Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर केली भावनिक पोस्ट !
मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अवघ्या दीड वर्षांच्या प्रवासानंतर ही मालिका प्रेक्षकांना अलविदा म्हणणार असल्याने चाहत्यांमध्ये नाराजी आणि भावूकता दोन्ही दिसून येत आहे. १७ जून २०२४ रोजी या मालिकेची सुरुवात झाली होती. तेजस आणि मानसीची ही अनोखी कथा सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर करून बसली. प्रेक्षकांना या मालिकेतील नात्यांची गोडी, कौटुंबिक चढउतार आणि भावनिक वळणं विशेष भावली. मात्र आता १२ सप्टेंबर २०२५ रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे.(Thoda Tuza Ani Thoda Maza Serial)

मालिकेत मानसीची भूमिका अभिनेत्री शिवानी सुर्वे (Shivani Surve)हिने साकारली. तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप भावनिक केलं आणि मोठ्या प्रमाणावर प्रेम मिळवलं. तर तेजसची भूमिका अभिनेता समीर परांजपे (Sameer Paranjape) याने साकारली. त्याच्या सहजसुंदर अभिनयामुळे आणि विनोदी टचमुळे त्यालाही प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर शिवानी सोनारने ३० ऑगस्ट रोजी एक खास भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. मंगळागौर स्पेशल भागातील काही फोटो तसेच मालिकेतील कलाकारांसोबतचे क्षणचित्र तिने चाहत्यांसोबत शेअर केले. त्या प्रत्येक फोटोत तिने आपली भावना व्यक्त केली आहे.

शिवानीने लिहिलं की, “थोडं तुझं थोडं माझंचा हा अद्भुत प्रवास संपला आहे. जेव्हा आपण एखादा प्रोजेक्ट सुरू करतो, तेव्हा माहीत असतं की कधीतरी त्याचा शेवट होणारच आहे. आज तसं झालं आहे. हे वर्तुळ पूर्ण झाल्यासारखं वाटतंय. माझ्या मानसी या पात्रावर तुम्ही केलेलं प्रेम माझ्यासाठी खूप मोठं आहे. नेहमीच तुमची आभारी राहीन.” मालिकेत मानसीला छळणारी गायत्री म्हणजेच अभिनेत्री मानसी कुलकर्णी विषयी लिहिताना शिवानी म्हणाली, “तू मला अनेक गोष्टींमध्ये प्रेरणा दिलीस. खंबीर आणि सुंदर स्त्री कशी असावी याचं खरं उदाहरण म्हणजे तूच.” त्या बरोबरच आपल्या ऑन-स्क्रीन नवऱ्या तेजसबद्दल समीर परांजपेविषयी ती म्हणाली की, “समीर म्हणजे मजेचा खजिना. तुझी ऊर्जा, तुझे विनोद आणि सगळ्यांना हसवण्याची पद्धत हीच तुझी खरी ताकद आहे.”(Thoda Tuza Ani Thoda Maza Serial)
============================
============================
शेवटी तिने संपूर्ण टीम, दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांविषयी आभार मानत “सर्वांना खूप खूप प्रेम, अलविदा” असं लिहित प्रेक्षकांचा निरोप घेतला. या पोस्टनंतर चाहत्यांनी शिवानी व मालिकेतील कलाकारांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अनेकांनी “ही मालिका बंद होऊ नये” अशा कमेंट्स केल्या आहेत. खऱ्या अर्थाने ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’ ही मालिका प्रेक्षकांसाठी कायमची अविस्मरणीय ठरणार आहे.