Chhaava : महाराष्ट्रातील ‘या’ ठिकाणी झाले छावा सिनेमाचे शूटिंग

Tejashree Walawalkar : “…आणि माझ्यासाठी खास ‘ती’ भूमिका लिहिली गेली”
‘उंच माझा झोका’ या मालिकेतील रमा अर्थात अभिनेत्री तेजश्री वालावलकर (Tejashree Walawalkar) हिच्यासोबत कलाकृती मिडियाने ती सध्या काय करते? हा विशेष व्हिडिओ सेगमनेंटला केला. यावेळी सध्या ती काय करते? तिचा अभिनयाचा प्रवास कसा सुरु झाला? अशा अनेक विषयांवर तिच्याशी गप्पा मारल्या. जाणून घेऊयात तेजश्रीबद्दल…
मुझे कास्ट करना है तो करो वरना…
‘उंच माझा झोका’ (Unch Maza Zoka) या मालिकेपूर्वी तेजश्रीने दोन मालिकांमध्ये कामं केली होती. मात्र, रमा प्रेक्षकांच्या कायमस्वरूपी लक्षात राहिली. अभिनयाची सुरुवात कशी झाली यावर बोलताना तेजश्री म्हणाली, “मी ३ वर्षांची असताना माझ्या आईने माझं फोटोशुट केलं होतं. आणि ते फोटो पाहिल्यावर एकाने सांगितलं की FTII एका शॉर्ट फिल्मसाठी कास्टिंग सुरु आहे तर तेजश्रीला घेऊन या. मी (Tejashree Walawalkar) आणि आई गेलो तर तिथे खुप गर्दी होती. मी वाट पाहून कंटाळले आणि तिथे एकाला सरळ बोलले की “मुझे कास्ट करता है तो करो वरना मेरे पार टाईम नही है” आणि असं बोलून मी आईला घेऊन निघाले. दोन दिवसांनी फोन आला आणि त्यांनी सांगितलं की शॉर्ट फिल्ममध्ये ३ वर्षाच्या मुलीचं कॅरेक्टर नव्हतं पण आम्ही खास तेजश्रीसाठी क्रिएट केलाय तर तिला घेऊन या. तिथे आम्ही गेलो आणि ती माझी पहिली शॉर्ट फिल्म होती द फॅंन्टेस्टिक लाईफ ऑफ मिस्टर त्रिपाठी. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्या शॉर्ट फिल्मला अनेक पुरस्कारही मिळाले होते. तिथून कळत नकळत माझ्या अभिनयाची सुरुवात झाली. (Marathi films update)
============
हे देखील वाचा :Bollywood Celebs : गांधीजींनी वास्तव्य केलेल्या घरात राहतो अक्षय कुमार?
============
सुलभा देशपांडेंसोबत स्क्रिन शेअर करणं म्हणजे…
तेजश्रीची पहिली शॉर्ट फिल्म तर हिट झालीच. पण तिचा पहिला चित्रपटही तिने ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे (Sulbha Deshpande) यांच्यासोबत केला होता. ‘आजी आणि नात’ (२०१०) असं चित्रपटाचं नाव होतं आणि अगदी आयत्यावेळी तेजश्रीला सांगण्यात आलं की तुला सुलभा देशपांडे यांच्या नातीचं काम करायचं आहे. “सुलभाताई देशपांडे यांच्यासोबत स्क्रिन शेअर करता येणं म्हणजे माझं भाग्यच होतं. त्यामुळे मी लगेचच होकार दिला. आणि ती एक माझ्या आयुष्यातील अजरामर कलाकृती घडली”, अशा भावना तेजश्रीने व्यक्त केला. (Tejashree Walawalkar)

तेजश्री वालावलकर हिने आत्तापर्यंत ‘मात’, ‘चिंतामणी’, ‘बायोस्कोप’’, ‘सबका मालिक एक’, ‘महिमा अन्नपुर्णा देवीचा’, ‘राम राम महाराष्ट्र’ अशा अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. तसेच, लवकरच ती नव्या कलाकृतीतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचंही तिने सांगितलं. (Entertainment trending news)