Prajakta Mali मुंबई सोडून चालली? अभिनेत्रीच्या पोस्टने चाहत्यांना बसला धक्का !

Baaghi 4 : टायगर श्रॉफचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ही फ्लॉप?
अभिनेता टायगर श्रॉफ (Tiger Shroff) याची प्रमुख भूमिका असणारा ‘बागी ४’ चित्रपट प्रदर्शित होऊन ४ दिवस झाले आहेत… खर तर ज्यावेळी चित्रपटाचा टीझर आणि ट्रेलर रिलीज झाला होता तेव्हा प्रेक्षकांमध्ये चित्रपटाच्या कथेबदद्ल, टायगर श्रॉफ आणि संजय दत्त (Sanjay Dutt) या दोघांच्याही अभिनयाबद्दल उत्सुकता निर्माण झाली होती… मात्र, चित्रपट रिलीज झाल्यानंतर प्रेक्षकांचा जरा हिरमोड झाल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत… जाणून घेऊयात ‘बागी ४’ (Baaghi 4) ने बॉक्स ऑफिसवर किती कलेक्शन केलं आहे…

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार ‘बागी ४’ चित्रपटाने पहिल्या दिवशी १२ कोटी, दुसऱ्या दिवशी ९.२५ कोटी, तिसऱ्या दिवशी १० कोटी, चौथ्या दिवशी ७४ लाख कमवत आत्तापर्यंत चार दिवसांत या चित्रपटाने ३१.९९ कोटींची कमाई केली आहे… यापूर्वी आलेल्या ‘बागी’च्या इतर सीक्वेल्सने म्हणजेच ‘बागी २’ ने १६५.५ कोटी, ‘बागी ३’ ने ९६.५ कोटी आणि ‘बागी’ने ७६.१ कोटी कमावले होते… त्यामुळे आता ‘बागी ४’ इतर ३ भागांचे रेकॉर्ड मोडणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे…(Baaghi 4 box office collection)
================================
हे देखील वाचा : Tiger Shroff : बागी ते बागी ३; जाणून घेऊयात बॉक्स ऑफिस कलेक्शन
=================================
दरम्यान, ‘बागी ४’ चा ट्रेलर पाहिल्यानंतर Animal चित्रपटानंतर पुन्हा एकदा अति रक्तरंजितपणा प्रेक्षकांना चित्रपटातून दिसणार, किंबहूना काही अंशी Action सीन्सही त्याच चित्रपटाशी मिळतेजुळते आहेत असं भासत होतं… परिणामी समीक्षक, आणि प्रेक्षकांनीही या चित्रपटाला नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. इतकंच नाही तर, ‘बागी ४’ हा टायगर श्रॉफच्या कारकिर्दीतील सर्वात फ्लॉप चित्रपटांपैकी एक ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. ‘बागी ४’ मध्ये संजय दत्त, टायगर श्रॉफ, सोनम बाजवा, हरनाज संधू या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत…(Baaghi 4 star cast)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi