‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
व्हाईट हाऊसच्या तळघरातील रहस्य सांगणारी ‘ही’ वेबसिरीज
नेटफ्लिक्सवर आलेली ‘द नाईट एजंट’ नावाची वेबसिरीज (Webseries) प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे. अमेरिकेच्या व्हाईट हाऊसबाबत अनेक रहस्यमयी कथा सांगितल्या जातात. तशाच एका रहस्याभोवती ‘द नाईट एजंट’ ही सिरीज गुंफण्यात आली आहे. जबरदस्त कथानक हे या सिरीजचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सिरीजची सुरुवातच प्रेक्षकांना बांधून ठेवते. सबवे ट्रेनमध्ये प्रवास करणारा एक एफबीआय एजंट, लहान मुलीसह ट्रेनमध्ये चढलेल्या एका महिलेला जागा देण्यासाठी उभा राहतो. ती मुलगी काही वेळ मजा करत असते. त्या दरम्यान एक तरुण सीटखाली काळी पिशवी सरकवतो आणि ट्रेन सुरू होण्यापूर्वी खाली उतरतो. त्यानंतर अगदी थोड्यावेळात बॉम्बस्फोट होतो. सुदैवाने, एफबीआय एजंट त्यापूर्वी ट्रेन थांबवतो आणि प्रवाशांना खाली उतरवतो. त्यामुळे अनेक प्रवाशांचे जीव जातात. नेटफ्लिक्सच्या या नव्या वेबसिरीजला (Webseries) सुरुवातीपासूनच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे.
‘द नाईट एजंट’ ही वेबसिरीज (Webseries) या बॉम्ब स्फोटानंतर एका वर्षानंतर सुरू होते. त्या घटनेतील एफबीआय एजंट आता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या व्हाईट हाऊसमध्ये तैनात आहे. हा एजंट व्हाईट हाऊसच्या तळघरातील एका छोट्या खोलीत विशेष ड्युटीवर आहे. या खोलीत बसवलेल्या फोनवर येणारे कॉल्स ऐकणे आणि त्याची माहिती तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना देणे हे त्याचे काम आहे. हे फोन ऐकणे म्हणजे, राष्ट्रपतींच्या संरक्षणाखाली चालणारे ‘नाईट एजंट’ हे अत्यंत गुप्त मिशन आहे. त्यावरच ही सर्व वेबसिरीज (Webseries) आधारलेली आहे.
मॅथ्यू क्विर्क यांनी लिहिलेल्या नाईट एजंट याच नावाच्या कादंबरीवर ‘द नाईट एजंट’ या वेबसिरीजची निर्मिती शॉन रायन यांनी केली आहे. रायन यांनी यापूर्वी ‘स्वॅट’ आणि ‘शिल्ड’ सारख्या लोकप्रिय वेबसिरीज केल्या आहेत. या वेबसिरीजचे (Webseries) वैशिष्ट्य तिच्या कथेत आहे. एका आयटी कंपनीच्या माजी सीईओची कथा यात आहे. हा सीईओ चुकून एफबीआय एजंटबरोबर वाद घालतो. ही चूक पुढे एका कथेत रुपांतरीत होतो. एका फोनद्वारे कथा वेग पकडते आणि हळूहळू उलगडत जाते. प्रत्येक तपशीलासह त्यात नवीन पात्र जोडले जाते. यात एफबीआय एजंटने ट्रेन थांबवल्यामुळे बोगद्याच्या आत जो बॉम्बस्फोट झाला, तो पाहणारी व्यक्तीही नंतर येते. हा बॉम्बस्फोट त्या व्यक्तिलाच मारण्यासाठी हल्लेखोरांनी केलेला प्रयत्न केला असतो. त्यात सर्व परिसर उद्ध्वस्त करण्याची त्यांची तयारी असते. या हल्लेखोरांना जोडणा-या एका माहितीतून बंटी आणि बबली टाईपची जोडीही समोर येते. आयटी कंपनीच्या माजी सीईओच्या नातेवाईकांची हत्या होते. या सर्वात रात्रीचे फोन ऐकणारा एफबीआय एजंट मोठ्या चक्रव्युहात सापडतो. त्याला कोण बरोबर आहे आणि कोण चूक आहे हे समजत नाही. तो आपल्याच लोकांपासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. सिरिजच्या शेवटच्या भागात दुसऱ्या सीझनची हिंट देण्यात आली आहे. पण तोपर्यंत प्रेक्षक या नाईट एजंटच्या चक्रव्यूहात पूर्णपणे हरवून गेले असतात. ‘द नाईट एजंट’ या वेबसिरीजला (Webseries) सर्वाधिक रेटींग त्यामुळेच मिळाले आहे.’द नाईट एजंट’ या वेबसिरीजचे (Webseries) मुख्य आकर्षण म्हणजे त्यातील गॅब्रिएल आणि लुसियनची हो जोडी.
======
हे देखील वाचा : ताज डिव्हायडेड बाय ब्लडः वेबसिरीजचा फोलपणा
======
हुशार एफबीआय एजंट गॅब्रिएल बासो बनला आणि लुसियन बुकाननची केमिस्ट्री मस्त जुळली आहे. नातेवाईकांना मारेकर्यांपासून वाचवण्याचा प्रयत्न करणारी एक आयटी व्यावसायिक म्हणून, लुसियनने मालिकेच्या प्रत्येक दृश्यात गॅब्रिएलची साथ दिली आहे. दोघांमध्ये प्रेमही बहरत चालेले आहे. दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागतात. पण पहिल्या सिझनमधील हे प्रेम दुस-या सिझनमध्ये कायम राहिल का हा प्रश्न आहे. या वेबसिरीजमधील (Webseries) दुसरी जोडी दोन मारेकऱ्यांची आहे. इव्ह आणि फिनिक्स जोडी म्हणून प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचे उत्तम काम करते. या वेबसिरीजचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिग्दर्शकांची मोठी टिम. सिरिजचे 10 भाग एकूण पाच दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केले आहेत. त्यामुळेच त्यामध्ये वैविध्य दिसते. शेवटच्या क्षणी मारेकऱ्यांचा प्लॅन हाणून पाडण्यासाठी नायक नायिकेनी केलेले प्रयत्न आणि त्यांचे अॅक्शन सीन्स अतिशय रोमांचक आहेत. गॅब्रिएल बासो, लुसियन बुकानन, हाँग चाऊ, डीबी वुडसाइड, फोला इव्हान्स अकिंगबोला, इव्ह हार्लो आणि फिनिक्स रे आदी सर्वांच्याच भूमिका उत्तम झाल्या आहेत. या वेबसिरीजचे (Webseries) लेखक शॉन रायन, मुनीस रशीद, सेठ फिशर, कोरी डीशॉन, इमोजेन ब्राउडर, टिफनी शॉ हो आणि रॅचेल वुल्फ आहेत. तर सेठ गॉर्डन, गाय फारलँड, रामा मोसेली, अॅडम आर्किन आणि मिलिसेंट शेल्टन ही सर्व दिग्दर्शकांची टिम आहे. एकूण ‘द नाईट एजंट’ ही नेटफ्लिक्सवरील वेबसिरीज नक्कीच पहाण्यासारखी झाली आहे.