Aga Aga Sunbai Kay Mhantay Sasubai! मनात साठलेल्या भावना शब्दांत

प्रभाससोबत ‘स्पिरिट’मध्ये दिसणार Tripti Dimri; पहिला लूक आला समोर
फिल्मी दुनियेत कधी कोणता लोकप्रिय कलाकार नवख्या कलाकाराकडून रिप्लेस होईल याचा अंदाज नाही… अक्षय कुमार (Akshay Kumar) याच्या गाजलेल्या सीक्वेल्समध्ये त्याची जागा कार्तिक आर्यनने घेतली… तर, दुसरीकडे दीपिका पादूकोण (Deepika Padukone) हिला बॉलिवूड आणि साऊथच्या मोठ्या चित्रपटांतून बाहेरचा रस्ता दाखवला गेला… त्यातलाच बिग बजेट चित्रपट म्हणजे ‘स्पिरीट’ (Spirit)… संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित या चित्रपटात प्रभाससोबत आधी दीपिका दिसणार होती, परंतु आता त्याच्यासोबत या चित्रपटात ‘अॅनिमल’ चित्रपट फेम तृप्ती डिमरी दिसणार आहे… चला तर जाणून घेऊत तृप्तीचा फिल्मी प्रवास… (Bollywood Movie)
तर, तृप्ती डिमरी हिची ओळख ‘बुलबूल’ या चित्रपटामुळे झाली… पण तिला देशभरात खरी लोकप्रियता मिळाली ती म्हणजे रणबीर कपूरच्या ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटामुळे… या चित्रपटातील तिचा बोल्ड अंदाज प्रेक्षकांना भावला… आणि मग काय त्यानंतर बऱ्याच चित्रपटांत तिची वर्णी लागली… नुकताच नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी १ जानेवारी २०२६ रोजी संदीप रेड्डी वांगाच्या (Sandeep Reddy Vanga) स्पिरिट चित्रपटाचा पहिला पोस्टर रिलीज झाला असून यात प्रभास पाठमोरा दिसतोय पण तृप्तीचा अनोखा अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळतोय…

‘अॅनिमल’मुळे रातोराज नॅशनल क्रश झालेल्या तृप्तीने आत्तपर्यंत ९ चित्रपटांमध्ये प्रमुख अभिनेत्री म्हणून काम केलं आहे… तसेच, काही शॉर्ट फिल्म्समध्येही उल्लेखनीय काम करुन तिने प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली आहे… २०१७ मध्ये श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) दिग्दर्शित ‘पोस्टर बॉईज’ या चित्रपटातून तिची बॉलिवूडची कारकिर्द सुरु झाली होती… यात तिने सनी आणि बॉबी देओल यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती… (Tripti Dimri Movies)
पुढे २०१८ मध्ये तिचा ‘लैला मजनू’ हा चित्रपट आला होता… बॉक्स ऑफिसवर जरी या चित्रपटाने यश मिळवलं नसलं तरी तिच्या अभिनयाची जोरदार चर्चा झाली… त्यानंतर ‘बुलबुल’, ‘मॉम’, ‘बॅड न्युज’, ‘भूल भूलैय्या ३’, ‘धडक २’, ‘विक्की विद्या का वो वाला व्हिडीओ’ या चित्रपटांमध्ये तिने कामं केली…
================================
हे देखील वाचा : “आता एक सोलो चित्रपट करून बघच”; Drishyam 3च्या दिग्दर्शकाचा अक्षय खन्नाला सल्ला
================================
आता ‘स्पिरिट’च्या निमित्ताने साऊथमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवण्यासाठी तृप्ती सज्ज झाली आहे… आता या चित्रपटात दीपिका पादूकोणला रिप्लेस केल्यानंतर ती त्या तोडीचा अभिनय करते का हे पाहणं महत्वाचं असणार आहे.. तसेच, येत्या काळात दीपिकानंतर (Deepika Padukone Movies) अजून कोणत्या लोकप्रिय अभिनेत्रींना तृप्ती रिप्लेस करणार हे पाहणंही औस्तुक्याचं असणार आहे… (Spirit Movie)
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi