‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिलेलं ‘हे’ सुपर हिट गाणं!
गोल्डन इरामधील गाण्यांचे जसे चाहते आहेत तसाच एक चाहता वर्ग नव्वदच्या दशकातील गाण्यांचा देखील आहे. कारण हे दशक आपल्या देशासाठी खूप महत्वपूर्ण असे होते. जागतिकीकरणाच्या नव्या दिशा खुणावत होत्या. एक नवे मन्वंतर घडत होते. याच दशकातील एका गाजलेल्या गाण्याच्या मेकिंगचा हा किस्सा आहे. हॅरी बावेजा यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘दिलवाले’ या चित्रपटातील हे गीत आहे. या चित्रपटाची सर्व गाणी समीर अंजान यांनी लिहिली होती. तर संगीत नदीम श्रवण (nadeem shravan) यांचं होतं. चित्रपटाची कथा करण राजदान यांची होती. चित्रपटात अजय देवगन, सुनील शेट्टी, रवीना टंडन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटातील सर्वच गाणी खूपच कर्णमधुर आणि मेलडीयस अशी बनली होती.
या चित्रपटात निर्मात्याला एक गाणे असे हवे होते की ते सिनेमात तीन ठिकाणी तीन वेगवेगळ्या व्हर्शनमध्ये दाखवले जाईल. एक हॅपी व्हर्शन, दुसरे सॅड व्हर्शन आणि तिसरे प्री क्लायमॅक्स व्हर्शन. सिनेमाची इतर सर्व गाणी तयार झाली. अल्बम तयार झाला. पण चित्रपटासाठी महत्त्वाचे असलेले ते गाणे मात्र काही केल्या तयार होत नव्हते. आता निर्माता दिग्दर्शकांचे प्रेशर वाढू लागले. कारण हे गाणे म्हणजे चित्रपटाचा आत्मा होते आणि तेच अजून तयार होत नव्हते!
शेवटी हॅरी बावेजा यांनी एक डेडलाईन दिली आणि गीतकार व संगीतकार समीर नदीम श्रवण यांना हे गाणे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे सांगितले. त्या पद्धतीने हे तिघे गाण्याच्या सीटिंगसाठी एकत्र आले. तेंव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते. चर्चा सुरू झाल्या. गाण्याची सिच्युएशन पुन्हा समजून घेतली. त्यानुसार ट्यून कशी असावी त्यावर शब्द कुठले असावेत यावर चर्चाचर्वण सुरू झाले. पण काही केल्या त्याला अंतिम स्वरूप येत नव्हतं. आता रात्रीचे आठ साडेआठ वाजत आले होते. नेमकं त्याच वेळी ते जिथे बसले होते तिथले लाईट अचानक गेले. (nadeem shravan)
तेव्हा गीतकार समीर म्हणाले “ठीक आहे. आता लाईट गेलेले आहेत. आपण आता उद्याच या गाण्यावर चर्चा करू.” पण संगीतकार नदीम म्हणाले, “नको. उद्या नको. आज चांगला मूड लागलेला आहे. आजच आपण गाणं हे फायनल करायचं!” त्यांनी लगेच मार्केटमधून आठ दहा कॅंडल्स मागवल्या आणि या मेणबत्त्या पेटवून उजेड तयार केला आणि पुन्हा चर्चा सुरू झाली. गीतकार समीर संगीतकार नदीम यांना म्हणाले, ”यार नदीम, आयुष्यात प्रत्येकाचा कधी ना कधी प्रेमभंग झालेलाच असतो. माझा अनेकदा प्रेमभंग झालाय. तुझा देखील बऱ्याचदा झाला असेल. अशाच सिच्युएशनवर आपल्याला गाणं बनवायचा आहे. तशी एखादी ट्यून तयार कर!” श्रवण (nadeem shravan) यांनी गिटारवर एक ट्यून वाजवली .
नदीम यांनी पुढे जाऊन त्यावर आणखी काही ॲडीशन करत गाण्याची ट्यून तयार झाली आणि मग ते समीर यांना म्हणाले, ”पंडितजी अब लिखो!” मेणबत्तीच्या प्रकाशात समीर यांनी गाणे लिहायला सुरुवात केली. ‘जिता था जिसके लिए जिसके लिए मरता था एक लडकी ऐसी है जिसे मे प्यार करता था…..’ पहिलीच लाईन सगळ्यांना प्रचंड आवडली. आणि मग काय मेणबत्तीच्या प्रकाशातच पूर्ण गाणं तयार झालं. समीरने गाण्याचा मुखडा जरी एकच लिहिला असला तरी तीनही व्हर्शनच्या गाण्याचे अंतरे स्वतंत्र लिहिले होते. सॅड व्हर्शनचं शेवटचं कडवं जेव्हा समीर यांनी लिहिलं. तेव्हा तिघेही खूप हळवे झाले होते. तिघांनाही ते गाणं प्रचंड आवडलं होतं. रात्री लगेच त्यांनी दिग्दर्शकाला फोनवरच गाणे ऐकवले!
हे गाणं प्रेक्षकांना देखील आवडेल का असं समीर यांनी विचारलं तेव्हा नदीम म्हणाला, ”का नाही आवडणार? जो चीज हम दिल से करते है वो दुसरो के दिल को छू जाती है!” मेणबत्तीच्या प्रकाशात लिहिल्यामुळे त्याला कॅण्डल लाईट सीटिंग सॉंग असं देखील म्हटलं गेलं. पुढे हे गाणं कुमार सानू, अलका याज्ञिक यांच्या स्वरात रेकॉर्ड झालं आणि चित्रपटात सुरुवातीला, इंटरव्हलच्या आधी आणि क्लायमॅक्सच्या आधी गाणं चित्रीत झालं. प्रेक्षकांना हे गाणं प्रचंड आवडलं. या तिघांनीही (nadeem shravan) थेटरमध्ये जाऊन प्रेक्षकांच्या रिअँक्शन घेतल्या. सर्वांना हे गाणं खूप आवडलं होतं.
========
हे देखील वाचा : ज्या गाण्याला निर्माते बकवास म्हणाले; तेच गाणं ठरलं सुपरहिट !
========
या गाण्यासाठी थिएटरच्या अनेक वाऱ्या करणारे लोक देखील त्यांना भेटले. या गाण्यावर प्रेक्षकांनी उदंड प्रेम केलं नव्वदच्या दशकातील टॉप टेन गाणी जर आपण काढली तर त्यामध्ये या गाण्याचा नक्कीच समावेश होऊ शकतो. दिलवाले चित्रपटातील इतर सर्वच गाणी खूप चांगली बनली होती. या सिनेमाच्या ५.५ मिलियन ऑडिओ कॅसेटसची विक्री झाली होती. इतकी सुंदर गाणी असूनही या सिनेमाला किंवा संगीताला एकही फिल्मफेअर अवार्ड मिळाले नाही हे विशेष ! (nadeem shravan)