‘तु मला सगळं काही दिलंस..!’ विशाखा सुभेदाराची ‘ती’ पोस्ट व्हायरल
मुंबईमधील टॉप ८ शूटिंग लोकेशन्स… इथे झालं आहे अनेक प्रसिद्ध चित्रपटांचे शूटिंग
मुंबई! भारतामधलं एक गजबजलेलं शहर. देशाची आर्थिक राजधानी आणि अनेकांची स्वप्ननगरी. या स्वप्ननगरीमध्येच वसली आहे बॉलिवूडची मायानगरी. बॉलिवूडच्या कित्येक चित्रपटांचं शूटिंग मुबईतल्या रस्त्यांवर, गार्डनमध्ये, समुद्रावर इतकंच काय तर इथल्या झोपडपट्टीतही झालं आहे. आज आपण मुंबईमधील अशाच महत्वाच्या जागांबद्दल माहिती घेणार आहोत जिथे प्रसिद्ध हिंदी चित्रपटांचे शूटिंग झालं आहे. (Shooting Locations in Mumbai)
बहुतांश चित्रपट आणि टीव्ही मालिका फिल्मसिटीमध्येच चित्रित केल्या जातात. गोरेगावमध्ये जवळपास ३५० एकरमध्ये पसरलेल्या फिल्मसिटीमध्ये २० इनडोअर स्टुडिओ आहेत. तसेच बागा, तलाव, जंगले, शहरे, घरे, गावे इत्यादीं गोष्टीही उपलब्ध आहेत. परंतु, मुंबईमध्ये केवळ फिल्मसिटी हेच एकमेव शूटिंग लोकेशन नाहीये. आज आपण फिल्मसिटी व्यतिरिक्त प्रसिद्ध असणाऱ्या मुंबईतील शूटिंग लोकेशन्सबद्दल माहिती घेऊया (Shooting Locations in Mumbai)
१. गेटवे ऑफ इंडिया:
मुंबईमधील ऐतिहासीक ओळखींपैकी एक म्हणजे ‘गेट वे ऑफ इंडिया’. इथून दिसणारे अरबी समुद्राचे विहंगम दृश्य, इथली वर्दळ, फेरीवाले या साऱ्यामुळे हे ठिकाण कित्येक सिनेनिर्मात्यांचे आवडतं शूटिंग लोकेशन आहे. गजनी, बॉम्बे, कलयुग, हीरो नंबर 1 आणि मन यासारख्या चित्रपटांसह कित्येक प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे आणि मालिकांचेही चित्रीकरण इथे झाले आहे.
गोविंदाच्या आँखे ‘बडे काम का बंदर’ हे गाणं आठवतंय का? ते गाणं याच गेट वे ऑफ इंडियावर चित्रित करण्यात आलं होतं
२. छत्रपती शिवाजी टर्मिनस (सीएसटी):
मुंबई लोकल ही मुंबईची मुख्य ओळख आहे. सीएसटी हे जगातील सर्वाधिक प्रवाशांची वर्दळ असणारं रेल्वे स्थानक आहे. कित्येक दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटांच्या शूटिंगसाठी ‘सीएसटी’ची निवड केली आहे. स्लमडॉग मिलेनियर या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटात छत्रपती शिवाजी टर्मिनसवर चित्रित केलेली काही दृश्ये होती. याचबरोबर अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला सीएसटी स्थानकावर चित्रित केलेली दृश्ये दिसतील.
बंटी आणि बबली या चित्रपटात बंटी आणि बबली युपी मधून ट्रेन पकडून जेव्हा मुंबईत येतात त्यावेळचं शूटिंग सीएसटीला झालं होतं. (Shooting Locations in Mumbai)
३. कुलाबा कॉजवे:
कुलाबा कॉजवे म्हणजे मुंबई शहरामधील ‘कल्चर स्क्वेअर’. या ठिकाणी अनेक अपमार्केट, किरकोळ दुकाने तसेच रस्त्याच्या कडेला सर्व प्रकारची उत्पादने विकणारे फेरीवाले आहेत. अनेक रेस्टॉरंट्स आणि भोजनालयांव्यतिरिक्त, कुलाब्यात नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम इत्यादी महत्त्वाच्या इमारती देखील आहेत. आमीर खानच्या ‘तलाश’ चित्रपटातील काही दृश्ये कुलाबा कॉजवे येथे चित्रित करण्यात आली आहेत.
४. मरीन ड्राईव्ह:
मरीन ड्राईव्ह! प्रेमी युगुलांचे आवडते ठिकाण आणि चित्रपट निर्मात्याने आवडते शूटिंग लोकेशन! ताजी हवा, मावळतीचा सूर्य, संध्याकाळचे रंगीबेरंगी आकाश, रस्त्याच्या कडेला असलेली खजुरीची झाडं आणि मोठ्या प्रमाणावर असणारी रेस्टॉरंट्स, असा रोमँटिक दृश्यांसाठी परफेक्ट असणारा माहोल इथे अनुभवायला मिळतो. ‘धूम’ या सुपरहिट चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण इथे करण्यात आलं होतं.
५. धारावी:
आशियामधील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणजे धारावी. अर्थात हे ठिकाण मुंबईच्या सौंदर्यरूपी चंद्रावरचा डाग आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु, याच धारावीत राहूनच कित्येक लोक आपला उदरनिर्वाह करत आहेत. बॉलिवूडच्या कित्येक चित्रपटांमध्ये धारावीच्या दर्शन अनेकांना घडले असेल.
दीवार, सलाम बॉम्बे, धारावी, सरकार, ट्रॅफिक सिग्नल, फूटपाथ अशा कित्येक चित्रपटांचे चित्रीकरण येथे झाले आहे. २००८ सालच्या आलेला ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘स्लमडॉग मिलेनियर’ या चित्रपटाच्या काही भागांचे चित्रीकरण धारावी झोपडपट्टीमध्ये करण्यात आले होते.(Shooting Locations in Mumbai)
६. अक्सा बीच:
या बीचबद्दल काय बोलणार? ‘गॉड तुस्सी ग्रेट हो’ या चित्रपटात ‘तुझे अक्सा बीच घुमा दूं’ हे अख्ख गाणं या बीचवरुन लिहिण्यात आलं आहे आणि याच बीचवर या गाण्याचे शुटिंगही पार पडले आहे. अतिशय सुंदर असे अक्सा बीच कित्येक चित्रपटांच्या निर्मात्या दिग्दर्शकांनी आपल्या चित्रपटासाठी या बीचचीच निवड केली आहे. ‘सागर’ या चित्रपटाचा काही भाग याच बीचवर चित्रित करण्यात आला होता.
७. बांद्रा:
पश्चिम-मध्य मुंबईत वसलेले बांद्रा हे उपनगर अत्यंत उच्चभ्रू समजले जाते. बँडस्टँड, कार्टर रोड, पाली हिल, वांद्रे-वरळी सी लिंक आणि जॉगर्स पार्क ही येथील प्रसिद्ध ठिकाणे आहेत. सुभाष घई यांचा २००३ आलेल्या ‘जॉगर्स पार्क’ या चित्रपटाचे चित्रीकरण याच ठिकाणी करण्यात आले होते. (Shooting Locations in Mumbai)
====
हे ही वाचा: खुशखबर, नाटकं बहरली! आता हवी फक्त माध्यमांची साथ
====
८. जुहू बीच:
मुंबईतील लोकप्रिय शूटिंग लोकेशन्सची यादी जुहू बीचचा उल्लेख केल्याशिवाय पूर्ण होणार नाही. कित्येक मुंबईकरांचे आवडते ठिकाण म्हणजे जुहू बीच. जॉनी वॉकर अभिनीत सीआयडी, आनंद आणि सीता और गीता यांसारख्या जुन्या चित्रपटांसह कित्येक प्रादेशिक चित्रपटांचे आणि मालिकांचे चित्रीकरण जुहू बीचवर झाले आहे.
====
हे नक्की वाचा: बॉलिवूडची मुळं मुंबईतच का खोलवर पसरली आहेत? बॉलिवूड म्हटलं की मुंबईच का आठवते ?
====
वर उल्लेखलेली ठिकाणे मुंबईकरांसाठी अजिबातच नवीन नाहीत. तसंच ज्यांनी मुंबई पहिली आहे त्यांनाही ही ठिकाणे चांगलीच परिचित असतील. त्यामुळे चित्रपट, मालिका किंवा अलीकडच्या काळात लोकप्रिय असलेला प्रकार म्हणजे वेबसिरीज बघताना ही ठिकाणे दिसल्यास सहज ओळखता येतील. (Shooting Locations in Mumbai)