महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतले अमृता खानविलकरचे फोटो व्हायरल
Tumbbad Re Release Box Office Collection: 6 वर्षांनंतर पुन्हा रिलीज झालेल्या ‘तुंबाड’ने बॉक्स ऑफिसवर केली कमाल
सहा वर्षांपूर्वी चित्रपटगृहात प्रेक्षकांना घाबरवणारा तुंबाड हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. तुंबाडने पुन्हा एकदा बॅाक्स आॅफीसवर धुमाकूळ घातला आहे. सोहम शाहच्या या चित्रपटाला पुन्हा एकदा प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे तुंबाडने पुन्हा प्रदर्शित होऊन कमाईच्या बाबतीत करिना कपूरच्या ‘द बकिंगहॅम मर्डर’ या चित्रपटाला मागे टाकले आहे. तुंबाडसह चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला अभिनेत्रीचा हा चित्रपट नवा आहे. तब्बल सहा वर्षांनंतरही सोहम शाहच्या चित्रपटाने दमदार ओपनिंग केली आहे.(Tumbbad Re Release Box Office Collection)
दररोज तुंबाड हा चित्रपट बंपर कलेक्शन घेऊन पुढे जाताना दिसत आहे. 6 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला एका आठवड्यात 10 कोटींची कमाई करण्यासाठी संघर्ष करावा लागला होता, तर रिरिलीजच्या पहिल्या वीकेंडमध्ये हा चित्रपट अतिशय वेगाने पुढे जाताना दिसत आहे. रि-रिलीजमध्ये या चित्रपटाला भरभरून प्रेम मिळत आहे. ‘तुंबाड‘ 2018 मध्ये पडद्यावर आला होता, आज जाणून घेऊया या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली आहे.
या चित्रपटाची गंमत म्हणजे ‘तुंबाड‘ चित्रपटाने पहिल्या दिवशी १.६५ कोटी रुपयांची कमाई केली, त्यानंतर ओपनिंग वीकेंडमध्ये त्याची कमाई वाढली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुंबाडने दुसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या शनिवार 2.60 कोटी रुपये आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी 3.25 कोटी रुपयांची कमाई केली. तर आता आजच्या अपडेटनुसार तुंबाडने रिलीजनंतर पहिल्या सोमवारी ओपनिंग डे पेक्षाही जास्त कमाई केली आहे.(Tumbbad Re Release Box Office Collection)
==============================
हे देखील वाचा: बाप्पाचा आशीर्वाद घेत ‘पाणी’सिनेमाचा टिझर लाँच; आदिनाथ कोठारेचा लूक ही आला समोर…
==============================
७५ व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात क्रिटिक्स वीक विभागात प्रदर्शित होणारा तुंबाड हा पहिला भारतीय चित्रपट होता. सोहम शहा यांच्या दमदार अभिनयाबरोबरच ज्योती माळशे आणि अनिता दाते-केळकर अशा अनेक कलाकारांनी चित्रपटाची कथा रंजक आणि आकर्षक बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. सहा वर्षांपूर्वी ही तुंबाडने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.