Jaran Marathi Movie Motion Picture: विवाहिता आणि बाहुली, काय आहे

महेश मांजरेकरांसाठी ‘हा’ अभिनेता ठेवणार डिटेक्टिव्ह
मराठी, हिंदीच्या जोडीने साऊथ इंडस्ट्रीतही गाजणारं मोठं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेते ‘महेश वामन मांजरेकर’! एका गंभीर आजारावर मात करूनही कामाप्रती असणारं त्यांचं प्रेम व एनर्जी सगळ्यांनाच थक्क करते. पण, याच कारणामुळे त्यांच्या मागे एखादा डिटेक्टिव्ह ठेवला तर? होय, अभिनेता ‘सिद्धार्थ जाधव’ याने नुकताच याबाबत एक गंमतीशीर खुलासा केला आहे.(LagnaKallol Movie)
‘सिद्धार्थ जाधव’चा ‘लग्नकल्लोळ’ हा नवा सिनेमा १ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने झालेल्या मुलाखतीत सिद्धार्थला ”इंडस्ट्रीतल्या कोणत्या व्यक्तीसाठी डिटेक्टीव्ह ठेवायला आवडेल ?” असा प्रश्न विचारला होता. त्यावर सिद्धार्थने ‘महेश मांजरेकर’ यांचं नाव घेतलं.
सिद्धार्थ म्हणाला, “मला जर चांगल्या अर्थाने डिटेक्टिव मागे लावायचा असेल, तर मी ‘महेश मांजरेकर’ सरांच्या मागे लावीन. एरवी माझ्या एनर्जी बद्दल एवढं कौतुक केलं जातं, पण मला त्यांच्या मेंदूत जो माणूस बसला आहे तो शोधून काढायला आवडेल. ॲक्टिंग, दिग्दर्शन, साऊथ इंडस्ट्रीतील कामं, हॉटेल सांभाळणं हे सगळं एकाचवेळी व तितक्याच पॅशनने, उत्साहाने करणं सोपं नाही. त्यांना एवढं काम करण्यासाठी नेमकी कोणती गोष्ट इनस्पायर करते, हे शोधून काढण्यासाठी मी त्यांच्यामागे नक्कीच डिटेक्टीव्ह लावीन. मला वाटतं, मी अश्या व्यक्तींच्या सानिध्यात राहिल्यामुळे कदाचित माझ्यातही ती एनर्जी आली असेल.” (LagnaKallol Movie) [ मुलाखत पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा]
सिद्धार्थच्या वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, १ मार्चपासून त्याचा ‘लग्नकल्लोळ’ हा सिनेमा प्रदर्शित होत आहे. यात त्याच्याबरोबर भूषण प्रधान व मयुरी देशमुख हे कलाकारही दिसणार आहेत. याशिवाय, छोट्या पडद्यावर त्याचा ‘आता होऊ दे धिंगाणा’ हा कार्यक्रमही प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करत आहे. तर दुसरीकडे, ‘महेश वामन मांजरेकर’ दिग्दर्शित व श्रेयस तळपदे, सुहास जोशी, शरद पोंक्षे, गौरी इंगावले यांसारख्या उत्तम कलाकारांनी नटलेला ‘हि अनोखी गाठ’ हा सिनेमा देखील त्याच दिवशी म्हणजे, १ मार्चपासूनच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्यामुळे आता कोणता सिनेमा प्रेक्षकांच्या अधिक पसंतीस उतरतो हे पाहणं रंजक ठरणार आहे.(LagnaKallol Movie)
त्याचप्रमाणे, अधिक मनोरंजनासाठी व मुलाखत संपूर्ण पाहण्यासाठी ‘कलाकृती मिडिया’च्या यूट्यूब चॅनलला नक्की भेट द्या.