
Bollywood Movies 2025 : केवळ २ चित्रपटांनी रिकव्हर केली बजेटची रक्कम!
२०२५ हे वर्ष बॉलिवूडसाठी तसं भरभराटीचं होतं… वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट आपल्या भेटीला आले.. यात कंगना राणावतच्या ‘इमर्जन्सी’ (Emergency) पासून वर्षाची सुरुवात झाली होती.. पुढे अक्षय कुमारच्या ‘स्कार्य फोर्स’ (Sky force) चित्रपटाने तो ऑरा पुढे नेला.. यात शाहिद कपूरच्या ‘देवा’ आणि अजय देवगणच्या ‘आजाद’ चित्रपटांचीही नावं येतात…पण वर उल्लेख केलेल्या एकाही चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटाचं बजेटही रिकव्हर केलं नाही आहे…मात्र, दोन कलाकारांनी २०२५ हे वर्ष केवळ गाजवलंच नाही तर आत्तापर्यंत त्यांच्या वैयक्तिक चित्रपटांचाही बॉक्स ऑफिस रेकॉर्ड त्यांनी मोडित काढला आहे. कोणते आहेत ते दोन कलाकार आणि त्यांचे चित्रपट जाणून घेऊयात…(Bollywood movies)
===========================
हे देखील वाचा: Aabhalmaya : शिवाजी पार्कमुळे ‘सुधाच्या आयुष्यात तो ट्विस्टट आला नाही!
===========================
पहिला चित्रपट आहे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ (Chhaava). अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका आणि त्यांचं आयुष्य अक्षरश:जगला आहे. १४ फेब्रुवारी २०२५ रोजी देशभरात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने ५१ व्या दिवशी देखील बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. सॅकनिल्कच्या माहितीनुसार, ‘छावा’ चित्रपटाने आत्तापर्यंत ५९७.२ कोटींची कमाई केली आहे. ‘छावा’चं मुळ बजेट १३० कोटींचं होतं आणि त्या चौपट चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई केली आहे. (Chaava box office collection)

विशेष म्हणजे सलमान खानच्या ‘सिकंदर’ (Sikandar) चित्रपटाचा सामना ‘छावा’ (Chhava) सोबत झाल्यानंतर ‘छावा’ बॅकफुटवर जाईल असा अंदाज वर्तवला जात होता… कारण, ईद आणि सलमान खानचा चित्रपट हे समीकरण गेले अनेक वर्ष पक्क आहेच. पण गेल्या काही वर्षांमध्ये सलमानने एकामागून एक फ्लॉप चित्रपटांचा सपाटाच लावला आहे. या दोन्ही चित्रपटांमध्ये समान धागा होता तो म्हणजे अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna)… कारण ‘अॅनिमल’ (Animal) चित्रपटापासून तिचा ब्लॉकबस्टरचा प्रवास ‘सिकंदर’लाही फायद्याचा ठरेल असं वाटलं होतं पण प्रत्यक्षात झालं उलटंच… (Salman khan movies)

यानंतरचा दुसरा चित्रपट आहे जॉन अब्राहमचा ‘द डिप्लोमॅट’ (The Diplomat). एकीकडे ‘छावा’ थिएटरमध्ये हाऊसफुल्लचे बोर्ड लावत होता आणि दुसरीकडे ‘द डिप्लोमॅट’ रिलीज झाला.. विकीच्या ‘छावा’ (Chhaava) पुढे जॉनचा (John Abraham) चित्रपट तो देखील पॅट्रिओटिक आणि खऱ्या घटनेवर आधारित असल्यामुळे चालणार नाही असं वाटलं होतं.. पण आश्चर्याची बाब म्हणजे या चित्रपटाने बजेटच्या दुप्पट कमाई केली आहे. जॉन अब्राहमची प्रमुख भूमिका असणाऱ्या ‘द डिप्लोमॅट’ चित्रपटाचं बजेट २० कोटी होतं. या चित्रपटाने आत्तापर्यंत ३६.५ कोटी कमावून बजेट रिकव्हर केलं आहे. (The Diplomat box office collection)

जानेवारी पासून ते एप्रिलपर्यंत बड्या कलाकारांचे १० पेक्षा अधिक चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. मात्र, केवळ २ चित्रपटांनीच सर्वोत्तम कमाई केल्यामुळे हिंदी चित्रपटांचं आर्थिक भवितव्य काहीसं धोक्यात दिसत आहे. तसेच, आगामी अनेक बिग बजेट चित्रपट येणार आहेत ज्यात सीक्वेल्सचा समावेश आहे. त्यामुळे आता ते चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतात पाहायला हवं…(Bollywood upcoming big budget movies)