Madhugandha Kulkarni मधुगंधा कुलकर्णीने केले, हेमंत ढोमेच्या ‘फसक्लास दाभाडे’चे भरभरून
शैलेंद्रने रागाच्या भरात लिहिलेल्या दोन ओळीतून बनलं हे फेमस गाणं!
२१ एप्रिल १९४९ रोजी प्रदर्शित झालेल्या आर के फिल्म्सच्या ‘बरसात’ या चित्रपटाने भारतीय चित्रपट संगीताला (Song) नवी दिशा दिली. हा चित्रपट म्हणजे संगीतातील नवे ‘मन्वंतर’ होते. नवे गायक, नवी गायिका, नवे संगीतकार, नवे गीतकार असा सर्वत्र नवतेचा शृंगार घेऊन ‘बरसात’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटापासून नायक राजकपूर, संगीतकार शंकर जयकिशन गीतकार शैलेंद्र आणि हसरत जयपुरी, गायक मुकेश आणि गायिका लता मंगेशकर असे एक समीकरण बनले. या टीमने भारतीय चित्रपट संगीताला समृद्ध केले. संगीतकार शंकर जयकिशन आणि गीतकार हसरत जयपुरी व शैलेंद्र या चौघांची तर स्पेशल टीम होती. शंकर जय किशन यांनी फार अपवादात्मक परिस्थितीत इतर गीतकारांसोबत काम केले. या टीम मध्ये काम करत असताना शैलेंद्र आणि हसरत जयपुरी या दोघांनी एकाच चित्रपटासाठी जरी गाणी लिहिली तरी कोणते गाणे शैलेंद्रचे आहे आणि कोणते हसरे जयपुरीचे आहे हे लवकर लक्षात येत नव्हते. इतकं ते एकमेकात मिसळून गेले होते. शंकर आणि शैलेंद्र आणि हसरत आणि जय किशन अशा सोयीच्या विभागण्या त्यांच्याकडे झाल्यावर होत्या असे म्हणतात. या जोडी बाबतच्या अनेक वदंता आजही सिने रसिक सांगत असतात. जसे शंकर गंभीर आणि नृत्य विषयक गाणे असतील तर संगीत (Song) द्यायचे तर रोमँटिक आणि उडत्या चालीची गाणी असतील तर त्याला जयकिशन स्वरबद्ध करीत असे. अर्थात हे सगळं असंच घडत असेल कां माहिती नाही. यातील खरा भाग किती हे ही माहिती नाही पण अशा अनेक बातम्या आजही रसिकांच्या विविध डिजिटल गप्पांच्या कट्ट्यावर होत असतात. साधारणत: १९६५ सालानंतर या शंकर जय किशन युतीमध्ये फूट पडायला लागली पण त्यापूर्वी एका प्रसंगामध्ये या टीम मध्येच फूट होती. वाचली होती! राज कपूर यांच्या समंजसपणामुळे. नेमकं काय घडलं होतं? काय होता हा किस्सा?
१९५९ साली दक्षिणात्य निर्माते दिग्दर्शक टी प्रकाशराव एक चित्रपट बनवत होते ‘कॉलेज गर्ल’. या चित्रपटाला शंकर जयकिशन संगीत होते. परंतु गीतकार म्हणून राजेंद्र कृष्ण होते! आर के ची टीम त्यावेळी अतिशय घट्ट होती. एकमेकांच्यावर विश्वास होता. विश्वासाच्या नात्याला प्रेमाचा धाक होता. ज्यावेळी शैलेंद्र यांना असे कळाले की, शंकर जयकिशन एका दुसऱ्या गीतकारासोबत काम करत आहेत. त्यावेळेला ते प्रचंड नाराज झाले, चिडले, रागावले. आणि ताबडतोब आपली गाडी काढून तडक हजरत जयपुरी यांच्या घरी ते गेले. हसरत यांना गाडीत घेतल्यानंतर ते दोघे महालक्ष्मीच्या फेमस स्टुडिओमध्ये गेले. जिथे संगीतकार शंकर जयकिशन यांची म्युझिक रूम होती. दोघेही एस जे यांच्या या कृतीवर प्रचंड नाराज झाले होते. दोघांच्या मनात प्रचंड राग होता आणि यापुढे शंकर-जयकिशन सोबत कामच करायचे नाही असे देखील त्यांनी मनोमन ठरवले होते.(Song)
महालक्ष्मीला पोहोचल्यानंतर तिथे म्युझिक रूममध्ये शंकर जयकिशन उपस्थित नव्हते. शैलेंद्र यांचा रागाचा पारा आणखी चढला. त्यांनी तिथल्या ऑफिस बॉयला एक पेन आणि कागद घेऊन यायला सांगितले. त्या कागदावर त्यांनी रागारागात दोन ओळी खरडल्या आणि त्या ऑफिस बॉयच्या हातात देऊन,” ज्यावेळेला शंकर जयकिशन येतील त्यावेळेला त्यांच्याकडे हा कागद दे!” असा निरोप दिला. शैलेंद्र आणि हसरत जयपुरी शंकर जयकिशन वर प्रचंड नाराज आहेत आणि ते त्यांच्यासोबत काम करणार नाहीत अशी बातमी राज कपूरकडे गेली. आपला आर के चा डोलारा संपूर्णपणे या टीमवर अवलंबून आहे आणि या फूट पडता कामा नये असं राजकपूरला मनोमन वाटलं. अर्थात त्यावेळेला त्यांना असेही वाटले की, कदाचित हे चहाच्या पेल्यातील वादळ असावे. म्हणून राजकपूरने त्या चौघांना म्हणजे शंकर, जयकिशन, शैलेंद्र आणि हसरत यांना चौपाटीवर बोलावले. मस्तपैकी भेळ पाणीपुरी खाऊ घातली आणि सांगितले,” आजपासून मी चित्रपट निर्मिती बंद केली आहे! ही आपली फेअर वेळ पार्टी !” सर्वांना खूपच आश्चर्य वाटले. त्यांना हे अनएक्सपेक्टेड होतं. त्यांनी कारण विचारले असता राजकपूर म्हणाले,” मी चित्रपट निर्मिती कशी करणार? कारण माझ्या चित्रपट निर्मितीचे प्रमुख चार खांब आपण चोघे आहात आणि तुम्हीच एकमेकांसोबत काम करू शकणार नाहीत तर मी तरी चित्रपट कसा बनवणार?”
======
हे देखील वाचा : ‘दिवार’मध्ये अमिताभ ऐवजी दिसले असते राजेश खन्ना
======
राज कपूर यांच्या या प्रश्नावर चौघे निरुत्तर झाले आणि त्यांनी आपापसातले मतभेद मिटवले आणि पुन्हा एकत्र काम करायला मान्यता दिली. राजकपूर खुश झाला. आणखी एक रगडा पॅटीस मागवले, पाणी पुरी खिलवली आणि खुशीत सगळेजण घरी गेले. वादळ मिटले होते. राजकपूरच्या मध्यस्थीने! पुढे काही दिवसानंतर शैलेंद्र यांना शंकर यांनी फेमस स्टुडिओमध्ये बोलावले आणि त्यांना सांगितले,” तुम्ही लिहिलेला गाण्याचा मुखडा खूप चांगला आहे आता याच्यावर ताबडतोब संपूर्ण गाणे लिहून द्या.” त्यावर शैलेंद्र म्हणाला,” मी कधी मुखडा लिहिला? मी कुठले गाणे आता लिहिलेलेच नाही!” त्यावर शंकर जयकिशन हसत हसत म्हणाले,” नाही कसं? तुम्हीच तर हे लिहिले आहे.” असं म्हणून त्यांनी तो त्या ऑफिस बॉयला दिलेला कागद दाखवला. त्यावर रागारागात शैलेंद्र लिहिलेल्या ओळी एका गाण्याचा मुखडा बनला आणि हे गाणं (Song) प्रचंड लोकप्रिय ठरलं! त्या ओळी होत्या’ छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है तुम कही तो मिलोगे कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल…’ पुढे ‘रंगोली’ या १९६२ साली आलेल्या चित्रपटात हे गाणे घेतले गेले जे किशोर ने गायले होते!