दिग्दर्शक सुभाष घई आणि गीतकार आनंद बक्षी यांचे जबरदस्त ट्युनिंग!
Top 10 Marathi Serials – या आहेत गेल्या आठवड्यातील टॉप १० मराठी मालिका
मराठी चॅनेल्समध्ये आजकाल अनेक चॅनेल्सची भर पडली आहे. प्रत्येक चॅनेल्सवर विविध प्रकारच्या मालिका आणि रियालिटी शो सतत चालू असतात. प्रत्येक वाहिनीमध्ये आणि वाहिनीवर चालू असणाऱ्या प्रत्येक मालिकेमध्ये स्पर्धा असते ती ‘टीआरपी’ साठी. चला तर मग, जाणून घेऊया गेल्या आठवड्यात या स्पर्धेत यशस्वी ठरलेल्या टॉप १० मालिका (Top 10 Marathi Serials) कोणत्या आहेत.
१. रंग माझा वेगळा
गेले काही आठवडे सातत्याने टॉप ३ मध्ये असणारी स्टार प्रवाहावरील ‘रंग माझा वेगळा’ ही मालिका या आठवड्यात १० पैकी ७ रेटिंग मिळवून नंबर १ च्या पदावर विराजमान झाली आहे. या मालिकेला नेहमी सर्वात मोठी स्पर्धा असते ती स्टार प्रवाहावरीलच ‘आई कुठे काय करते’ या मालिकेची. परंतु, या आठवड्यात मात्र रंग माझा वेगळा या मालिकेने बाजी मारली.
२. आई कुठे काय करते
अवघ्या ०.३ रेटिंग्जमुळे दुसऱ्या क्रमांकावर आलेली ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. ६.७ रेटिंग्ज मिळालेली ही मालिका देखील दररोज स्टार प्रवाहावर प्रसारित होते.
३. सुख म्हणजे नक्की काय असतं
पुन्हा एकदा स्टार प्रवाहाने बाजी मारली आहे. सध्याच्या घडीला टॉप १० यादीतील बहुतांश मालिका स्टार प्रवाहावरच प्रसारित होणाऱ्या आहेत. ६.६ रेटिंग मिळवत ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेने टॉप ३ मध्ये स्थान मिळवलं आहे. (Top 10 Marathi Serials)
४. फुलाला सुगंध मातीचा
चौथ्या क्रमांकावर आहे ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका. या मालिकेला ५.७ रेटिंग मिळालं असून ती स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.
५. ठिपक्यांची रांगोळी
स्टार प्रवाहावरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ ही मालिका ४.८ रेटिंग मिळवत पाचव्या क्रमांकावर आहे.
६. मुलगी झाली हो
एकेकाळी लोकप्रियतेच्या शिखरावर असणारी स्टार प्रवाहावरील ‘मुलगी झाली हो’ ही मालिका मध्यंतरी प्रचंड चर्चेत आली होती. परंतु, सध्या मात्र मालिकेचा टीआरपी घसरला असून, सध्या ४.७ रेटिंगसह ही मालिका सहाव्या क्रमांकावर आहे. (Top 10 Marathi Serials)
७. सहकुटुंब सहपरिवार – महाएपिसोड
एका महाएपिसोडमुळे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेचा टीआरपी वधारला असून ४.४ रेटिंगसह या मालिकेचा ‘महाएपिसोड’ सातव्या क्रमांकावर आहे. ही मालिका देखील स्टार प्रवाहवर प्रसारित केली जाते.
८. माझी तुझी रेशीमगाठ
अखेर झी मराठीवरील मालिका टॉप १० च्या यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी झाली आहे. ही मालिका आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. मात्र तगडी स्टारकास्ट असूनही ४.२ रेटिंगसह या मालिकेला आठव्या क्रमांकावर स्थान मानावं लागलं आहे. (Top 10 Marathi Serials)
९. सहकुटुंब सहपरिवार
महाएपिसोड वगळता स्टार प्रवाहावरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेला अवघ्या ३.९ रेटिंगसह नवव्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं आहे.
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
१०. स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा
दहाव्या क्रमांकावर आहे स्टार प्रवाहावरील स्वाभिमान – शोध अस्तित्वाचा ही मालिका. या मालिकेला ३.५ रेटिंग्ज मिळाले आहेत. (Top 10 Marathi Serials)
निःसंशयपणे मालिकांच्या स्पर्धेत सध्यातरी स्टार प्रवाह या आठवड्याची आघाडीची वाहिनी ठरली आहे. या वहिनीला १४४७.३५ रेटिंग मिळाले आहेत. दुसरीकडे, झी मराठी आणि कलर्स मराठीला अनुक्रमे ५७२.४६ आणि ३६९.१६ रेटिंग मिळाले आहेत.
=====
हे देखील वाचा: काश्मिरी पंडितांवर झालेल्या अत्याचाराची मन हेलावून टाकणारी कहाणी
=====
संदर्भ: filmibeat.com