Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

Rajesh Khanna : राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे
सुपरस्टार राजेश खन्ना (Rajesh Khanna) राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे यांच्यावर चित्रित झालेली गाणी हा नेहमीच रसिकांच्या आवडीचा आणि रम्य स्मरणाचा विषय असतो. आज देखील राजेश खन्ना वर चित्रित गाणी आपण सर्व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये ऐकतच असतो. राजेश खन्ना आणि किशोर कुमार हे कॉम्बिनेशन त्या काळात प्रचंड लोकप्रिय झालं होतं. असं असलं तरी राजेश खन्नाला मोहम्मद रफी(Mohammed Rafi) राजेश खन्नाचे तीन सुपर हिट सिनेमे आणि मुकेश यांचा देखील स्वर लाभला होता. ज्या काळात राजेश खन्नाच्या चित्रपटातील सर्व गाणी किशोर कुमार (Kishore Kumar) गात असे त्याकाळात त्याच सिनेमातील एखादं गाणं रफीला किंवा मुकेशला मिळत असे. (Bollywood Movie)
आज गंमत म्हणून तुम्हाला एक योगायोग सांगतो. राजेश खन्नाच्या तीन सुपरहिट (Superhit) चित्रपटातील गाण्यांकडे जर तुम्ही बारकाईने बघितलं तर असं लक्षात येईल की या तीन चित्रपटांमध्ये या तीन प्रमुख गायकांचं (आलटून पालटून) फक्त एकच गाणं आहे. हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि युनिक आहे. तसं मुकेश यांनी जवळपास शंभर दीडशे चित्रपटात केवळ एकच गाणं गायलं होतं तो एक वेगळा लेखाचा विषय होऊ शकतो. पण इथे राजेश खन्नाच्या परिप्रेक्ष्यामध्ये जर विचार केला तर खूप इंटरेस्टिंग अशा गोष्टी दिसून येतात. अर्थात हे मुद्दाम केलं होतं कां? की निव्वळ योगायोग होता? कोणते होते ते चित्रपट आणि त्यात कोणत्या गायक कलाकाराचे फक्त एकच गाणं होतं?(Bollywood Movie)

राजेश खन्ना (Rajesh Khanna) आणि किशोर कुमार (Kishore Kumar) या दोघांचा उदय १९६९ साली आलेल्या ‘आराधना’ या चित्रपटापासून झाला होता हे आपण जाणताच.(पण या दोघांचं पाहिलं गाणं ‘वो शाम कुछ अजीब थी’ हे होतं) याच काळात राजेश खन्ना इतर प्रोडक्शनच्या अनेक चित्रपटात काम करत होता. त्यापैकी एक होता राज खोसला यांचा ‘दो रास्ते’. हा चित्रपट ‘आराधना’ रिलीज झाल्यानंतर दोन महिन्यांनी प्रदर्शित झाला. (Bollywood Movie)
या चित्रपटातील राजेश खन्ना (Rajesh Khanna) वर चित्रित सर्व गाणी मोहम्मद रफी यांनी गायलेली होती. ही गाणी होती ‘ये रेशमी जुल्फे ये शरबती आंखे इन्हे देखकर जी रहे है सभी’, छुप गये तारे नजारे ओय क्या बात हो गई’ पण या चित्रपटात एकच गाणं होतं जे किशोर कुमार याने गायले होतं. ते गाणं होतं ‘खिजा के फूल पे आती कभी बहार नही मेरे नसीब में ऐ दोस्त तेरा प्यार नही’ खरंतर हे गाणं देखील म. रफी च गाणार होते. परंतु त्यांना ऐनवेळी परदेशात जावं लागल्यामुळे हे गाणं किशोर कुमारने अक्षरशः दोन तासात रिहर्सल करून गायले . याचा अर्थ ‘दो रास्ते’ या चित्रपटात राजेश खन्ना चित्रीत सर्व गाणी रफीने जरी गायली असली तरी त्यातील एक गाणं किशोर कुमार यांनी गायलं होतं. (Rajesh Khanna)

याच्या उलट ‘हाथी मेरे साथी’ (१९७१) च्या वेळी झालं होतं. या काकाच्या सुपर हिट सिनेमात त्याची नायिका तनुजा होती. या सिनेमाला देखील संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचे संगीत होतं. या चित्रपटातील काकावर चित्रित सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. ‘दुनिया मे रहना है तो काम कर प्यारे हाथ जोड सबको सलाम कर प्यारे’, ‘चल चल मेरे हाथी’,’ सुन जा आ ठंडी हवा’ या सर्व गाण्यांमुळे हा सिनेमा आबाल वृद्धांना प्रचंड आवडला होता. या सिनेमात फक्त एकमेव असे गाणे होते जे किशोर कुमारने न गाता रफीने गायले होते. गाण्याचे बोल होते ‘नफरत की दुनिया को छोड कर प्यार की दुनिया मे…’ हा राजेश खन्नाचा सुपरस्टार पदाचा पीक पिरेड होता. यावर्षी राजेश खन्नाच्या सर्वच सिनेमे (Cinema) सुपर डुपर हिट झाले होते.(Rajesh Khanna)
=============
हे देखील वाचा : Bappi Lahiri : पंचम यांच म्युझिक असलेल्या चित्रपटाला बप्पी लहरी यांच बॅकग्राऊंड म्युझिक !
=============
शक्ती सामंत यांच्या ‘कटी पतंग’ या चित्रपटातील सर्व गाणी किशोर कुमार यांनी गायली होती. ‘प्यार दिवाना होता है मस्ताना होता है’, ‘ये शाम मस्तानी मदहोश’ ‘आज न छोडेंगे…’ सर्वच गाणे जबरदस्त बनली होती. पण या चित्रपटात एकमेव गाणे असे होते जे राजेश खन्ना चित्रित होते आणि मुकेश यांनी गायलेले होते! हे गाणं होतं ‘ जिस गली मे तेरा घर न हो बालमा..’ हे असं का घडलं याला वेगवेगळी कारणं आहेत. ‘हाथी मेरे साथी’ चे गाणे स्वत: किशोरने रफी कडून गावून घ्यायला सांगितले होते. त्या काळी खूप निकोप आणि निरोगी स्पर्धा होती. पण हे सर्व खूप इंटरेस्टिंग आहे. एखाद्या सिनेमातील सर्व गाणी एकच गायक गात असताना केवळ एखादं गाणं दुसऱ्या गायकाला देणं ही रिस्क संगीतकाराने उचलली आणि सुपरहिट देखील झाली!