याचा स्ट्रगल चालू होता. त्याला पहिल्यांदा ब्रेक मिळाला १९६१ सालच्या ‘हम हिंदुस्तानी’ या चित्रपटातून. या चित्रपटात त्याची अगदी छोटीशी भूमिका होती. या भूमिकेसाठी त्याने स्वतःचे नाव संजय कुमार असे ठरवले. त्याकाळी कुमार हे नाव लावायची खूप मोठी फॅशन होती. संजय कुमारच का याचे कारण हरिभाईच्या आईचे नाव शांतीदेवी होते आणि त्यांचे त्यांच्या आईवर प्रचंड प्रेम होते एस हे नाव आपल्यासाठी लकी आहे असे त्यांना वाटत होते त्यामुळे त्यांनी हे नाव घ्यायचे ठरवले. पण त्यांचे दुर्दैव असे की या सिनेमाच्या क्रेडिट्स मध्ये हे नाव आलेच नाही. त्याची भूमिका इतकी छोटी होती की त्याची दखल येथे घेतलीच नाही. यानंतर संजीव कुमार यांनी एका गुजराती चित्रपटात भूमिका केली. चित्रपटाचे नाव होते ‘रमत रमडे राम’. तिथे मात्र त्याच्या क्रेडिट मध्ये ‘संजय’ या नावाची नोंद झाली. यानंतर त्याचा पुढचा चित्रपट होता जॉय मुखर्जीचा ‘आओ प्यार करे’ या चित्रपटात देखील त्याचे नाव श्रेय नामावलीत ‘संजय’ म्हणूनच आले.
परंतु यावर्षी एक घटना घडली. राजश्री प्रोडक्शन चा ‘दोस्ती’ हा चित्रपट आला आणि प्रचंड हिट झाला. या चित्रपटात संजय खान या अभिनेत्याची एन्ट्री झाली. त्यामुळे आता बॉलीवूडमध्ये दोन संजय झाले. तेव्हा पुन्हा एकदा हरीभाई जरीवाला यांना आपले नाव बदलावेसे वाटले. याच काळात त्याची भेट कमाल अमरोही यांच्यासोबत झाली. कमाल अमरोही यांना हरिभाई चे रूप आणि अभिनय पसंत आला आणि त्यांनी त्यांच्या नेक्स्ट प्रोजेक्ट मध्ये त्याला घ्यायचे ठरवले. चित्रपटाचे नाव ठरले ‘शंकर हुसेन’ त्यावेळी कमल अमरोही म्हणाले,” तुझे नाव संजय आता कसे चालेल? कारण बॉलिवूडमध्ये आता आणखी एक संजय आला आहे. त्यामुळे तुझे नाव आता आपण बदलू. तुझे नाव आपण ‘गौतम राजवंश’ असे करू.” हरीभाई त्यावेळेला स्ट्रगल करत होते. त्यामुळे त्यांना तसा चॉईस नव्हता ते हो म्हणाले. पण नंतर कमाल अमरोही यांनी या फिल्म ऐवजी त्यांच्या जुन्या एका चित्रपटाचे पेंडिंग काम करू लागले हा चित्रपट होता ‘पाकीजा’. त्यामुळे ‘शंकर हुसैन’ हा चित्रपट मागे पडला.( नंतर १९७७ साली कमाल अमरोही यांनी कंवलजीत या अभिनेत्याला घेवून हा सिनेमा बनवला.) (Sanjeev Kumar)
===========
हे देखील वाचा : सर्व चित्रपट निर्मात्यांनी सार्दुल क्वात्रांच्यावर टाकला बहिष्कार..
===========
कमाल अमरोही यांचे प्रोजेक्ट हातातून गेल्यावर हरीभाई १९६४ साली ‘निशान’ या पोशाखी चित्रपटात काम करत होते. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते अस्पी इराणी. त्यांनी हरिभाई जरीवाला यांचे नामकरण संजीव कुमार (Sanjeev Kumar) असे केले. आणि अशा पद्धतीने हरिहर जरीवाला नंतर हरीभाई जरीवाला नंतर संजय कुमार नंतर संजय आणि शेवटी संजीव कुमार असा प्रवास होत होतं नाव फायनल झाले. गंमत म्हणजे जर 1965 सालीच शंकर हुसैन हा चित्रपट आला असता तर कदाचित हरीभाई जरीवालाचे गौतम राजवंश हे नाव झाले असते! पण तो प्रोजेक्ट त्यावेळी बनला नाही आणि हरीभाई चे नाव संजीव कुमार झाले! तर असा होता हरीभाईच्या नावाचा वळणे घेत घेत झालेला प्रवास.