‘या’ खलनायकाचा झाला असा दर्दनाक अंत !
सत्तरच्या दशकातील हिंदी सिनेमातील खलनायकांचा जेव्हा आपण विचार करू लागतो तेव्हा एक नाव डोळ्यापुढे पटकन येतं ते म्हणजे मनमोहन. राजेश खन्नाच्या बहुतेक सर्व चित्रपटांमधून खलनायक हा मनमोहन असायचा. आपल्याला शक्ती सामंत यांचा ‘आराधना’ हा चित्रपट असतो आठवत असेलच. या सिनेमा शर्मिला टागोर वर बलात्कार करणारा जो खलनायक आहे तो मनमोहन. जुने चित्रपट विषयक मासिके, नियतकालिके वाचताना काही इंटरेस्टिंग स्टोरी वाचायला मिळतात. खलनायक मनमोहन यांच्याबाबत देखील अनेक किस्से या निमित्ताने वाचायला मिळतात. मनमोहन हिंदी सिनेमांमध्ये अभिनेता बनण्यासाठी आले होते. त्यांचा चित्रपटातील एन्ट्रीचा किस्सा देखील मनोरंजक आहे.(KhalNayak Hero)
जबलपूर येथे राहणारे मनमोहन एका श्रीमंत व्यापाराच्या घरातील पुत्र होते. पण त्यांना लहानपणापासूनच हिंदी सिनेमाची प्रचंड आवड होती. एकदा हास्य अभिनेता मुक्री, मारुती आणि टून टून त्यांच्या शहरात एक कॉमेडी शो करण्यासाठी आले होते ; तेव्हा मनमोहन यांनी त्यांची भेट घेतली आणि त्यांची खूप चांगली खातिरदारी केली. त्या दोन दिवसात त्यांची या कलावंतांसोबत चांगली मैत्री झाली. या भेटीतच त्यांनी आपली बॉलीवूडमध्ये काम करण्याची इच्छा व्यक्त केली. हास्य अभिनेता मुक्री यांनी त्यांना मुंबईला येण्याचे निमंत्रण दिले.त्या नुसार घरच्यांचा विरोध पत्करून मनमोहन मुंबईला आले. इथे आल्यानंतर आर के नय्यर (अभिनेत्री साधना चे पती) यांनी त्यांच्या ‘ये रास्ते है प्यार के’ या चित्रपटात मनमोहन यांना एक छोटी भूमिका मिळाली. (KhalNayak Hero)
यानंतर १९६५ साली दिग्दर्शक केवल कश्यप यांनी ‘शहीद’ या चित्रपटात चंद्रशेखर आझाद ची भूमिका मनमोहन यांना दिली. ही खऱ्या अर्थाने त्यांची भूमिका गाजली आणि इथेच त्यांना मनोज कुमार सारखा दिलदार मित्र मिळाला. यानंतर मनोज कुमारच्या बहुतेक सर्व चित्रपटांमध्ये मनमोहन यांची भूमिका असायचीच. अभिनेता म्हणून बॉलिवूडमध्ये आलेले मनमोहन लोकप्रिय मात्र खलनायक म्हणून झाले! शक्ती सामंत यांच्या ‘आराधना’ या चित्रपटात त्यांनी रंगवलेला श्याम हा खलनायक (KhalNayak Hero) जबरदस्त गाजला आणि नंतर अशाच भूमिकांची मोठी रांग लागली. राजेश खन्नाचे ते खूप चांगले मित्र होते. त्यामुळे राजेश खन्नाच्या बऱ्याच चित्रपटातून मनमोहन यांच्या भूमिका असायच्या.गुमनाम, आराधना, मेरा सया, उपकार,ब्रह्मचारी, शिकार ,सत्यकाम, नामक हराम, जुगनू, हमजोली,अमर प्रेम, प्रेम नगर, हम शकल, क्रांती या सिनेमातील मनमोहन यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या. व्हिलनची भूमिका करताना चेहऱ्यावर असलेली गुर्मी प्रेक्षकांच्या मनात चीड निर्माण करत असे.
सुनील दत्त जेव्हा आपल्या भावाला सोमदत्त लॉन्च करणार होते. तेव्हा ‘मन का मीत’(१९६८) या चित्रपटातील खलनायका ची भूमिका त्यांनी मनमोहन यांनाच दिली होती. पण मनमोहन त्या काळात जबरदस्त इतर सिनेमात बिझी असल्यामुळे त्यांनी ही भूमिका नाकारली आणि पुढे हीच भूमिका सुनील दत्त यांनी विरोध खन्नाला ऑफर केली ! सत्तरच्या दशकामध्ये अनेक चित्रपटातून मनमोहन प्रेक्षकांना भेटत राहिले. त्यांची बॉलिवूडमधील एन्ट्री जशी अनपेक्षित झाली तशी त्यांची एक्झिट देखील अतिशय अनपेक्षित आहे. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला. तो देखील अतिशय भयानक दर्दनाक परिस्थितीमध्ये. (KhalNayak Hero)
=============
हे देखील वाचा : ‘सरफरोश’ सिनेमातील बाला ठाकूर गेला तरी कुठे ?
=============
मनोज कुमार यांच्या ‘क्रांती’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी ते मुंबई जवळच्या टिटवाळा येथे आले होते. रात्री झोपलेले असताना कुणीतरी पेट्रोमॅक्स लावताना त्याच्या सिलेंडर मध्ये स्पोर्ट झाला आणि मोठी आग लागली या आगीत खाली झोपलेले मनमोहन ऐंशी टक्के भाजले. त्यांना ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. पुढचे सहा महिने त्यांची मृत्यूची झुंज चालू राहिली. आणि २६ ऑगस्ट १९७९ या दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली. अतिशय दर्दनाक अशी ही मौत होती. सहा महिने हॉस्पिटलमध्ये असताना ते अक्षरशः देवाकडे मृत्यूची भीक मागत होते. कारण भाजल्याच्या असह्य वेदना त्यांच्या सहनशक्तीच्या पलीकडच्या होत्या. एका उंमद्या कलाकाराचा असा दुःखद अंत रसिकांना आणि बॉलिवूडला चटका लावून गेला. काळ कोणासाठी थांबत नाही आज मनमोहन यांना आठवायचे म्हटले तरी कुणाला आठवत नाहीत. पण एक काळ त्यांनी नक्की गाजवला. मनमोहन यांचे चिरंजीव नितीन मनमोहन कालांतराने बॉलीवूड मध्ये आले आणि ‘बोल राधा बोल’,’यमला पगला दिवाना’ ‘भूत’ या सिनेमाचे निर्माते बनले.