Skip to content
Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    बात पुरानी बडी सुहानी गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
    manoj kumar and sadhana

    Manoj Kumar आणि साधना यांचा ‘हा’ चित्रपट तब्बल दहा वर्षानंतर प्रदर्शित झाला!

    indian cinema | Latest Marathi Movies

    Sawan Ko Aane Do : तुम्हे गीतों में ढालूंगा सावन को आने दो…..

    singer asha bhosle

    अंगात १०२ ताप असतानाही Asha Bhosle यांनी ‘हे’ गीत रेकॉर्ड केले!

    Shwetambari Ghute

    ‘मारिया’ श्वेतांबरीनं केली रसिकांची हृदयं काबीज

    रंगभूमीला बलस्थान मानणारी राजसी चिटणीस

    नेव्हीतून कलाक्षेत्रात आलेल्या संतोषने साकारला ‘प्यारे पापा’

  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
  • स्टार रिल्स
Kalakruti-Website

Trending

‘सारी सारी रात तेरी याद सताये..’ हे Roshan यांचे गाणे

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू

Bigg Boss Marathi 6: विशालने दिला रुचिताला धोका? आता रुचिताने

महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी Riteish Deshmukh पोहोचला शिवनेरीवर; बाल शिवाजी

Bigg Boss Marathi 6 : ‘मला काही फरक पडत नाही…’

Bigg Boss Marathi 6 च्या घरात सदस्यांना मिळणार नाही जेवण;

जे गाणे Kishore Kumar गायला तयार नव्हते त्याच गाण्याने त्यांना

The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र

Gautami Patil Wedding: गौतमी पाटीलने ‘या’ अभिनेत्यासोबत बांधली लग्नगाठ? नवऱ्यासाठी घेतला स्पेशल उखाणा

Shraddha Kapoor : पुण्यात ‘ईठा’ चित्रपटाचं शुटींग पूर्ण!

Kalakruti Media Kalakruti Media
  • कलाकृती तडका
    • बात पुरानी बडी सुहानी
    • गोष्ट चमकत्या ताऱ्यांची
  • कलाकृती विशेष
  • बॉक्स ऑफिस
  • मिक्स मसाला
  • गप्पा विथ सेलिब्रिटी
  • फोटो गॅलरी
Kalakruti-Website

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ OTT वर रिलीज; जाणून घ्या डिटेल्स!

 Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ OTT वर रिलीज; जाणून घ्या डिटेल्स!
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT
मिक्स मसाला

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT: कार्तिक-अनन्याचा ‘तू मेरी मैं तेरा’ OTT वर रिलीज; जाणून घ्या डिटेल्स!

by Team KalakrutiMedia 19/02/2026

तू मेरी मैं तेरा मैं तेरा तू मेरी (Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri) हा कार्तिक आर्यन (Kartik Aryan) आणि अनन्या पांडे (Ananaya Pande ) यांचा रोमँटिक कॉमेडी चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर २५ डिसेंबर २०२५ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. थिएटरमध्ये या चित्रपटाला समीक्षकांकडून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या. छायांकन आणि हलक्याफुलक्या सादरीकरणाचे विशेष कौतुक झाले, मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपट अपेक्षित कामगिरी करू शकला नाही.आता मात्र ही प्रेमकथा OTT वर इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाली आहे.(Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT)

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT

हा चित्रपट १९ फेब्रुवारी २०२६ पासून Amazon Prime Video वर स्ट्रिमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी तो रेंटवर उपलब्ध होता, पण आता प्रेक्षकांना तो मोफत पाहता येणार आहे.चित्रपटाची कथा आजच्या काळातील आधुनिक नातेसंबंधांवर आधारित आहे. कार्तिक आर्यनने साकारलेला ‘रे’ (रेहान) हा व्यावसायिक वेडिंग प्लॅनर असतो, तर अनन्या पांडे ‘रूमी वर्धन सिंग’च्या भूमिकेत दिसते. सुरुवातीला दोघांमध्ये थोडा संकोच आणि मतभेद दिसून येतात. 

Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT
Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT

मात्र, वेळ जसजसा पुढे सरकतो तसतसा संवाद वाढतो आणि दोघांमध्ये प्रेमाची नाजूक भावना निर्माण होते.कथेत एक भावनिक वळण तेव्हा येते, जेव्हा रूमीच्या वडिलांची प्रकृती बिघडते. त्या कठीण प्रसंगी रे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. या प्रसंगानंतर त्यांच्या नात्याची घट्ट वीण अधिक दृढ होते.या चित्रपटात नीना गुप्ता, जॅकी श्रॉफ, चांदनी भाभ्रा, टिकू तलसानिया, ग्रुशा कपूर, लोकेश मित्तल आणि गौरव पांडे यांसारख्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.(Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri OTT)

===========================

हे देखील वाचा: The Kerala Story 2 Trailer: ‘25 वर्षांमध्ये भारत इस्लामिक राष्ट्र होईल…’; अंगावर काटा आणणारा ‘द केरला स्टोरी 2’ चा ट्रेलर पाहिलात का?

===========================

चित्रपटाचे दिग्दर्शन समीर विद्वांस यांनी केले असून कथा-लेखन करण श्रीकांत शर्मा यांचे आहे. निर्मिती धर्मा प्रॉडक्शन आणि नमाह पिक्चर्सच्या बॅनरखाली करण जोहर, आदर पूनावाला, अपूर्व मेहता आणि इतर निर्मात्यांनी केली आहे.थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेला हा चित्रपट आता OTT प्रेक्षकांची मनं जिंकतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. हलक्याफुलक्या आणि भावनिक प्रेमकथांचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा चित्रपट एक चांगला पर्याय ठरू शकतो.

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email

Share This:

  • 3
    Share
    Facebook
  • 5
    Share
    WhatsApp
  • 2
    Share
    Twitter
  • 4
    Share
    Telegram
  • 1
    Share
    LinkedIn
  • 2
    Share
    Pinterest
  • 0.8K
    Share
    Email
Tags: Ananya Panday new movie Ananya Panday Tu Meri Main Tera Bollywood romantic comedy 2026 Celebrity Entertainment Kartik Aaryan new movie Kartik Aaryan Tu Meri Main Tera Tu Meri Main Tera Main Tera Tu Meri Tu Meri Main Tera OTT release Tu Meri Main Tera Prime Video Tu Meri Main Tera release date Tu Meri Main Tera streaming
Previous post
Next post
Kalakruti Media Kalakruti Media
Kalakruti Media Kalakruti Media
About Us
Work With Us
Contact Us
Privacy Policy
Copyright 2026. All Right Reserved.