Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Varanasi : एस.एस. राजामौलींच्या आगामी चित्रपटाचं टायटल कन्फर्म! ३००० कोटी

“अमिताभ बच्चन आमच्यासोबत जेवायचे नाहीत, कारण…”; Suneil Shetty ने सांगितला

Bigg Boss 19: ‘मालती लेस्बियन आहे…’ बिग बॉस च्या घरात कुनिकाचे मालतीवर

Bigg Boss 19 ला सलमान खान चा रामराम? ‘हा’ प्रसिद्ध दिग्दर्शक

Jaya Bachchan : मेरा जीवन कोरा कागज कोरा ही रह

Marathi Movie Review : ‘गोंधळ’ बघून तुमच्या डोक्याच्या तारा हलतील;

 “मी कट्टर भाजप समर्थक”; Nivedita Saraf यांचं बिहार निवडणूकीच्या निकालानंतरच

लग्नाच्या वाढदिवशीच घरी आली लक्ष्मी! Rajkumar Rao-Patralekha झाले आईबाबा

Web Series Review Baai Tujhyapayi: वयात आलेल्या प्रत्येक मुलीची करुण

“आता ‘धर्मवीर 3’ नाही, तर ‘गुवाहाटी फाइल्स’ घेऊन येणार”, Mangesh

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट

 बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट
कलाकृती विशेष

बॉलिवूडमध्ये रिमेक झालेले टॉप १० मराठी चित्रपट

by Team KalakrutiMedia 21/04/2022

बॉलिवूडमध्ये दाक्षिणात्य चित्रपटांचे ‘रिमेक’ बनतात ही गोष्ट काही नवीन नाही. पण तुम्हाला माहिती आहे का की, कित्येक मराठी चित्रपटांचेही बॉलिवूडमध्ये रिमेक बनले आहेत. आज आपण बॉलिवूडमध्ये रिमेक होऊन प्रदर्शित झालेल्या अशाच टॉप ५ मराठी चित्रपटांबद्दल माहिती घेणार आहोत. (Marathi movies remade in Bollywood)

१.  अंतिम: द फायनल ट्रुथ (२०२१)

Marathi movies remade in Bollywood
Antim The Final Truth

महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि सलमान खान फिल्म्स निर्मित हा चित्रपट ॲक्शन थ्रिलर असून, यामध्ये सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट ‘मुळशी पॅटर्न‘ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी जगभरात थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे समीक्षकांकडून कौतुक झालंच शिवाय २०२१ सालात सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूडचा तिसरा हिट चित्रपट ठरला. 

२. छोरी (२०२१)

Marathi movies remade in Bollywood
Chhorii

हा चित्रपट २६ नोव्हेंबर २०२१ रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला. विशाल फुरिया दिग्दर्शित हा एक हॉरर चित्रपट असून २०१७ सालच्या ‘लपाछपी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटात मीता वशिष्ठ, राजेश जैस आणि सौरभ गोयल यांच्यासोबत नुश्रत भरुच्चा मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे समीक्षकांकडून भरपूर कौतुक झाले होते. (Marathi movies remade in Bollywood)

३. धडक (२०१८)

Dhadak

२०१८ साली प्रदर्शित झालेला ‘धडक’ हा चित्रपट मराठीमधील सुपरहिट ‘सैराट’ या चित्रपटाचा रिमेक आहे. शशांक खेतान लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यामध्ये तिच्यासोबत इशान खट्टर, आशुतोष राणा, अंकित बिश्त, श्रीधर वत्सर, क्षितिज कुमार आणि ऐश्वर्या नारकर प्रमुख भूमिकेत आहेत. सैराटच्या तुलनेत या चित्रपटाला फारसं यश मिळालं नाही. 

४. दम लगा के हैशा (२०१५)

Dum Laga Ke Haisha

आयुष्यमान खुराना आणि भूमी पेडणेकरचा ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट आठवतोय का? ‘रोमँटिक कॉमेडी’ असा हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तर यशस्वी ठरलाच शिवाय समीक्षकांनीही याचं खूप कौतुक केलं. 

या चित्रपटामुळे भूमी पेडणेकरसाख्या गुणी अभिनेत्रीला बॉलीवूडचे दरवाजे मोकळे झाले. पुढे जाऊन भूमीने आपलं वजन कमी केलं आणि त्याच्याही चर्चा झाल्या. या चित्रपटाला त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. पण फार कमी जणांना माहिती आहे की, ‘दम लगा के हैशा’ हा चित्रपट ‘अगडबंब’ या मराठी चित्रपटावरून घेण्यात आला होता. (Marathi movies remade in Bollywood)

५. मुंबई दिल्ली मुंबई (२०१४)

Mumbai Delhi Mumbai

मराठीमधील काही उत्तम प्रयोगांपैकी एक म्हणजे २०११ साली आलेला सतीश राजवाडे दिग्दर्शित ‘मुंबई-पुणे-मुंबई’ हा चित्रपट. हा रोमँटिक कॉमेडी चित्रपट महाराष्ट्रातील प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. यानंतर २०१४ साली या चित्रपटाचा रिमेक ‘मुंबई-दिल्ली-मुंबई’ या नावाने प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये  शिव पंडित आणि पिया बाजपायमाडे मुख्य भूमिकेमध्ये होते. दुर्दैवाने हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. 

६. गोलमाल रिटर्न्स (२००८)

 

Golmaal Returns

रोहित शेट्टीच्या ‘गोलमाल’च्या सिक्वल मधला ‘गोलमाल रिटर्न्स’ हा चित्रपट प्रचंड हिट झाला होता. यामध्ये अजय देवगण, करीना कपूर-खान, तुषार कपूर, श्रेयस तळपदे आणि अर्शद वारसी प्रमुख भूमिकेत होते. हा चित्रपट १९८९ साली आलेल्या ‘फेका फेकी’ या मराठी चित्रपटाचा रिमेक आहे. (Marathi movies remade in Bollywood)

७. जिस देश में गंगा रहता है (२०००) 

Marathi movies remade in Bollywood
Jis Desh mein Ganga Rehta hai

महेश मांजरेकर दिग्दर्शित आणि गोविंदा, सोनाली बेंद्रे अभिनित ‘जिस देश में गंगा रहता है’ हा २००० साली आलेला कॉमेडी चित्रपट १९७२ साली आलेल्या ‘एकटा जीव सदाशिव’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर माफक यशस्वी ठरला. 

८.  मासूम (१९९६)

Marathi movies remade in Bollywood
Masoom

“छोटा बच्चा जान के हम को ना आँख दिखाना रे…” हे गाणं आठवतंय का? दिग्दर्शक महेश कोठारे यांचा हिंदी चित्रपट हा त्यांच्याच १९९४ साली आलेल्या ‘माझा छकुला’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. त्या काळात बॉक्स ऑफिसवर ५ कोटी रुपयांची कमाई करत हा चित्रपट हिट चित्रपटांच्या यादीत विराजमान झाला होता. 

९. हनिमून (१९९२)

Marathi movies remade in Bollywood
Honeymoon

ऋषी कपूर, वर्षा उसगावकर, अश्विनी भावे, कादर खान यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘हनिमून’ हा चित्रपट १९८८ सालच्या ‘किस बाई किस’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर ॲव्हरेज हिट ठरला होता. 

१०. मेरा साया (१९६६) 

Marathi movies remade in Bollywood
Mera Saaya

राज खोसला दिग्दर्शित थ्रिलर चित्रपट ‘मेरा साया’ हा ‘पाठलाग’ या मराठी चित्रपटाचा रिमेक होता. यामध्ये सुनील दत्त आणि साधना यांच्या प्रमुख भूमिका होत्या. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान यशस्वी ठरला होता. (Marathi movies remade in Bollywood)

=====

हे देखील वाचा –मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या आयुष्यावर आधारित टॉप ५ बायोपिक 

=====

तसं पाहायला गेलं तर ‘पेइंग गेस्ट’ (अशी ही बनवाबनवी), ‘हे बेबी’ (बाळाचे बाप ब्रह्मचारी), ‘टारझन द वंडर कार’ (एक गाडी बाकी अनाडी),  ‘क्यों कि मै झूठ नही बोलता’ (धागडधिंगा) हे चित्रपट देखील वरच्या यादीत घेता आले असते. परंतु, हे सर्व मराठी चित्रपट मूळ इंग्रजी चित्रपटांवरून प्रेरित असल्यामुळे त्यांचे नाव यामध्ये समाविष्ट केलेलं नाही.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Bollywood bollywood update Entertainment Marathi Movie
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.