Pushpa 2 पुष्पा २ सिनेमात जोडले जाणार बोनस फुटेज, ‘रीलोडेड’ नावाने
Swapnil Rajshekhar अभिनेते स्वप्नील राजशेखर यांची रस्त्यातील खड्ड्यांवर उपरोधिक पोस्ट
रोडने प्रवास करताना प्रत्येक व्यक्तीची एकच समस्या असते आणि ती म्हणजे ट्रॅफिक, खराब रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे. आधी फक्त पावसाळ्यात येणारी ही समस्या आता बाराही महिने आपली डोकेदुखी ठरत आहे. या त्रासामुळे रोडने प्रवास करणे दिवसेंदिवस अधिकच कठीण होत चालले आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांवर तर आता किती आणि काय बोलणार असे झाले. या खड्ड्यांमुळे अनेक अपघातदेखील झाले आहेत, ज्यात अनेकांनी आपला जीव देखील गांवला आहे. या खड्ड्यांवर सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सगळेच सोशल मीडियाच्या माध्यमातून भाष्य करताना दिसतात. या ट्रॅफिकमुळे, खड्ड्यांमुळे कलाकारांना अनेकदा शूटिंगला पोहचायला देखील वेळ होतो. याच विषयावर अभिनेते स्वप्नील राजशेखर (Swapnil Rajshekhar) यांनी सोशल मीडियावर एक उपरोधात्मक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ कमालीचा व्हायरल होताना दिसत आहे. (Swapnil Rajshekhar)
या व्हिडिओमध्ये स्वप्नील म्हणतात , “काहीजण रोज उठतात आणि रस्त्यावरच्या खड्ड्यांच्या नावाने बोटं मोडतात. त्या सगळ्यांना मला एक सांगायचे आहे, अहो… वर्षानुवर्षे, महिनोंमहिने हे सर्व खड्डे आपण जपले, राखले आहेत हे सगळे उगाच नाही ना. यामागे देखील एक विचार आहे. (Marathi Entertainment News)
तो विचार समजून घ्या. अशी किती माणसं आहेत…ज्यांचे अगदी बुळबुळीत रस्त्यासारखं आयुष्य आहे. तुमच्या – माझ्या रोजच्या जगण्यामध्ये कितीतरी खड्डे – डबरे येतात. महागडी गाडी खरेदी केलेली असते, आरोग्य विमा काढलेला असतो. दर महिन्याला याचा हफ्ता भरायचा असतो.
दर वीकेंडला बायको – मुलांना घेऊन हिल स्टेशनला जावे लागते. किती मोठा खड्डा पडतो. मावस मेहुणीला महागडं गिफ्ट द्यावे लागते…आपले पोरगं पहिलीतून दुसरीत जाताना इंग्रजी शाळेची भरमसाठ फी भरावी लागते या सगळ्यात मागे हटून चालणार नाही…म्हणून हे खड्डे. (Swapnil Rajshekhar Post)
अहो परवा आमचे एक आजोबा गेले असे डॉक्टरांनी जाहीर केले. त्यांचा मृतदेह रुग्णवाहिकेतून लोकं घरी घेऊन जात होते. रस्त्यात एक खड्डा आला, रुग्णवाहिका आदळली आणि आजोबा दाणकन् उठून बसले. गेलेला माणूस सुद्धा परत आला… लक्षात घ्या, एका माणसाचा जीव वाचला तो ही या खड्ड्यांमुळेच…लोकं उठतात आणि रस्ते बाद आहेत म्हणून शिव्या घालतात पण, आता आपणच समजून घेतले पाहिजे… प्रत्येकाच्या आयुष्यात खड्डा पाहिजे म्हणून तो ठेवलाय.”
=============
हे देखील वाचा : Dev anand: देव आनंदला सुपर हिट सिनेमाची आयडिया कुठे मिळाली?
=============
‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम अभिनेते स्वप्नील राजशेखर सोशल मीडियावर कमालीचे सक्रिय असतात. ते नेहमीच विविध पोस्ट शेअर करताना दिसतात. स्वप्नील जेव्हा केरळ फिरायला गेले होते, तेव्हा देखील त्यांनी केरळचे निसर्गसौंदर्य, स्वच्छता पाहून एक उपरोधिक पोस्ट शेअर केली होती. ही पोस्ट देखील खूपच गाजली. (Marathi Actor Post)
दरम्यान स्वप्नील यांनी आजपर्यत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी राजा शिवछत्रपती, कुलस्वामिनी, खेळ मांडला, वीर शिवाजी, स्वप्नांच्या पलिकडले, अजूनही चांद रात आहे, चार दिवस सासूचे, झुंज मराठमोळी, जय मल्हार, स्वराज्यरक्षक संभाजी, असावा सुंदर स्वप्नांचा बंगला आदी अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. (Marathi news)