
Dhadak 2 : जातीय वाद-भेदभावामुळे तृप्ती डिमरीचा चित्रपट रखडला?
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ हा चित्रपट २०१६ साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाची हिंदीसह दाक्षिणात्य भाषांनाही भूरळ पडली आणि या चित्रपटाचे वेगवेगळ्या भाषांमध्ये रिमेक झाले. २०१८ साली ‘धडक’ हा हिंदी चित्रपट आला ज्यात जान्हवी कपूर आणि इशान खटट्टर प्रमुख भूमिकेत होते. आता लवकरच ‘धडक २’ हा चित्रपट येणार असून यात भाभी २ अंतरात तृप्ती डिमरी आणि सिद्धांत चतुर्वेदी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. आधी हा चित्रपट २०२४ मध्येच प्रदर्शित होणार होता. मात्र, जातीय वाद- भेदभाव यावर या चित्रपटात भाष्य केल्यामुळे CBFC (Central Board of Film Certification) सर्टिफिकेट न मिळाल्यामुळे २०२५ मध्ये चित्रपट रिलीज होईल असं सांगण्यात येत असलं तरी अद्याप मुहूर्त काही सापडत नाहीये. (Dhadak 2)
खरं तर मार्च मिहन्यात होळीच्या आसपास ‘धडक २’’ रिलीज होईल असं सांगण्यात आलं होतं. पण CBFC सर्टिफिकेटच्या कचाट्यात अडकल्यामुळे होळीला चित्रपट रिलीज होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. पण जर का CBFC चा हिरवा कंदिल मिळाला तर ‘धडक २’ चित्रपटाचा सामना जॉन अब्राहमच्या द डिप्लोमॅट (The Diplomat) चित्रपटासोबत होईल. आणि असं जर का झालं तर नक्कीच बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची कमाई क्लॅश होण्याची शक्यता आहे. (Dhadak 2)
सुत्रांनी बॉलिवूड हंगामाला दिलेल्या माहितीनुसार, ‘धडक २’ (Dhadak 2) चित्रपटात जात, धर्म या संवेदनशील विषयावर भाष्य करण्यात आलं असून CBFC च्या कमिटीमने या चित्रपटाने इतका महत्वाचा विषय हाताळण्याचा केलेला विटार हा कौतुकास्पद आहे असं म्हलं आहे. परंतु, तरीही जात, धर्म हा भारतीय संस्कृतीचा फार नाजुक विषय असल्यामुळे त्यावर चर्चा करुन चित्रपटासंदर्भात पुढील निर्णय दिला जाणार आहे. मुळात धडक २ हा चित्रपट Pariyerum Perumal या तमिळ चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. त्या तमिळ चित्रपटालाही सर्टिफिकेट जर का मिळाले होते तर ‘धडक २’ बोर्डाच्या कचाट्यात अडकण्याचे कारण नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे. (Entertainment trending news)

२०१८ साली प्रदर्शित झालेल्या धडक चित्रपटाची कथा दोन वेगवेगळ्या जातीतील प्रेमी युगुलाची होती. आणि ‘धडक २’ चित्रपटाचे कथानकही जातीय वादावरच असणार आहे. त्यामुळे ‘धडक २’ ला CBFC चा हिरवा कंदिल मिळणार का? आणि चित्रपट कधी भेटला येणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे. धडक २ चित्रपटाचे दिग्दर्शन शाझिया इक्बाल यांनी केले असून चित्रपटात Tripti Dimri, सिद्धांत चतुर्वेदी, सौरभ सचदेवा यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. (Bollywood gossips)
===========
हे देखील वाचा : तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका? बायोपिकमध्ये समोर येणार अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास गोष्टी
===========
तर, John Abraham ची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘द डिप्लोमॅट’ (The Diplomat) या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवम नायर यांनी केले आहे. या चित्रपटात जॉन सोबत सादिया खातिब, शारीब हाश्मी, रेवथीसह अनेक कलाकार असणार आहेत. १४ मार्च २०२५ रोजी हा चित्रपट देशभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे Dhadak 2 आणि ‘द डिप्लोमॅट’चा आमना सामनाहोणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. (entertainment masala)