Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    sadhana and manoj kumar

    Lag Ja Gale हे गाणे राज खोसला यांना सुरुवातीला का आवडले नव्हते?

    rajesh roshana nd julie movie

    Julie सिनेमाच्या दिग्दर्शकाने संगीतकार राजेश रोशन यांना कां झापले होते?

    kishore kumar

    Kishore Kumar यांचे ‘कोई हमदम ना रहा…’ हे राग झिंजोटीवर आधारीत बेमिसाल गाणे कसे बनले?

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bollywood Actor : ‘बायको’ खंबीरपणे पाठीशी होती, म्हणून ‘हे’ अभिनेते

Dheeraj Kumar : संघर्षातून यशाकडे

अखेर प्रतीक्षा संपली! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘Family Man 3’;

‘दिवसाला ४० चपात्या आणि १.५ लीटर दूध’ Actor Jaideep Ahlawaचा

Aatali Batmi Phutali Teaser : खुनाच्या सुपारीभोवती फिरणारी भन्नाट कथा; १९

‘या’ कारणामुळे Mrunal Dusanis ने कलविश्वातल्या मुलाशी लग्न नाही केलं;

Parinati: अमृता सुभाष आणि सोनाली कुलकर्णी ही भन्नाट जोडी एकत्र झळकणार !

Jaideep Ahlawat : “‘नटसम्राट’ हिंदीत करण्याची इच्छा”

सिनेमाचा हिरो Rajesh Khanna पण किशोर कुमार यांचे गाणे दुसऱ्याच

Maalik : राजकुमार रावच्या मालिक चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा?

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

रात्री घरात एकटे असाल तर, चुकूनही बघू नका या 5 हॉरर हिंदी सिरीज 

 रात्री घरात एकटे असाल तर, चुकूनही बघू नका या 5 हॉरर हिंदी सिरीज 
मिक्स मसाला

रात्री घरात एकटे असाल तर, चुकूनही बघू नका या 5 हॉरर हिंदी सिरीज 

by मानसी जोशी 15/09/2022

हॉरर चित्रपट किंवा भयपटांचा खास असा एक प्रेक्षकवर्ग आहे. काहीजण तर रात्री झोप लागणार नाही किंवा मध्येच जाग आली तर भीती वाटेल, म्हणून भयपट बघायचं टाळतात, तर काहीजण हॉलिवूडचे चित्रपट हेच खरे भयपट असंच समीकरण धरून चालतात. या दुसऱ्या प्रकारांमधील लोक पूर्णपणे हॉलिवूडच्या प्रेमात असतात आणि आतुरतेने तिकडच्या चित्रपटांची वाट पाहत असतात. पण ओटीटीच्या आगमनाने मात्र बरेच संदर्भ बदलले आहेत.  (Top 5 Indian Horror Web Series)

हॉरर कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी तर मनोरंजनाचा खजिनाच उघडला गेला आहे. केवळ इंग्लिश नाही बरं का, तर हिंदीमध्येही उत्तमोत्तम भयकथा असणाऱ्या वेबसिरीज वेगवेगळ्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध आहेत. आज अशाच काही वेबसिरीजबद्दल माहिती घेऊया ज्या तुम्हाला हॉलिवूडच्या भयपटांची आठवण करून देतील.

१. टाईपरायटर (Typewriter)

गोव्यामध्ये राहणारे समीरा, सत्यजित आणि देवराज या तिघांना हॉंटेड गोष्टींबद्दल प्रचंड कुतूहल असतं म्हणून ते एक ‘घोस्ट क्लब’ तयार करतात. या मिशनचा भाग म्हणून एक दिवस शाळा चुकवून हॉंटेड हवेलीचं रहस्य शोधायला ते ज्या हवेलीत जातात, पण त्याच वेळी त्या हवेलीत एक कुटुंब राहायला येतं. 

हॉंटेड म्हणून संपूर्ण गोव्यामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या या हवेलीत आलेल्या कुटुंबातील जेनीच्या वडिलांची ही हवेली असते. जेनीचं बालपण या हवेलीत गेलेलं असतं. सामान लावताना जेनीला एक जुना टाईपरायटर मिळतो आणि चालू होतो विचित्र घटनांचा खेळ. 

सिरीजमध्ये सस्पेन्स, थ्रिल आणि कॉमेडी यांचं ‘परफेक्ट’ मिश्रण जमून आलं आहे. सीरिजचे एकूण ५ भाग असून दिग्दर्शकाने पहिल्या सीझनच्या शेवटी दुसरा सिझन येण्याचा क्ल्यू दिला आहे. पण २०१९ साली प्रदर्शित झालेल्या वेबसिरीजचा दुसरा सिझन अद्यापही आलेला नाही. ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. IMDB वर या सीरिजला ६.५ रेटिंग देण्यात आलं आहे. 

2. भ्रम (Bhram)

सायकॉलॉजिकल हॉरर या प्रकारात मोडणारी ही सिरीज म्हणजे मास्टरपीस आहे. सिरीज उत्कंठावर्धक तर आहेच पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे भय आणि रहस्याचं एक उत्तम ‘कॉम्बिनेशन’ या सिरीजमध्ये बघायला मिळतं. अपघातानंतर आपल्या बहिणीकडे राहायला आलेल्या अलिशाला होणारे भास खरंच असतात की त्याचा वास्तवाशी संबंध असतो यामध्ये प्रेक्षक गुंतून जातात. सिरीजबद्दल अधिक काही लिहिलं तर बघण्यातली मजा निघून जाईल. 

सीरिजचे एकूण ८ भाग असून सिरीज झी 5 वर उपलब्ध आहे. IMDB वर या सीरिजला ६.३ रेटिंग देण्यात आलं असलं तरी या रेटिंग्जवर फारसं जाऊ नका. सिरीज खरंच खूप चांगली आहे. (Top 5 Indian Horror Web Series)

3. घुल (Ghoul)

सिरीजची सुरुवात होते ती लष्कराने पकडलेल्या एका विचित्र कैद्यापासून. त्याच्या चौकशीदरम्यान  विचित्र, असामान्य घटना घडतात. आता या गोष्टी इतक्या विचित्र असतात की, हा कैदी पॅरलल युनिव्हर्समधून आलेला आहे का, अशी शंका येते. बस! यापेक्षा जास्त काही लिहिलं तर स्पॉईलर ठरेल. 

प्रचंड उत्कंठावर्धक आणि  रहस्य व भय यांचं उत्तम मिश्रण असणारी ही सिरीज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. सिरीजचे एकूण ३ भाग असून दुसरा सिझन येणार की नाही याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा निर्माते अथवा ओटीटी प्लॅटफॉर्मकडून करण्यात आलेली नाही. IMDB वर या सीरिजला ७.० रेटिंग देण्यात आलं आहे. 

4. शैतान हवेली (Shaitaan Haveli)

बी-ग्रेड चित्रपट निर्माते हरीमन एका जुन्या हवेलीत त्याच्या हॉरर चित्रपटाच्या शूटिंगसाठी जातात. मात्र या हवेलीमध्ये विचित्र घटना घडू लागतात. हॉरर चित्रपट म्हटलं की, त्यासोबत सस्पेन्स असतोच. पण हॉरर- ड्रामा, हॉरर- सायको थ्रिलर, हॉरर- क्राईम थ्रिलर अशी अनेक प्रकारची कॉम्बिनेशन्सही असतात. ही सिरीज सर्वात कठीण अशा हॉरर -कॉमेडी प्रकारातली आहे. त्यामुळे सिरीज घाबरवते कमी आणि हसवते जास्त. 

सिरीजचे एकूण ८ भाग असून आत्तापर्यंत सिरीजचा एकच सिझन प्रदर्शित झाला आहे. ही सिरीज अमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहे. IMDB वर या सिरिजला ७.१ रेटिंग देण्यात आलं आहे. (Top 5 Indian Horror Web Series)

===============

हे ही वाचा: भारतातील बहुतांश वेबसिरीज नेहमी या 3 ‘स’ वरच आधारित का असतात?

गंगा जमुना टॉकीज: इथे मराठी चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हा मोठी बातमी झाली होती कारण …

===============

5. परछाईया (Parchhayee)

ही वेबसिरीज रस्किन बाँड यांच्या ‘द घोस्ट स्टोरीज’ या पुस्तकावर आधारित आहे. रस्किन बाँड ब्रिटीश वंशाचे भारतीय लेखक आहेत. त्यांच्या कादंबऱ्या आणि बालसाहित्य प्रचंड लोकप्रिय आहे. सिरीजचे एकूण १२ भाग असून, प्रत्येक भागामध्ये वेगळी कथा दाखवण्यात आली आहे. 

सिरीज ऊतकांठावर्धक आहे. प्रत्येक भाग वेगळा असल्यामुळे पुढच्या भागाची उत्सुकता हा प्रकार या सिरीजमध्ये नाही. ही सिरीज झी 5 वर उपलब्ध असून IMDB वर या सीरिजला ५.२ रेटिंग देण्यात आलं आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Horror web series Webseries
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.