Manoj Kumar : हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘भारत’ काळाच्या पडद्याआड

‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ मालिकेत आदिशक्तीचं रुप साकारणाऱ्या अभिनेत्री मयुरी कापडणेने सांगितला दैवी अनुभव
स्टार प्रवाहवर ११ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या ‘उदे गं अंबे… कथा साडे तीन शक्तिपीठांची’ या पौराणिक मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पहात आहेत. नवरात्रौत्सवाच्या धामधुमीत महाराष्ट्राची श्रद्धास्थानं म्हणजेच साडे तीन शक्तिपीठांची गोष्ट उलगडणार आहे. या भव्यदिव्य मालिकेत आदिशक्तीची रुपं साकारणार आहे अभिनेत्री मयुरी कापडणे. मयुरीची देवीवर प्रचंड श्रद्धा आहे. योगायोगाने कोल्हापुरच्या अंबाबाईचं दर्शन घेत असतानाच मयुरीला आदिशक्तीचं रुप साकारण्यासाठी विचारणा झाली. (Ude Ga Ambe Serial On Star Pravah)

हा दैवी अनुभव असल्याची भावना मयुरीने व्यक्त केली. मी पहिल्यांदाच पौराणिक मालिकेत काम करतेय. सगळ्यात महत्त्वाचं माहुरची देवी रेणुका, कोल्हापुरची देवी अंबाबाई, तुळजापुरची देवी भवानी, वणीची देवी सप्तशृंगी, सती, पार्वती ही देवीची वेगवेगळी रुपं मी साकारणार आहे. मी जेव्हा स्वत:ला देवीच्या रुपांमध्ये पाहिलं तेव्हा माझाच माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. हा देवीचाच आशीर्वाद आहे असं मला वाटतं अशी भावना मयुरी कापडणेने व्यक्त केली.

आदिशक्तीचं स्वरूप विराट आणि विश्वाकार आहे. ती जगतजननी आहे. भक्तांच्या हाकेला धावून जाणारी भक्तांची तारणहार आहे आणि म्हणूनच साडेतीन शक्तिपीठांचा महिमा अपार आहे. याच साडे तीन शक्तिपीठांची सविस्तर भावगर्भ आणि भक्तिरसपूर्ण कहाणी म्हणजे ‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ ही महामालिका. महाराष्ट्रातल्या प्रत्येक घरात साडे तीन शक्तिपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीचं कुलदेवता म्हणून पूजन केलं जातं. ही आदिशक्ती आईप्रमाणे कुटुंबाचं रक्षण करते. पण आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेल्या या आईसमान देवीचं महात्म्य आणि इतिहास सर्वांना माहित असतोच असं नाही. तो इतिहास सविस्तरपणे आणि रोचक पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची या भव्यदिव्य पौराणिक मालिकेतून करण्यात येणार आहे.(Ude Ga Ambe Serial On Star Pravah)
============================
============================
सुप्रसिद्ध अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांची कोठारे व्हिजन्स प्रायव्हेट लिमिटेड ही निर्मिती संस्था या भव्य मालिकेची निर्मिती करणार आहे. ‘उदे गं अंबे…कथा साडे तीन शक्तिपीठांची’ सायंकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पाहता येईल.