‘पाणी’ चित्रपटातील आदिनाथ आणि ऋचा यांच्यावर चित्रित करण्यात आलेलेल ‘तुया साथीनं’ प्रेमगीत प्रदर्शित
राजश्री एंटरटेन्मेंट आणि पर्पल पेबल पिक्चर्स प्रस्तुत कोठारे व्हिजन प्रायव्हेट लिमिटेड निर्मित ‘पाणी‘ या चित्रपटातील एक नवंकोरं प्रेमगीत प्रदर्शित झालं आहे. ‘तुया साथीनं’ असे बोल असणारं हे प्रेमगीत आदिनाथ कोठारे आणि ऋचा वैद्य यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. हळूहळू बहरत जाणारं, नजरेतून व्यक्त होणारं हे प्रेमगीत अतिशय श्रवणीय आहे. आदिनाथ कोठारे याने शब्दबद्ध केलेल्या या गाण्याला गुलराज सिंग यांचे संगीत लाभले आहे. तर गुलराज सिंग आणि साशा तिरुपती यांच्या सुमधुर आवाजानं हे गाणे अधिकच बहारदार बनलेले हे भावपूर्ण गाणे प्रत्येकाला आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण करून देणारे आहे. (Tuya Saathina Romantic Marathi Song)
आदिनाथ कोठारे दिग्दर्शित या चित्रपटाचे नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर महेश कोठारे, सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत. येत्या १८ ऑक्टोबर रोजी ‘पाणी’ चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक आदिनाथ कोठारे म्हणतात, ” हनुमंत आणि सुवर्णा यांच्यात हळुवार खुलत जाणाऱ्या प्रेमभावना या गाण्यातून व्यक्त होत आहेत. एकमेकांबद्दलची ओढ या गाण्यातून दिसतेय. या चित्रपटाच्या लेखनाबरोबर गाण्याचे बोल लिहिण्याचा प्रयत्न मी या चित्रपटातून केला आहे. शब्द जरी माझे असले तरी गुलराज यांच्या संगीताने आणि आवाजाने तसेच साशाच्या आवाजाने या गाण्यात अधिकच रंगत आणली आहे. संगीतप्रेमींना हे गाणे नक्कीच आवडेल.”
मराठवाड्यातील पाणीटंचाई सोडवण्यासाठी प्रयत्नशील असणाऱ्या तरुणाची संघर्षगाथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.या ‘जलदूता’ची म्हणजेच हनुमंत केंद्रे यांची भूमिका अभिनेता आदिनाथ कोठारे याने साकारली असून या चित्रपटात रुचा वैद्य, सुबोध भावे, रजित कपूर, किशोर कदम, नितीन दीक्षित, सचिन गोस्वामी, मोहनाबाई, श्रीपाद जोशी, विकास पांडुरंग पाटील अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. (Tuya Saathina Romantic Marathi Song)
===========================
===========================
नितीन दीक्षित आणि आदिनाथ कोठारे लिखित या चित्रपटाचे दिग्दर्शनही आदिनाथ कोठारे यानेच केले आहे. तर नेहा बडजात्या, दिवंगत रजत बडजात्या, प्रियांका चोप्रा जोनस, डॅा. मधू चोप्रा या चित्रपटाचे निर्माते असून महेश कोठारे आणि सिद्धार्थ चोप्रा या चित्रपटाचे सहयोगी निर्माते आहेत.