Digital Lanjekar : योगी आदित्यनाथ आणि दिग्पाल यांच्या भेटीचा योग

‘या’ चित्रपटांनी मिळवले १००० कोटी क्लबमध्ये स्थान
चित्रपटांनी १०० कोटींची कमाई करणे आता सामान्य बाब झाली आहे. आजच्या काळात अनेक सुमार सिनेमे किंवा फ्लॉप सिनेमे देखील १०० कोटींची कमाई करताना दिसतात. मात्र आज १००० कोटींची कमाई करणे खूपच मोठी आणि मानाची बाब आहे. १००० कोटींची कमाई करणारे सिनेमे ब्लॉकबस्टर म्हणून देखील ओळखले जातात. सर्वच सिनेमांच्या बाबतीत असे होते असे नाही. अतिशय मोजके आणि निवडक सिनेमांना हा बहुमान मिळाला आहे. भारतीय मनोरंजन विश्वात आजवर ज्या सिनेमांनी १००० कोटींची कमाई केली ते कोणते चला जाणून घेऊया.
‘पुष्पा 2: द रुल’ या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सिनेमाने काही दिवसातच १००० कोटींची मोठी कमाई केली आहे. तेलुगु-भाषेतील ॲक्शन ड्रामा चित्रपट असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन सुकुमार यांनी केले आहे. या चित्रपटात रश्मिका मंदान्ना, फहद फासिल, जगपती बाबू, धनंजया, राव रमेश, सुनील आणि अनसूया भारद्वाज यांच्यासोबत अल्लू अर्जुन मुख्य भूमिकेत आहेत. पुष्पा 2 चित्रपट २०२१ मध्ये आलेल्या पुष्पा: द राइज चित्रपटाचा सिक्वेल आहे.

दंगल हा सिनेमा २०१६ साली प्रदर्शित झाला होता. माजी कुस्तीपटू असलेल्या महावीरसिंह फोगट यांच्यावर आधारित असलेल्या ह्या चित्रपटात आमिर खानने महावीरसिंह फोगटांची भूमिका साकारली होती. या सिनेमाने कमालीचे यश मिळवत बक्कळ कमाई देखील केली होती.

बाहुबली २: द कन्क्लुजन हा एस.एस. राजामौली दिग्दर्शित २०१७ साली प्रदर्शित झाला होता. तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये बनवलेल्या या चित्रपटात प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी, तमन्ना, रम्या कृष्णा, सत्यराज, नस्सर आणि सुब्बाराजू यांच्या भूमिका होत्या. बाहुबली: द बिगिनिंग या चित्रपटाचा बाहुबली २: द कन्क्लुजन हा दुसरा भाग होता. ‘बाहुबली २’ चित्रपटाने १७८८.०६ कोटींची कमाई केली होती.

RRR हा २०२२चा भारतीय तेलुगू -भाषेतील एपिक पीरियड अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे ज्याचे दिग्दर्शन एसएस राजामौली यांनी केले आहे. या चित्रपटात एनटी रामाराव जुनियर, राम चरण, अजय देवगण, आलिया भट्ट, श्रिया सरन, समुथिराकणी, रे स्टीव्हन्सन, अॅलिसन डूडी आणि ऑलिव्हिया मॉरिस यांच्या भूमिका आहेत. या सिनेमाने जगभरात १२३० कोटी रुपयांचा व्यवसाय केला.

के.जी.एफ़: चॅप्टर २ हा २०२२ चा भारतीय कन्नड-भाषेतील अॅक्शन चित्रपट आहे. प्रशांत नील लिखित आणि दिग्दर्शित हा सिनेमा २०१८ च्या के.जी.एफ़: चॅप्टर १ या चित्रपटाचा सिक्वेल आहे. या चित्रपटात यश, संजय दत्त, रवीना टंडन, श्रीनिधी शेट्टी आणि प्रकाश राज यांच्या भूमिका आहेत. केजीएफ: चॅप्टर २’ ने जगभरात १२१५ कोटींची कमाई केली आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘जवान’ने १००० कोटींच्या क्लबमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. या चित्रपटाने जगभरात ११६० कोटींची कमाई केली होती. जो अॅटली यांनी दिग्दर्शित केलेला पहिला हिंदी चित्रपट आहे.

शाहरुख खान आणि दीपिका पदुकोणच्या ‘पठाण’ चित्रपटाने जगभरात बॉक्स ऑफिसवर १०५५ कोटींचा व्यवसाय केला आहे. सिद्धार्थ आनंद लिखित आणि दिग्दर्शित आहे वाय आर येफ स्पाय युनिव्हर्स मधील हा चौथा सिनेमा होता.

‘कल्की 2898 एडी’ हा तेलुगु-भाषेतील चित्रपट देखील या यादीत आहे. या चित्रपटाने जगभरातून बॉक्स ऑफिसवर १०४२.२५ कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, कमल हासन, प्रभास, दीपिका पदुकोण, दिशा पटानी, शोबाना, पशुपती आणि अण्णा बेन यांच्यासह अनेक कलाकार आहेत.
