दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
चक्क ‘या’ अभिनेत्रीने गायले बंगाली भाषेत गाणे
प्रत्येकाच्या आतमध्ये एक गायक कलाकार दडलेला असतो असे म्हणतात. अर्थात प्रत्येकजण आतील गायकीला बाहेर काढेलंच असे काही नसते. पण ‘बाथरूम सिंगर’ मात्र सर्वजण असतात. कलावंतांच्या बाबतीत बऱ्याचदा त्यांना स्वतःला गावे लागते. बोलपट सुरु झाला तेव्हा एक काळ असा होता जेव्हा प्रत्येक कलाकाराला स्वतःवर चित्रित होणारे गाणं स्वतःच गावे लागत असे कारण तेव्हा पार्श्वगायनाचे तंत्र विकसित झाले नव्हते. पण नंतर १९३५ सालानंतर पार्श्वगायन भारतीय सिनेमांमध्ये सुरू झाले आणि पार्श्वगायकांची एक नवीन पिढी निर्माण झाली. असे असले तरी लोकप्रिय कलाकारांनी बऱ्याचदा गाणी गायली आहेत. कधी हौस म्हणून तर लोकप्रियतेच्या लाटेवर स्वर होत गायली आहेत. आज मी तुम्हाला ड्रीम गर्ल हेमामालिनी हिने गायलेल्या एका गाण्याचा किस्सा सांगणार आहे. तिने गायलेले हे गाणे तिच्या मातृभाषेतील किंवा राष्ट्रभाषेतील नसून चक्क बंगाली भाषेतील आहे! हेमा मालिनी आणि बंगाली भाषा हे कुठेही न जुळणारे असे समीकरण आहे पण तरीही ते साकार झाले. हेमाचे ते गाणे आजही बंगाली भाषेत लोकप्रिय आहे. हा योग कसा जुळून आला होता कुणी जुळवून आणला ? त्याचाच हा किस्सा.(Bengali Song)
तेव्हा म्हणजे १९७३ साली, जेव्हा हेमामालिनी हिंदी सिनेमाची नंबर एकची अभिनेत्री बनली होती त्यावेळी गायक आणि संगीतकार किशोर कुमार हे एका बंगाली अल्बमवर काम करत होते. किशोर कुमार अतिशय लहरी माणूस. त्यांच्या डोक्यात काय आले माहिती नाही परंतु यातील गाणी हेमामालिनी यांनी गावीत असे त्यांना वाटले. लगेच त्यांनी हेमा मालिनीला कॉन्टॅक्ट केला. हेमा मालिनीने कानावर हात ठेवले. ती म्हणाली ,”नही बाबा नही. मै गाना नही गा सकती!” परंतु किशोर कुमार हा मागे हटणाऱ्यातला नव्हता. त्याने हेमाला हर प्रकारे समजून सांगितले आणि ,”तुझ्या स्वरात हे गाणे अतिशय चांगले लोकप्रिय होईल!” हे पटवून सांगितले. भरपूर ब्रेन स्टॉर्मिंग झाल्यानंतर हेमा मालिनी हे गाणं गायला तयार झाली पण जेव्हा हेमाला कळाले की, हे गाणे बंगाली भाषेत आहे तेव्हा तर तिचे धाबे दणाणले! ती म्हणाली,” मी हिंदीच व्यवस्थित बोलू शकत नाही बंगाली काय कप्पाळ गाणार?” त्यावर किशोर कुमारने तिला सांगितले ,”आपण बंगाली शब्द इंग्रजीमध्ये लिहून घेऊ आणि त्याची भरपूर रिहर्सल करू!” हो ना हो ना करत करत करत हेमा मालिनी अखेर गाणे गायला तयार झाली. या गाण्याचे शब्द मुकुल दत्त यांनी लिहिले होते. हेमा मालिनी जाम घाबरली होती. परंतु किशोर कुमारने तिची भरपूर प्रॅक्टिस घेतली आणि तिच्याकडून व्यवस्थितरित्या हे गाणे गाऊन घेतले. गाण्याचे बोल होते’ गुन गुन गुन केमोजे मोर…’ या गाण्याची युट्युब लिंक मी आपल्याला दिली आहे. हे गाणे नक्की ऐका. याच अल्बममध्ये हेमामालिनीचे आणखी एक गाणे होती या गाण्याचे बोल होते ‘कादे मोन पियासी..’ बंगालमध्ये दुर्गा पुजाच्या निमित्ताने येणाऱ्या रेकॉर्ड्समध्ये हे दोन गाणे सामील झाली होती आणि रसिकांनी त्याची प्रचंड स्वागत केले होते. आज देखील बंगालमध्ये हे गाणे चांगलेच लोकप्रिय आहेत.(Bengali Song)
अशा पद्धतीने हेमामालिनीचे पहिले पार्श्वगायन बंगालीमध्ये झाले होते. दुर्दैवाने ही गाणी बंगालच्या बाहेर फारशी आली नाहीत त्यामुळे बऱ्याच जणांनी ही ऐकलेली नाहीत. यानंतर १९७४ साली मनमोहन देसाई यांच्या ‘हाथ की सफाई’ या चित्रपटात किशोर कुमार सोबत हेमामालिनी ने एक युगलगीत गायले. गाण्याचे बोल होते ‘पीने वालो को पीने का बहाना चाहिये’ हे गाणे किशोर कुमार खूप मस्तीत गायले होते. या गाण्यांमध्ये फक्त हेमामालिनीला काही ओळी गायच्या होत्या. देवदास मितवा गाओ, चंद्रमुखी के पास आओ…. हे गाणे त्या काळात प्रचंड लोकप्रिय झाले होते चित्रपटात हे गाणे रणधीर कपूर आणि हेमामालिनी यांच्यावर चित्रित झाले होते यानंतर ‘ड्रीम गर्ल’(१९७७) या चित्रपटात किशोर कुमार सोबत पुन्हा एकदा हेमामालिनीने पार्श्वगायन केले परंतु या गाण्यांमध्ये गाण्याच्या सुरुवातीला हेमामालिनीला एक डायलॉग म्हणायचा होता आणि त्यानंतर किशोर कुमारचे गाणे सुरुवात होते परंतु रेकॉर्डवर त्या डायलॉग सहित ते गाणे असल्यामुळे रेकॉर्डिंगला हेमामालिनी उपस्थित होते लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी स्वरबद्ध केलेलं हे गाणं त्या काळात फारसं चाललं नाही परंतु ऐकायला खूप गोड आहे ‘तू जाने वफा है मेरी दिलरुबा है..’ . असाच काहीसा प्रकार आर डी बर्मन यांनी ‘किनारा’ या चित्रपटासाठी देखील केला होता. या चित्रपटात भूपेंद्र सिंग यांनी गायलेल्या ‘एक ही ख्वाब कई बार देखा है मैने..’ या गाण्यात काही शब्द आणि एक सुंदर आलाप हेमा मालिनी घेतला आहे. (Bengali Song)
=========
हे देखील वाचा : वाघाच्या तावडीतून ‘या’ अभिनेत्याने वाचवले राखीचे प्राण
=========
यानंतर मात्र हेमामालिनीने पार्श्वगायन केल्याचे ऐकू येत नाही. अशा बॉलीवूडमधील काही दुर्मिळ गोष्टी वाचल्या की गंमत वाटते. खरंतर हेमामालिनीच्या हिंदी डायलॉग डिलिव्हरी मध्ये देखील तिच्या दाक्षिणात्य शैलीचा प्रभाव वाटतो. असे असताना तिने चक्क बंगाली भाषेमध्ये पार्श्वगायन केले ही खूप मोठी गोष्ट आहे. ही किमया साध्य केली किशोर कुमार ने! तिच्या बंगाली गाण्याची युट्युब लिंक मी दिलेली आहे. वाचकांनी नक्की या गाण्याचा आनंद घ्यावा. हेमा मालिनीने स्वतः २०१७ साली किशोर कुमार यांच्या जन्मदिनी म्हणजे चार ऑगस्टला ट्वीट करून या गाण्याबाबतच्या काही आठवणी शेअर केल्या होत्या. त्यानंतर गुगलवर या गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेचे काही फोटो देखील बऱ्यापैकी व्हायरल झाले होते. बॉलीवूडमध्ये अशा बऱ्याच अननोन घटना आहेत ज्या ऐकल्या, वाचल्या की खूप गंमत वाटते ! अलीकडे हेमाने बाबुल सुप्रियो सोबत ही गाणी पुन्हा एकदा री क्रियेट करून रिलीज केली !