Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    Madhuri Dixit

    Madhuri Dixit ने तिचे फिल्मफेयर अवार्ड समीक्षकांना कां समर्पित केले?

    Rajesh Khanna

    Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे

    bhupendar singh

    Bhupinder Singh : भूपिंदर सिंग : दिल ढूंढता है फुरसत के रात दिन…

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Karate Kid Legends : अजय आणि युग देवगणच्या चित्रपटाने भारतात

Kapil Talvalkar : शरद तळवलकरांचा नातू गाजवतोय हॉलिवूड!

Jaya Bachchan आपल्या त्वचेला नितळ बनवण्यासाठी वापरतात ‘हा’ स्पेशल आणि

Media Excellence Awards: ‘मीडिया एक्सलेन्स अवॉर्ड्स २०२५’; सन्मान गुणवंत, कर्तृत्ववान,

Siddharth Jadhav : ऑडिशनच्या भानगडीत न पडणारा मी नागराज मंजुळेंच्या

अमिताभ बच्चन आणि Kamal Haasan यांचा हा सिनेमा अर्धवटच राहीला!

Housefull 5 :  मल्टि क्लायमॅक्स चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाची कात्री; जाणून

Netflix  वर सुपरहिट ६ वेब सीरीजच्या सीझन्सची घोषणा!

Guru Dutt : ‘प्यासा’ ;गुरुदत्तचा बायोपिक विकी कौशल साकारणार

The royals : भूमी-ईशान लवकरच घेऊन येणार रॉयल्सचा दुसरा सीझन!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

‘या’ हिरोला किसिंग शॉटच्या वेळी घाम फुटला होता!

 ‘या’ हिरोला किसिंग शॉटच्या वेळी घाम फुटला होता!
बात पुरानी बडी सुहानी

‘या’ हिरोला किसिंग शॉटच्या वेळी घाम फुटला होता!

by धनंजय कुलकर्णी 21/08/2023

आज ‘मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता आमिर खान सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये एका ‘वेगळ्याच’ नावाने देखील फेमस झाला होता. अलीकडे इमरान हाश्मी रुपेरी पडद्यावर आल्यानंतर भारतीय प्रेक्षकांना किसिंग शॉटचे कौतुक राहिले नाही आणि इमरान हाश्मी हा ‘किसिंग बॉय’ म्हणून प्रेक्षकांच्या लक्षात राहिला! परंतु हीच ‘उपाधी’ एकेकाळी आमिर खानला देखील मिळाली होती. कारण त्या काळात आमिर खानच्या प्रत्येक सिनेमात चुंबन दृश्य हमखास असायचे! परंतु एका किसिंग शॉटच्या वेळेला आमिर खानला अक्षरशः घाम फुटला होता! काय होता हा किस्सा? (Kissing shot)

तत्पूर्वी आमिर खान आणि किसिंग शॉट यांचे कसे जवळचे जवळचे नाते होते ते पहा. आमिर खान यांचा रुपेरी पडद्यावरील प्रवेश १९८४ साली आलेल्या ‘होली’ या केतन मेहता यांच्या चित्रपटातून झाला. या चित्रपटात आमिर खानची नायिका होती किट्टू गिडवाणी. या किट्टूसोबत आमिर खानचा या चित्रपटात एक किसिंग सीन होता. आमिर खान पहिल्या पासूनच थोडासा ‘शाय’ प्रवृत्तीचा असल्याने किसिंग शॉट देतानाचा त्याचे नवखेपण या चित्रपटात दिसून येते. त्यानंतर आमिर खान आपल्या होम प्रोडक्शन ‘कयामत से कयामत तक’ या चित्रपटात त्याने अभिनेत्री जुही चावला ला किस केले होते. नंतर आमिर खानवर किसिंग बॉय हा शिक्का बसू लागला आणि त्याच्या येणाऱ्या प्रत्येक चित्रपटांमध्ये किसिंग शॉट मस्ट झाला. रूप सुंदरी  माधुरी दीक्षित त्याची ‘दिल’ या सिनेमात नायिका होती. या चित्रपटात देखील एक किसिंग सीन होता. (‘दिल’ मधील हा सीन बघून अनेकांचे ‘दिल’ तुटले होते असे म्हणतात!) आमिर खानने करिष्मा आणि करीना या दोघींसोबत किसिंग सीन दिलेले आहे. ‘राजा हिंदुस्तानी’ या चित्रपटातील करिष्मा कपूर सोबतचा त्याचा शॉट खूप गाजला होता. अलीकडे ‘थ्री इडियट्स’ या चित्रपटात त्याने करीना कपूरसोबत चुंबन दृश्य दिले होते. चुंबन दृश्य आणि आमिर खान यांची जणू जोडी जमली होती. (Kissing shot)

परंतु तुम्हाला माहित आहे का ? एका चित्रपटाच्या किसिंग सीनच्या वेळी आमिर खानला अक्षरशः घाम फुटला होता. हा सिनेमा होता १९९५ साली आलेला ‘आतंक ही आतंक’. या सिनेमात रजनीकांत देखील होता. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते दिलीप शंकर. या सिनेमात आमिर खानला अभिनेत्री पूजा बेदी हिला किस करायचे होते. आमिर खान अशा प्रकारच्या शॉटमध्ये आता बिनधास्त झाला होताच पूजा बेदी चा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे दिलीप शंकर यांनी हा शॉट आणखी इन्टिमेट करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी इतक्या इन्टिमेट पद्धतीने हा शॉट घेण्याच्या सूचना केल्या की त्या सूचना ऐकूनच अमीर आणि पूजा बेदी यांना भीती वाटली. दिग्दर्शकाने हा ‘किस’ अधिक इंटीमेट व्हावा यावर भर दिला. आमिर आणि पूजा बेदी यांना रिटेक वर रिटेक द्यावे लागले. आमिरला अक्षरशः घाम फुटला. शॉट झाल्यावर दोघेही खूप नर्व्हस झाले. यानंतर आमिर खान आणि पूजा बेदी दोघेही खूपच अपराधीपणाने वागत होते. त्यांच्या वागण्यात एक प्रकारचा ‘तणाव’ आला होता. आमिर खानने सांगितले, ”या शॉटनंतर आम्ही दोघेही एकत्र होतो परंतु एकमेकांशी एकही शब्द बोललो नाही कारण अशा प्रकारचा ‘वाईल्ड किस’ आम्ही यापूर्वी कधीच शूट केला नव्हता. शेवटी वातावरणात थोडासा तणाव निवडावा म्हणून मी पूजा बेदीला आपण चेस खेळूया असे सांगितले.” आणि दोघांनी चेस खेळायला सुरुवात केली. चेस खेळता खेळता वातावरण हळूहळू नॉर्मल होत गेले. परंतु या ‘किस’ची दहशत आमिर खानने खूप घेतली होती हे नक्की! (Kissing shot)

======

हे देखील वाचा : लता मंगेशकर यांनी या व्यक्तीकडे मागितली ही ओवळणी

======

आमिर खान आणि पूजा बेदी  यांच्यातील हे प्रदीर्घ चुंबन दृश्य जर पडद्यावर खरोखरच आलं असतं तर बॉलीवूडमधील कदाचित सर्वात इंटिमेट किस म्हणून त्याला मान्यता मिळाली असती! परंतु या सेन्सॉर बोर्डाने या ‘किस’वर मोठा आक्षेप घेतला. दिग्दर्शक दिलीप शंकर यांनी हर तऱ्हेने समजावून सांगितले की, हा सीन चित्रपटाच्यासाठी किती गरजेचा आहे. परंतु सेन्सॉर बोर्डाने त्यांचे काही एक ऐकले नाही आणि त्यावर कात्री चालवली!

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 1
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actor amir khan Bollywood Bollywood Chitchat Celebrity Entertainment kissing shot
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.