Vicky Kaushal-Katrina Kaif यांनी अखेर आपल्या लेकाचं नाव केलं रिव्हील,

A.R.Rehman : संगीत क्षेत्राचा बादशाह!
केवळ भारतातच नव्हे तर जगभरात ज्य़ा संगीतकाराचे करोडो फॅन्स आहेत अशा द ग्रेट ए.आर.रेहमान (A.R.Rehman) यांचा आज वाढदिवस. रेहमान यांचं गाणं थेड मनाला भिडतं. जन्मत: हिंदू असणाऱ्या रेहमान यांनी आपला धर्म बदलला. नेमकं त्यांनी असं का केलं? आणि एकीकडे कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना जगभरात या भारतीय संगीतकाराने आपलं नाव सुवर्णाक्षरांनी कसं कोरलं? जाणून घेऊयात… (Entertainment News)
तर, रेहमान यांचा जन्म एका मध्यमवर्गीय हिंदु कुटुंबात झाला.त्यांचं मुळ नाव होतं दिलीप कुमार (Dileep Kumar) होतं. त्यांचे वडिल राजगोपाल कुलशेखरन दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीतील ग्रेट संगीतकार होते. त्यामुळे लहानपणापासूनच सुरांचं शिक्षण त्यांना मिळालं. वडिल म्युझिक कंपोज करत असताना त्यांना पाहात आणि ऐकत रेहमान यांना संगीताची आवड निर्माण झाली. वडिलांकडून संगीताचे धडे घ्यायच्या वयात नवव्या वर्षी त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि घराची आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. घरखर्च चालवण्यासाठी प्रसंगी वाद्य, यंत्र भाड्याने देऊन त्यांनी कसाबसा उदरनिर्वाह केला. याच काळात त्यांच्या आईवर मुस्लिम धर्माचा प्रभाव झाला आणि त्यानंतर दिलीप कुमारय यांनी धर्म बदलून ए.आर.रेहमान ही नवी ओळख आत्मसात केली. (A.R.Rehman News)

रेहमान यांनी वयाच्या ११व्या वर्षी आपल्या एका मित्रासोबत सिंथेसाईजर वाजवण्याचं काम सुरु केलं. इतकंच नाही तर पद्मभूषण इलैय्याराजा यांच्याकडेही त्यांनी वाद्य वाजवण्याचं काम केलं. हळूहळू रेहमान म्युझिकमध्ये मुरत गेले आणि त्यांनी स्वत:चा एक स्टुडिओ सुरु केला. आधी ते जाहिराती, डॉक्युमेंट्री यांना संगीत देत होते, तसेच, जिंगल्सही तयार करत होते. ऐअरटेलची गाजलेली जिंगलही रेहमान यांनीच कंपोज केली होती. तर, कालांतराने जाहिरातींकडून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत प्रवेश केला. १९९२ मध्ये रोजा चित्रपटाला पहिल्यांदाच त्यांनी संगीत देत बॅन्च मार्क सेट केला होता आणि राष्ट्रीय पुरस्कारावर नावही कोरलं होतं. आणि त्यानंतर १९९५ मध्ये राम गोपाल वर्मा यांच्या रंगीला चित्रपटाला संगीत देत त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

भारतीय चित्रपटसृष्टीत आपल्या संगीताचा प्रवास सुरु असताना त्यांनी हॉलिवूड गाठलं. ‘जय हो’ या गाण्यामुळे त्यांना ग्लोबली ओळख मिळाली आणि त्यांनी ऑस्करही जिंकला. त्यांनी ४-५ हॉलिवूड चित्रपटांना संगीत दिलं आहे. इतकंच नाही तर, त्यांना ग्रॅमी पुरस्कारही मिळाला आहे. रेहमान यांनी आपल्या नावे बरेच रेकॉर्ड केले आहेत. जगभरातील जवळपास १३८ पुरस्कारांसाठी त्यांना नामांकन मिळालं होतं आणि त्यापैकी ११५ पुरस्कार त्यांनी जिंकले आहेत. इतकंच नाही तर आजवर ६ राष्ट्रीय पुरस्कार त्यांनी जिंकले आहेत. एकीकडे पुरस्कांराची रांग आहेच पण रेहमान यांनी एकेकाळी ४ किबोर्ड्स एकाचवेळी वाजवतही रेकॉर्ड केला होता.
================================
हे देखील वाचा : २०२५ मध्ये ११० Marathi Movies; पण कमाई फक्त ९९ कोटी… काय गंडतय?
================================
जगभरात आपली ओळख निर्माण करणाऱ्या रेहमान यांच्या नावे कॅनडामध्ये एका रस्त्याला त्यांचं नाव देण्यात आलं आहे. या रस्त्याचं नाव आहे ‘अल्ला रख्खा रेहमान स्ट्रिट’. तसेच, कदाचित बऱ्याच जणांना हे माहित नसेल पण Avengers : Endgameच्या भारतातील रिलीजसाठी चक्क रेहमान यांनी खास गाणं कंपोज केलं होतं. तर, अशा या संगीत क्षेत्रातील बादशाहला आणि The Mozart Of Madras अशी ओळख असणाऱ्या ए.आर.रेहमान यांना कलाकृती मीडियाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा!
Get Latest Marathi Entertainment update | Movies Reviews in Marathi | Celebrities Update in Marathi