Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

लोकप्रिय अभिनेत्री Priya Marathe हिची कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी

Thoda Tuza Ani Thoda Maza मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने शेअर

Bigg Boss 19: प्रणित मोरेवर सलमान खानचा संताप, पहिल्याच विकेंड वारमध्ये दबंग भाईने सुनावलं

हार्दिक-वीणाचा रंगला लग्नसोहळा!; Aranya मधील धमाकेदार गाणं प्रदर्शित

Shakti Samanta : हिट सिनेमांचा सुपरहिट दिग्दर्शक

Pallavi Joshi यांनी मराठी जेवणाबाबतच्या विवेक अग्निहोत्रींच्या त्या विधानावर केली

Nagraj Manjule : शाळेत असतानाच लागलेलं दारुचं व्यसन पण….; नागराज

“नवोदित कलाकार कसा मोठा होणार?”, Siddhant Sarfareचा Prasad Oakला प्रश्न;

हॉलीवूडची कॉपी केल्यामुळे ‘या’ हिंदी सिनेमाच्या सर्व प्रिंट्स कोर्टाने संपूर्णपणे

Jr NTR ‘वॉर २’ चित्रपटानंतर या दोन चित्रपटांमध्ये झळकणार!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज 

 आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज 
कलाकृती विशेष

आवर्जून बघाव्यात अशा मराठीमधील टॉप ५ वेबसिरीज 

by Team KalakrutiMedia 24/09/2022

सध्याचा काळ हा वेबसिरीजचा काळ आहे. मोबाईलवर कधीही पाहता येणाऱ्या आणि पुढच्या भागाची वाट न पाहता सलग पाहता येणाऱ्या वेबसिरीज सध्या सर्व वयोगटाच्या व्यक्तींच्या पसंतीस उतरत आहेत. इंग्रजी, हिंदी भाषेसह आता प्रादेशिक भाषेतही अनेक वेबसिरीज बनत आहेत आणि त्या डब करून हिंदीसह इतर भाषेतही प्रसारित केल्या जात आहेत किंवा सब टायटलसहही बघितल्या जात आहेत. वेबसिरीजच्या या दुनियेत कित्येक मराठी वेबसिरीजही दाखल झाल्या आहेत. आज मराठीमधील टॉप ५ वेबसिरीजच कोणत्या याबद्दल माहिती घेऊया (Top 5 Marathi Web series) –

एक थी बेगम 

एप्रिल २०२० मध्ये ऐन लॉकडाऊनच्या काळात MX प्लेअरवर प्रदर्शित झालेली ‘एक थी बेगम’ ही वेबसिरीज सत्यघटनेवर आधारित आहे. सचिन दरेकर दिग्दर्शित या सिरीजमध्ये अनुजा साठे – गोखले मुख्य भूमिकेत होती. तिच्यासोबत या सिरीजमध्ये चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर, अंकित मोहन, विजय निकम, राजेंद्र शिरसाटकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

या सिरीजमध्ये अनुजा साठेने साकारलेली अशरफ भाटकर ही व्यक्तिरेखा म्हणजे प्रत्यक्षातली सपना दीदीची व्यक्तिरेखा असल्याच्या चर्चा तेव्हा रंगल्या होत्या. आपल्या पतीच्या खुनाचा बदला घेण्यासाठी अशरफ आपला जीव धोक्यात घालते. या सूडाच्या प्रवासात अशरफचे कित्येक शत्रू निर्माण झालेले असतात. अश्रफच्या सूडाचा थरार पाहताना प्रेक्षक एक क्षणही सिरीजपासून लांब जात नाही. IMDB वर या सीरिजला ९.४ रेटिंग देण्यात आलं आहे. गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये या सिरीजचा दुसरा सीझनही आला आणि  तो देखील तितकाच लोकप्रिय झाला. 

अनुराधा 

फक्त मराठी भाषेतील मनोरंजनात्मक कार्यक्रम प्रदर्शित करणाऱ्या ‘प्लॅनेट मराठी’ची अजून एक दर्जेदार वेबसिरीज. ‘अनुराधा’ ही वेबसिरीज सस्पेन्स थ्रिलर वेबसिरीजचं एक उत्तम उदाहरण आहे. यामध्ये तेजस्विनी पंडित, सचित पाटील, सोनाली खरे, सुकन्या कुलकर्णी आणि अस्ताद काळे मुख्य भूमिकेत आहेत. IMDB वर या वेबसिरीजला ९.१ रेटिंग मिळालं आहे. यामध्ये ‘कोर्ट रूम ड्रामा’ चित्रित करण्यात आला असून सिरीजची कहाणी संपूर्णपणे वेगळी आणि रोमांचक आहे. (Top 5 Marathi Web series)

या सिरीजबद्दल काहीही लिहिलं, तर तो स्पॉईलर ठरेल त्यामुळे यापेक्षा अधिक माहिती देता येणार नाही. पण तेजस्विनी पंडितने यामध्ये कमाल अभिनय केला आहे. शिवाय तिचे लुक्सही लोकांच्या पसंतीस उतरले आहेत. 

सुहास शिरवळकर लिखित ‘समांतर’ या कादंबरीवर आधारित ही वेबसिरीज दिग्दर्शित केली होती. मराठीमधील लोकप्रिय दिग्दर्शक सतीश राजवाडे यांनी. “एकाचा भूतकाळ आहे दुसऱ्याचा भविष्यकाळ”, या अनोख्या थीमवर आधारित असणारं कथानक प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्यात यशस्वी झालं. IMDB वर या सीरिजला ८.५ रेटिंग मिळालं आहे. 

कुमार महाजन (स्वप्नील जोशी) आणि सुदर्शन चक्रपाणी (नितीश भारद्वाज) या दोन व्यक्तिरेखांभोवती या सीरिजचं कथानक फिरतं. याखेरीज सिरीजमध्ये तेजस्विनी पंडित, जयंत सावरकर, गणेश रेवडेकर आदी कलाकारही लक्षवेधी भूमिकेमध्ये आहेत. (Top 5 Marathi Web series)

उत्कंठावर्धक वळणावर पहिल्या सिझनची सांगता करण्यात आली होती. त्यामुळे दुसऱ्या सीझनबद्दल प्रचंड उत्सुकता होती. दुसरा सिझन १ जुलै २०२१ ला प्रदर्शित करण्यात आला. या सीझनचे दिग्दर्शन केले होते समीर विद्ध्वंस यांनी. या सीझनमधली सई ताम्हणकरची एंट्री विशेष लक्षवेधी ठरली. 

रानबाजार 

रानबाजार ही वेबसिरीज सस्पेन्स, थ्रिलर, पॉलिटिकल ड्रामा प्रकारातली मर्डर मिस्ट्री आहे. राजकारण्यांसाठी तीनच गोष्टी महत्वाच्या असतात सत्ता, खुर्ची आणि पैसा. यासाठी ते वाट्टेल त्या थराला जाऊ शकतात. पण काहीवेळा या राजकीय नाट्यामध्ये निरागस माणसं अकारण भरडली जातात. राजकारणाची काळी बाजू उलगडून दाखवणारी ही वेबसिरीज प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. सिरीजमध्ये बोल्ड सीन्स आणि शिव्या यांची खैरात केलेली आहे. 

प्रत्येकाची कहाणी वेगळी, समस्या वेगळ्या.. आता पुढे काय या प्रश्नाभोवती ही सिरीज फिरत राहते. ही सिरीज दिग्दर्शित केली आहे अभिनित पानसे यांनी. सिरीजमध्ये मकरंद अनासपुरे, तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माळी, मोहन आगाशे, सचिन खेडेकर, अभिजीत पानसे, वैभव मांगले, अनंत जोग, मोहन जोशी आदी कलाकार महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. IMDB वर या सीरिजला ८ रेटिंग देण्यात आलं आहे. 

========

हे देखील वाचा : अमेझॉन प्राईम: ओटीटीची १ महिन्याची ट्रायल घेतली आहे? या वेबसिरीज आवर्जून बघाच 

========

काळे धंदे 

२०१९ साली झी ५ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ‘काळे धंदे’ ही वेबसिरीज म्हणजे वेबसिरीजच्या दुनियेला साजेशी अशी बोल्ड सीन्स आणि शिव्यांची खैरात असणारी वेबसिरीज आहे. ही एक कॉमेडी  वेबसिरीज असून यामध्ये महेश मांजरेकर, शुभंकर तावडे, नेहा खान, ओंकार राऊत आणि निखिल रत्नपारखी यांच्या मुख्य भूमिका आहेत. (Top 5 Marathi Web series)

विकी नावाचा एक तरुण फोटोग्राफर एका मुलीलासोबत नको त्या अवस्थेत असताना त्याचे काका त्याला बघतात आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदलून जातं. यानंतर विकीच्या आयुष्यात होणारा गोंधळ विनोदी पद्धतीने दाखविण्यात आला आहे

– भाग्यश्री बर्वे

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Entertainment Kalakruti Media Marathiwebseries top5webseries Webseries
Previous post
Next post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2025. All Right Reserved.