Ranveer Singh : आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ चित्रपटाचा टीझर ‘या’

टॉम क्रुझच्या Mission Impossible : The Final Reckoning चित्रपटाची भारतात कमाई किती?
टॉम क्रुझ (Tom Cruise) आणि त्याच्या ‘मिशन इम्पोसिबल’ (Mission Impossible) चित्रपटाचे जगभरात करोडोंच्या घरात चाहते आहेत. १९९६ पासून सुरु झालेल्या मिशन इम्पोसिबल या फ्रॅंचायझीचा प्रवास ‘मिशन इम्पोसिबल-द फाइनल रेकनिंग’ (Mission Impossible : The Final Reckoning) या आठव्या भागापर्यंत पोहोचला आहे. भारतीय प्रेक्षक अॅक्शन चित्रपटांचे विशेष चाहते आहेत. त्यामुळेच ‘मिशन इम्पोसिबल’ चित्रपटाच्या टीमने टॉम क्रुझसोबत भारतात एक विशेष सोहळा आयोजित केला होता. एकीकडे या कार्यक्रमाला सोशल मिडिया इन्फ्ल्युएन्सर ते काही कलाकारांनी हजेरी लावत कार्यकर्माचा उत्साह वाढवला तर दुसरीकडे भारतीय प्रेक्षकांनी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवून दिलं आहे.(Hollywood movies)

१७ मे २०२५ रोजी ‘मिशन इम्पोसिबल-द फाइनल रेकनिंग’ चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता. महत्वाचं म्हणजे परदेशात हा चित्रपट रिलीज करण्यापूर्वी मेकर्सनी भारतीय चाहत्यांसाठी हा चित्रपट आधी प्रदर्शित केला. हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ आणि तेलुगु भाषेत रिलीज करण्यात आला आहे. एकीकडे ‘रेड २’ (Raid 2) चित्रपट प्रेक्षकांची मनं जिंकत असताना ‘मिशन इम्पोसिबल ८’ ने ही प्रेक्षकांना मनोरंजनाची खास मेजवानी दिली आहे. (Bollywood news)

सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार मिशन इम्पोसिबल चित्रपटाने पहिल्या दिवशी १६.५ कोटी, दुसऱ्या १७ कोटी, तिसऱ्या ५.७५ कोटी, चौथ्या दिवशी ५.७५ कोटी, पाचव्या दिवशी ४.७१ कोटी, सहाव्या दिवशी ७५ लाख कमवून आत्तापर्यंत ५०.४६ कोटींचा गल्ला जमवला आहे. (Mission Impossible : The Final Reckoning box office collection india)
================================
हे देखील वाचा: ‘स्काय फोर्स’ ते ‘रेड २’ बॉलिवूडच्या चित्रपटांचं Box Office Collection!
=================================
तर, दुसरीकडे अजय देवगण आणि रितेश देशमुखचा ‘रेड २’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. रेड २ ने पहिल्या वीकेंडला ९५.७५ कोटी, दुसऱ्या ४०.६ कोटी कमवून आत्तापर्यंत १५५.४ कोटी कमावले आहेत. दरम्यान, ‘मिशन इम्पोसिबल’ ‘रेड २’ला मागे टाकू शकेल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.(Raid 2 box office collection)