Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

Bigg Boss Marathi 6 च्या घरात होणार Abhijit Bichukale ची

मराठमोळ्या Tejaswi Prakash ने मुंबईत घेतलं अलिशान घर, किंमत ऐकून तुम्हाला

Krantijyoti Vidyalay Marathi Madhyam Ott Release: क्रांतीज्योतीची पोरं आता OTT ही

Nutan : ‘चंदन सा बदन चंचल चितवन..’; गाण्याच्या मेकिंगची भन्नाट

Geetu Mohandas : ४ पुरुष दिग्दर्शकांना भिडणार १ स्त्री दिग्दर्शिका;

Big Boss Marathi : “रेशमताईच्या बेडजवळ रोज कुणीतरी रात्री टकटक

रितेशला शिवरायांच्या रुपात पाहून भारावला Vicky Kaushal; ‘त्या’ कमेंटमुळे प्रेक्षकांचं

तन्वी आणि प्रभूच्या नात्यात फूट? Rakhi Sawant ने लावली काडी

Lata Mangeshkar, आशा भोसले आणि गीता दत्त यांची एकाच ट्यूनवरील

Big Boss Marathi Sesaon 6 : “माझ्या आई-बाबांना हे आवडणार

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका? बायोपिकमध्ये समोर येणार अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास गोष्टी

 तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका? बायोपिकमध्ये समोर येणार अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास गोष्टी
Tripti Dimri in Parveen Babi Biopic
मिक्स मसाला

तृप्ती डिमरी साकारणार परवीन बाबीची भूमिका? बायोपिकमध्ये समोर येणार अभिनेत्रीच्या आयुष्यातील खास गोष्टी

by Team KalakrutiMedia 09/08/2024

परवीन बाबी 70 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री मानली जायची. बॉलिवूडमध्ये कधी बोल्ड अभिनेत्रींचं नाव घेतलं तर त्यात परवीन बॉबीचं नाव नक्कीच येतं, 70 च्या दशकात ती आपल्या काळातील सर्वात ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री मानली जायची. परवीन तिच्या फॅशन आणि तिच्या कूल स्टाईलमुळे बरीच चर्चेत आली होती आणि त्याचबरोबर तिच्या दमदार अभिनयामुळे तिचा लोकांमध्ये खास ठसा उमटला होता. वैयक्तिक आयुष्यात सुरू असलेल्या वादळामुळे त्यांनी लवकरच जगाचा निरोप घेतला असला तरी लोक आजही त्यांची आठवण काढतात. अशातच आता तिच्या आयुष्यावर बायोपिक बनणार असून त्यासाठी एका अभिनेत्रीचा शोध घेतला जात असून या यादीत अॅनिमल फेम तृप्ती डिमरीचे नाव अग्रस्थानी येत आहे.(Tripti Dimri in Parveen Babi Biopic)

Tripti Dimri in Parveen Babi Biopic

‘अॅनिमल‘ चित्रपटापासून तृप्ती डिमरीचे स्टार्स वाढत आहेत. अॅनिमल या चित्रपटानंतर तिला ‘भाभी २’ हा टॅग मिळाला आहे. नुकतीच ती ‘बॅड न्यूज‘ या चित्रपटात झळकली होती. याशिवाय आगामी काळात ही अभिनेत्री ‘भूल भुलैया ३‘ या चित्रपटात झळकणार आहे. दरम्यान, तृप्तीला बायोपिक मिळाल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समधून केला जात आहे. फिल्मफेअरच्या रिपोर्टनुसार, तृप्ती डिमरी परवीन बाबीच्या बायोपिकमध्ये दिसू शकते, तिच्या नावाची चर्चा आहे. यात ती मुख्य भूमिकेत दिसत आहे. मात्र, अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. यापूर्वी ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी उर्वशी रौतेलाचे नाव पुढे येत होते. पण, आता तृप्तीच्या नावाची चर्चा आहे.

Tripti Dimri in Parveen Babi Biopic
Tripti Dimri in Parveen Babi Biopic

परवीन बाबी यांचे चरित्र लेखिका करिश्मा उपाध्याय यांनी लिहिले आहे. या चरित्रावर आधारित हा चित्रपट बनवला जाणार असल्याचे बोलले जात आहे. 1970 ते 1980 या काळात परवीन बाबी अनेक हिट चित्रपटांचा भाग होत्या. मात्र, वैयक्तिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही आयुष्यात त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले.(Tripti Dimri in Parveen Babi Biopic)

==============================

हे देखील वाचा: नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा, नागार्जुन यांनी फोटो शेअर करत चाहत्यांना दिला आश्चर्याचा धक्का

==============================

तृप्ती डिमरीबद्दल बोलायचे झाले तर तिने ‘पोस्टर बॉईज‘ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. ‘अॅनिमल‘ चित्रपटानंतर तिच्या कारकिर्दीला इतकी गती मिळाली की ती आता प्रत्येक दिग्दर्शकाच्या आवडत्या यादीत आली आहे.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: actress Actress Tripti dimari Bollywood bollywood update Celebrity parveen babi Biopic Tripti Dimri in Parveen Babi Biopic writer karushma upadhyay
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.