
Vitthal Vitthal :अवघ्या १५ मिनिटांत चाल लावून तयार झाला हा अभंग; ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’
सध्या महाराष्ट्र मध्ये भक्तिमय वातावरण आहे. लाखो वारकरी पंढरीच्या दिशेने आपल्या लाडक्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने पायी पंढरपूरला जात आहे. आजच पुण्याहून देहू आळंदीची वारी पंढरपूरला जात आहे. हा सोहळा खूप अनुपम असा आहे. संपूर्ण विश्वात असा सोहळा होणे नाही. या वारकऱ्यांना आस असते ती विठू माऊलीच्या दर्शनाची. या वारकऱ्यांना कोणीही निमंत्रण दिलेले नसतं. तरी आपल्या सुखी संसाराची वाट सोडून हे पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी वाट चालत असतात . त्यांच्यासाठी तीर्थ विठ्ठल असतं आणि क्षेत्र देखील विठ्ठलच असत. तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हा पंडित भीमसेन जोशी यांचा अतिशय गाजलेला अभंग. याची निर्मिती अवघ्या पंधरा मिनिटात झाली होती आज वारीच्या निमित्ताने या गाजलेल्या अभंगाच्या मेकिंगचा भन्नाट किस्सा. (Marathi Abhanga)

महाराष्ट्रात भागवत धर्माची पताका उंचावत वारकरी संप्रदयाने समाजातील भेदाभेद मिटवित समानतेचा संदेश अध्यात्माच्या मार्गाने दिला आहे.पंढरीचे आराध्य दैवत असलेल्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी आतुर झालेल्या वारकर्यांना ज्या दिवशी आपल्या परमेश्वराची भेंट घडते तो असतोआषाढी एकादशीचा दिवस! शेकडो मैल चालत मुखी हरी नामाचा गजर करीत वैष्णवांचा मॆळा पंढरीत एकत्र येतो आणि भक्ती सागराचे अनोखे दर्शन घडते. संपूर्ण विश्वात असा नयनरम्य भक्तीचा सोहळा फक्त इथेच पहावयास मिळतो.या आनंदाच्या सोहळ्यावर अनेकानेक भक्ती गीतांनी रसिकांच्या मनाचा ठाव घेतला आहे. या रचना जशा थोर संताच्या आहेत तशाच इथल्या मातीशी नातं सांगणार्या महान कवींच्या देखील आहेत. (Marathi movies)

‘विठ्ठल तो आला आला मला भेटण्याला’, ‘देव माझा विठू सावळा’, ‘चल ग सखे चल ग सखे पंढरीला’ ,’पाऊले चालती पंढरीची वाट’, ‘कानडा राजा पंढरीचा’, ‘सावळ्या विठ्ठला तुझ्या दारी आले’, ‘विठू माझा लेकुरवाळा’, ‘विठ्ठला समचरण तुझे मी धरीते’,’विठू माऊली तू माऊली जगाची’,’रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी’, ‘चंद्र भागेच्या तीरी’, आणि ‘तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’. यातील तीर्थ विठ्ठल या गाण्याच्या निर्मितीची कथा फार मनोरंजक आहे. त्या वेळी पुणे आकाशवाणी केंद्रावर ’परंपरा’ या शास्त्रीय संगीतावर आधारीत गाण्यांचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाच्या प्रत्येक भागात दोन गाण्यांचा अंतर्भाव असायचा. एका भागात पं.भीमसेन जोशी गाणार होते. संगीतकार होते राम फाटक आणि अरविंद गजेंद्रगडकर. दोघांनी आपपली गाणी ठरवून ठेवली होती.कवी काव्यविहारी यांच गीत फाटक पंडीतजींकडून गाऊन घेणार होते.(Marathi entertainment news)

पंडीतजी आले पण काय झाले कुणास ठाऊक फाटकांना ठरलेले गाणे अचानक बदलावेसे वाटले! आता ऐन वेळी जमणार कसे,पंडीतजींना सांगायचे कसे हा प्रश्न होताच.पण त्यांनी हे आव्हान स्विकारले.फाटक गजेंद्रगडकर यांना म्हणाले ” तुम्ही तुमच्या गाण्याची रिहर्सल उरकून घ्या मी आलोच.”फाटक तडक खालच्या मजल्यावरील आकाशवाणीच्या ग्रंथालयात गेले.वेळ थोडा होता यात गाणं निवडून बसवायचं होतं.ग्रंथालयात पुस्तक धुंडाळू लागले. ’सकल संत गाथा’ हे पुस्तक त्यांच्या हाती पडलं.यात संत नामदेवांचा एक आठ ओळींचा अभंग होता. त्यांनी सहज गुणगुणून पाहिला.त्यांना आवडला. जिन्यातच त्यांनी चाल पण लावली.तोवर खाली चालू असलेली पहिल्या गाण्याची रिहर्सल संपत आली होती.(Entertainment)
================================
हे देखील वाचा: …आणि पं. भीमसेन जोशी यांनी दोन तासात सादर केला नवा अभंग!
=================================
फाटकांची चाल भीमसेन जोशी यांना आवडली.अवघ्या दहा मिनिटात त्यांनी त्या गाण्यात करावयाच्या रागदारीच्या हरकतींची चर्चा केली.”वा फार मस्त धुन आहे बघा यात आता मी कसे रंग भरतो”असं म्हणत पंडीतजी गावू लागले. म्हणजे तासाभरापूर्वी पुस्तकात बंदीस्त असलेल्या अभंगाला संगीतात गुंफले गेले! हा अभंग होता ’तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल’ पुढे या अभंगाने एवढी लोकप्रियता हासिल केली की पंडीतजींची कोणतीही मैफल या अभंगाशिवाय होत नसे.सध्याच्या भक्तीमय वातावरणात विठ्ठलाच्या चरणी लीन होवून या अभंगाचा आनंद घेऊयात. (Bollywood)